Skip to content

करीअर कॉउंसिलिंग म्हणजे काय ?

राकेश वरपे

(करीअर कॉउंसीलर)
संचालक, आपलं मानसशास्त्र
 
 
६ वी ते १२ वीच्या च मुलांचं करीअर कॉउंसेलिंग करण्याचा हा महत्वाचा आणि योग्य असा काळ असतो. तसेच करीअर याचा जर खराखुरा अर्थ आपण पाहीला, तर त्यासाठी अगोदर कोणतेतरी किमान एक आवडीचं क्षेत्र निवडावं लागतं आणि ते क्षेत्र निवडल्यापासून, शिक्षण घेतल्यापासून, त्यात नोकरी किंवा व्यवसाय करण्यापासून ज्या चढ-उताराला सुरुवात होते, त्याला शास्त्रीय भाषेत करीअर असं म्हणतात. जसं सचिन तेंडुलकर यांचं क्षेत्र खेळ किंवा क्रिकेट, लता मंगेशकर यांचं क्षेत्र संगीत किंवा गायन, तसेच अमिताभ बच्चन यांचं क्षेत्र अभिनेता किंवा ऍक्टर, या तिनही असामान्य व्यक्तींनी केलेली अतुलनिय कामगिरी, पाहीलेले चढउतार म्हणजेच करीअर आणि ते त्या चढ-उत्तरात टिकले कारण त्यांनी निवडलेलं क्षेत्र हे त्यांच्या आवडीचं, जिव्हाळ्याचं, जिद्दीचं आणि चिकाटीचं होतं. अशाच प्रकारे आपल्या मुलांमधील कला-कौशल्य ओळखून त्यांना ते क्षेत्र निवडण्यास प्रोत्साहीत केल्यास त्यांच्याकडूनही अशी असामान्य कामगिरी होऊ शकत नाही का ? तर याचे उत्तर नक्कीच होय असेच असेल.
 
 
 
नाहीतरी चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे शिक्षणाचा दुस्वास निर्माण होऊन केवळ उदरनिर्वाहासाठी नोकरी करणाऱ्या तरुणांचा टक्का काही कमी नाही.
 
 
 
आपण पुष्कळदा क्षेत्र आणि करीअर यामध्येच गल्लत करतो. मनापासून, मनासारखं करीअर करण्यासाठी बुद्धीमत्ता व उपजत गुणांनुसार क्षेत्र निवडणं किती महत्वाचं आहे, याची कल्पना आता आपल्याला आली असेलच !
 
 
पुष्कळ पालकांना यामधलं गांभीर्य लक्षात आलेलं असतं, परंतु त्याचा नेमका अर्थ मात्र कळालेला नसतो. म्हणून आई म्हणते, “डॉक्टर हो”, बाबा म्हणतात, “इंजिनिअर हो”, यामध्येच मुलांचा गोंधळ होतो. खरं तर अशावेळी मुलांचा कल समजून घेणं महत्वाचं असतं, शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना समजून घेणं महत्वाचं असतं.
 
 
म्हणून मुलांनी योग्य क्षेत्र निवडून त्यात उत्तम करीअर करावे, यासाठी त्यांचं योग्य करीअर कॉउंसिलिंग होणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे.
 
 
 
■ मुख्य चाचण्या ■
 
 
१. बुद्धिमत्ता चाचणी :-
 
 
यालाच इंग्रजीत IQ टेस्ट असे म्हणतात. वयाच्या १८ ते २० वर्षापर्यंत आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो. ज्याप्रकारे शारीरिक उंची किंवा वाढ ही या वयापर्यंतच विकसित होत असतात, अगदी त्याचप्रमाणे बौद्धिक वाढ सुद्धा इथपर्यंतच विकसित होते. त्यानंतर आपल्या मानसिक क्षमता वाढतात, ते ही अवलंबून असतं की १८ – २० वर्षापर्यंत आपला बौद्धिक विकास हा किती प्रमाणात झाला आहे. जर बौद्धिक विकास चांगला झाला असेल तर पुढे मानसिक क्षमता झपाट्याने वाढतात, उलट बौद्धिक विकास हा अत्यल्प प्रमाणात झाला असेल तर मानसिक क्षमता विकसित होण्यास तितकाच वेळ लागतो. म्हणून या चाचणीत आपल्या मुलांची बुद्धिमत्ता ही त्यांच्या वयाच्या सर्वसामान्य मुलांपेक्षा जास्त आहे, सर्वसामान्य आहे की त्यापेक्षा कमी आहे, हे आपल्याला समजतं. जेणेकरून एकदा का त्यांची बुद्धिमत्ता समजली की कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी अनुरूप आहे, याबद्दल स्पष्टता मिळण्यास मदत होते.
 
 
 
२. कलमापन चाचणी :-
 
 
 
या चाचणीत आपल्या मुलांचा कल हा Medical, Engineering, Commerce, Arts, Fine Arts आणि इतर यांपैकी नेमकं कोणत्या दिशेला सर्वाधिक आहे, जेणेकरून आलेली बुद्धिमत्तेची नेमकी ऊर्जा त्याठिकाणी वळवता येते.
 
 
३. क्षमतामापन चाचणी :-
 
 
यालाच इंग्रजीत Aptitude टेस्ट असे म्हणतात. आलेला कल लक्षात घेऊन त्या क्षेत्राशी संबंधित क्षमता मुलांमध्ये आहेत का, याचे मापन ही चाचणी करते. तसेच पालकांकडून मुलांच्या ठिकाणी आलेले उपजत गुण हे कोणत्या क्षेत्राला जास्त कनेक्ट होतात, हे समजते.
 
 
४. व्यक्तिमत्व मापन चाचणी :-
 
 
वाढत्या वयानुसार जसे सकारात्मक क्षमता मुलांमध्ये वाढत असतात, त्याचप्रमाणे काही नकारात्मक क्षमताही वाढत असतात. जसे आक्रमक मुले, लक्ष न देणारी मुले, अतिचंचल मुले, नैराश्य मुले, स्वतःला त्रास देणारी मुले, घातक मुले, एकटी राहणारी मुले, लैंगिक समस्या असणारी मुले ई नकारार्थी व्यक्तिमत्व घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, करीअर आणि व्यक्तीगत आयुष्यात अडथळे निर्माण करतात. या चाचणीत आपल्या मुलांमध्ये असा कोणता घटक वाढत्या वयानुसार वाढतोय, हे समजून त्यावर उपाय म्हणून उपचार तंत्रे मुलांना आणि पालकांना शिकविले जातात.
 
 
५. अभ्यास सवय शोधिका :-
 
 
ही चाचणी मुलांच्या ठिकाणी असणाऱ्या चुकीच्या अभ्यास सवयीचे मापन करते किंवा आणखीन अभ्यास सवयींमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी ही चाचणी फार फायदेशीर ठरते.
 
 
मुलांच्या योग्य करीअर कॉउंसेलिंगसाठी वरीलप्रमाणे ५ मुख्य चाचण्यांचा समावेश असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय करीअर कॉउंसेलिंगची शास्त्रीय प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपण जर आपल्या मुलांचे करीअर कॉउंसेलिंग करण्याच्या विचारात असाल तर वरील पाचही चाचण्यांची शहानिशा करूनच निर्णय घेणे केव्हाही उत्तम !
 
 
 
■ अधिक माहीतीसाठी
 
 
***
 
अधिक विस्तारीत स्वरूपात जाणून घ्या !
 
पालकांच्या व्हाट्सऍप समूहात सामील व्हा !

56 thoughts on “करीअर कॉउंसिलिंग म्हणजे काय ?”

  1. Pingback: मुलांमधला वाढत असलेला हट्टीपणा...यावर अतिशय सोप्पा घरगुती उपाय !! - आपलं मानसशास्त्र

  2. Pingback: मुलांच्या बेस्ट करीअरसाठी येणाऱ्या आव्हानांचा विचार करा. - आपलं मानसशास्त्र

  3. Pingback: आपल्या मुलांना पैशाचं मॅनेजमेंट शिकवणं महत्वाचं! - आपलं मानसशास्त्र

  4. Pingback: अन वडिलांनी शंतनूला जबरदस्ती अभियांत्रिकीला पाठवलं!! - आपलं मानसशास्त्र

  5. Pingback: मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते ! - आपलं मानसशास्त्र

  6. Pingback: मुलांच्या चिंतेमुळे पालकांचे ढासळणारे आरोग्य!! उपाय वाचा!! - आपलं मानसशास्त्र

  7. Pingback: आज मराठी शाळकरी मुलं दोन गोष्टींमध्ये चुकतायत!! - आपलं मानसशास्त्र

  8. Pingback: चिडखोर मुलांना शांत कसे करायचे❓वाचा उपाय! - आपलं मानसशास्त्र

  9. Pingback: पालकांनो, शिक्षणाचं बाजारीकरण झालंय असं वाटतंय का?? - आपलं मानसशास्त्र

  10. Pingback: शिक्षकांनी केलेल्या अशा अनेक संस्कारांमुळे मी घडलो!! - आपलं मानसशास्त्र

  11. Pingback: 'श्वेता' ची कहाणी...अश्या बऱ्याच 'श्वेता' आपल्या अवतीभवती वावरत आहेत !! - आपलं मानसशास्त्र

  12. Pingback: आजकालचे पालक मुलांचं खूपच टेंशन घेतात!!! - आपलं मानसशास्त्र

  13. Pingback: तुमची मुलं खोटं का बोलतात ?? जाणून घ्या ! - आपलं मानसशास्त्र

  14. Pingback: प्रेम आणि आकर्षण... यावर आईने मुलाला दिलेली शिकवण! - आपलं मानसशास्त्र

  15. Pingback: मुलांना 'प्रॅक्टिकली' कसं हाताळायचं? एक उत्तम उदाहरण! - आपलं मानसशास्त्र

  16. Pingback: 'लैंगिक शिक्षण' पालकांसमोर सर्वात मोठं आव्हान! - आपलं मानसशास्त्र

  17. Pingback: movies

  18. Pingback: मोबाईल एक भयंकर सत्य!!! - आपलं मानसशास्त्र

  19. Pingback: 'Sex Chat' करताय!! जरा सांभाळून !!! - आपलं मानसशास्त्र

  20. Pingback: आपली मुलं अशी का वागतात....यामागचं रहस्य वाचा! - आपलं मानसशास्त्र

  21. Pingback: आपली मुलं पबजी गेम का खेळतायत ?? वाचा सविस्तर !! - आपलं मानसशास्त्र

  22. Pingback: प्राथमिक लैंगिक शिक्षण ही आजच्या काळाची गरज !! - आपलं मानसशास्त्र

  23. Pingback: पालकांना व मुलांना एकच गोष्ट सोबत धरून ठेवते ?? - आपलं मानसशास्त्र

  24. Pingback: पालकांनो, चुक कुठे झाली ???? - आपलं मानसशास्त्र

  25. Pingback: वाढत्या वयातल्या मुलांचे आईबाबांशी मतभेद का होतात? - आपलं मानसशास्त्र

  26. Pingback: मुलांना भुताच्या ? गोष्टी सांगाव्या का? - आपलं मानसशास्त्र

  27. Pingback: तुमच्या मुलांमध्ये सुद्धा अशी समस्या आढळून येते का ?? - आपलं मानसशास्त्र

  28. Pingback: आमची मुलं आजकाल खूप एकटी रहायला लागलीयेत !!! - आपलं मानसशास्त्र

  29. Pingback: मुलांची चिडचिड कमी होण्यासाठी एका शिक्षकाने केलेला प्रयोग !!! - आपलं मानसशास्त्र

  30. Pingback: मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग - भाग २० - आपलं मानसशास्त्र

  31. Pingback: पालकांनो, तुमच्या अपेक्षांचं डोंगर बुलडोझरने पाडा ! - आपलं मानसशास्त्र

  32. Pingback: मुलं उपदेशाने नव्हे, तर आपल्या वागणुकीतुन शिकतात ! - आपलं मानसशास्त्र

  33. Pingback: मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग - भाग १९ - आपलं मानसशास्त्र

  34. Pingback: मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग - भाग १८ - आपलं मानसशास्त्र

  35. Pingback: मुलांना लैंगिक शिक्षण देताना पालकांसाठी महत्वाचे '८' नियम !!! - आपलं मानसशास्त्र

  36. Pingback: लैंगिक शिक्षण दिल्याने त्याचा मुलांवर वाईट परिणाम तर होणार नाही ना ??? - आपलं मानसशास्त्र

  37. Pingback: 'मार्क' म्हणजेच गुणवत्ता नाही! - आपलं मानसशास्त्र

  38. Pingback: मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग - भाग १६ - आपलं मानसशास्त्र

  39. Pingback: मुलांच्या उज्वल भविष्यासाठी निर्णय घेताना...वाचा सविस्तर ! - आपलं मानसशास्त्र

  40. Pingback: दहावीनंतर काय रे भाऊ? - आपलं मानसशास्त्र

  41. Pingback: मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग - भाग १५ - आपलं मानसशास्त्र

  42. Pingback: समुपदेशन - पालकांमधील समज आणि गैरसमज - आपलं मानसशास्त्र

  43. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग १३ - आपलं मानसशास्त्र

  44. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग १२ - आपलं मानसशास्त्र

  45. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ११ - आपलं मानसशास्त्र

  46. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग १० - आपलं मानसशास्त्र

  47. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ९ - आपलं मानसशास्त्र

  48. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ८ - आपलं मानसशास्त्र

  49. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ७ - आपलं मानसशास्त्र

  50. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ६ - आपलं मानसशास्त्र

  51. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ५ - आपलं मानसशास्त्र

  52. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ४ - आपलं मानसशास्त्र

  53. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग ३ - आपलं मानसशास्त्र

  54. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग २ - आपलं मानसशास्त्र

  55. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग १ - आपलं मानसशास्त्र

  56. Pingback: मुलांचं करीअर काउंन्सिलिंग - भाग १४ - आपलं मानसशास्त्र

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!