मोकळेपणाने बोलूया…
स्वप्निल मानव
लैगिकता हि प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे, जीवन जगत असतांना प्रत्येकाला या टप्प्यातून जाव लागत. लैगिकता हा खरतर सर्वच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो महत्वाचा हि आहे. पण हल्ली यावर आज कुठेही मोकळेपणाने बोललं जात नाही.
हल्ली माणसाच्या जगण्याची पद्धती ही धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे माणसांना नात्यांना पुरेसा वेळ देता येत नाहीये. या सर्व परिस्थितीत माणसाच्या सामाजिक, आर्थिक, भावनिक, शारीरिक गरजा यांकडे बघताना अनकेदा तितक्या काळजीपूर्वक बघितलं जात नाही. मग कुटुंब व्यवस्थेत जगताना सर्व नात्यांसोबतची भूमिका निभावताना पाहिजे तितक लक्ष देऊन ते नाते पूरक होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते. या सगळ्या नात्यांच्या उतरंडीमध्ये हल्ली फक्त मोठ्या लोकांच्या भाव-भावनांचाच बोलबाला जास्त होतो किंबहुना केला जातो. यात लहान मुलांच्या भाव-भावनांवर विचार केला जात नाही. मुलांना अजूनही कुटुंब व्यवस्थेत गृहीत धरलं जात. पालकांकडून किंवा समाजाकडून असे अलिखित नियमच बनून रूढ होतात की, मुलांना विशिष्ट वयापर्यंत काही समजत नसतं किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील निर्णय हे पालकांना विचारूनच घ्यावे. आणि दुसऱ्या बाजूला मुलांना हळूहळू मोठं होत असताना समाजात जे त्याच्या अवतीभोवती घडत असत त्यातून व त्यांच्या भावनांमध्ये होणाऱ्या विकासाच्या बदलांमुळे त्याची मते किंवा वागणं ते ठरवत असतात आणि तस ते वागत असतात. मुलांना कळते होईपर्यंत किंवा लग्नापर्यंत येईपर्यंत फक्त करियर याच विषयावर बोललं जातं.
भविष्यात असणाऱ्या भौतिक आणि उदरनिर्वाह कसा व्यवस्थित होईल यावर पुरेपूर मार्गदर्शन किंवा रोज याबद्दल बोललं जातं. परंतु या सर्व गरजांच्या सोबतच मुलांच्या भावनिक आणि शारीरिक बदलांबाबत कुणीच त्यांना बोलत नाही. घरात आई-वडील सतत असा अभ्यास कर, हे हे कर, अगदी तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन ही करियर करण्यासाठी आज पालक घेत आहेत. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या भविष्यासाठी हे सर्व प्रयत्न महत्वाचे तर आहेच, परंतु या सर्व गोष्टींसोबत त्यांच्यात होणाऱ्या बदलांवर त्यांना आज त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलणे जास्त गरजेचे आहे. आणि आज हेच न आपल्या कुटुंब व्यवस्थेकडून होतंय ना समाज व्यवस्थेकडून हे होतंय. मूल जसजशी मोठी होतात त्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक , सामाजिक या सर्व गोष्टींमध्ये नव्याने बदल होत असतात. आणि या बदलांवर न आपली शिक्षण व्यवस्था बोलते न इतर कोणती व्यवस्था. असे सर्व वातावरण सभोवताली असताना मुलांचं या सगळ्याकडे बघत असताना ते त्यांच्या पातळीवर त्यांना आलेले अनेक शंका, प्रश्न किंवा अडचणी यांना पडतात. अचानक शरीरात बदल दिसू लागतात. अंगावर केस येतात, चेहऱ्यावर पुरळ येतात, काखेत केस येतात, जनेंद्रियाभोवती केस येन, मुलांना दाढी-मिश्या येन, लैगिक स्वप्न पडणे, झोपेत वीर्यपतन होणे, मुलांना मुलींविषयी आकर्षण निर्माण होत, मुलींना स्तनांचा आकार वाढणे, मासिक पाळी सुरु होणे, मुलींना मुलांविषयी आकर्षण निर्माण होत इत्यादी अनेक प्रश्न वयात येताना मुला-मुलींना पडतात. त्यातूनच अनेक समज-गैरसमज तयार होतात. या सर्व परिस्थितीत मनात अनेक प्रकरचे प्रश्न येऊन जातात, पडलेले प्रश्न किवा त्यासबंधी शंका सोडविण्याचा ते प्रयत्न करतात कधी कधी प्रश्न सुटतात.
पण कधी कधी हे प्रश्न सोडविताना त्यांच्याकडून चुका होतात मग ह्या चुका छोट्या-मोठ्या ज्या-त्या प्रश्नाच्या तीव्रतेवरून किती गंभीर आहे हे ठरतात. कधी कधी या चुका जास्त गंभीर नसतात तर कधी कधी या चुका अगदी कायद्याचे उल्लंघन होण्यापर्यंत जाऊन पोहचतात. बऱ्याचदा मुलांकडून होणाऱ्या किंवा घडणाऱ्या कृती त्यांच्यासाठी नवीन असतात त्यातून काय चांगले वाईट परिणाम होतील याचीही त्यांना समज नसते, जेव्हा मोठे लोक या घटनेकडे बघतात तेव्हा त्या घटनेची गंभीर्य ही त्यांच्या दृष्टीने फार गंभीर असते. मोठ्यांच्या चष्म्यातून जेव्हा घटनांकडे पाहिजे जाते तेव्हा त्या घटना घडण्याच्या कार्यकारणभावाकडे कुणीही लक्ष देत नाही.
अश्या अनेक कारणांमुळे मुलं संभ्रमात असतात. बऱ्याच वेळा मूल वयात येत असताना होणाऱ्या भावनिक आणि शारीरिक बदलांमुळे व त्या संबंधी माहिती नसल्यामुळे त्यांना वागताना काय करावं कस वागावं हे समजत नाही. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे मुलाचं पालकांशी असलेलं वागण, मित्रांसोबत असलेलं वागण बदलत, मुल एकटी राहायला लागतात, घरात चिडचिड करायला लागतात, अचानक वागण्यात कोणताही बदल होतो, झोप लागत नाही, सतत कुठतरी हरवल्यासारखे असतात, वर्गात लक्ष लागत नाही, अचानक हुशार असेलेली मुल अभ्यासात कमी पडतात, इंटरनेटचा वापर जास्त करायला लागतात, त्यावर पोर्न बघू लागतात.
या सर्व समस्यांचा सामना करत असताना ते इंटरनेटच्या माध्यमातून व मित्र-मैत्रिणींच्या माध्यमातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करता. व मग या माहितीचा उपयोग प्रत्येक्ष वागण्यात करू लागतात, मग कधी विरुध्द लिंगी व्यक्तीचा पाटलाग करणे, एकटक पाहणे, बोलण्याचा प्रयत्न करणे, हाक देणे, कधी कधी संपर्क होत नसेल तर मित्र-मैत्रिणींच्या मदतीने संपर्क करण्याचा प्रयत्न करणे, आवडणाऱ्या व्यक्तीला पाहून हावभाव करणे, वारंवार समोर जाणे, आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे, कधी समोरून प्रतिसाद भेटला नाही तर बळजबरीने बोलणे, धमकी देऊन भावनिक करून बोलण्याचा प्रयत्न करणे. कधी-कधी समोरच्या व्यक्तीची संमती मिळाल्यावर हि जबाबदारीने लैगिक वर्तन कसे करावे हे न समजल्यामुळे अचानक आपण मोठे झालो आहोत या भावनेतून मोठ्या माणसांसारख वागायला लागतात, मग यातून बऱ्याच वेळा पुरेसी समाज नसताना शरीरसबंध हि करतात.
मुलांच्या दृष्टीने हा जरी संमतीने झालेला सबंध असला तरी कायद्याच्या दृष्टीने त्याला मान्यता नसल्याने पोलिस स्टेशनचा, कोर्टाचा सामना करावा लागतो. त्यावरून असही लक्षात येत की लैगिक अत्याचारसंदर्भातील नियम किंवा कायदे हे त्यांना त्यांच्याकडून तुटल्यानंतरच माहीत होतात. अशा मुलांना विधीसंघर्षीत बालक म्हणतात. या मुलांसोबत आज काम करणे खूप गरजेचे असते.
काही संस्था बाल हक्क आणि संरक्षण या विषयावर काम करतात. बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला व बाल विकास मंडळ, वेगवेगळ्या सामाजिक संस्था बाल लैगिक अत्याचार या विषयावर काम करतात. फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान या प्रकल्पाअंतर्गत पुण्यात सण २००० पासून बाल संरक्षण या विषयावर काम करते आहे. विधायक भारती, आरंभ इंडिया या संस्था मुंबईमध्ये काम करतात. अश्या इतरही संस्थांच्या मार्फत अश्या घटना घडू नये यासाठी वेगवेगळ्या वयोगटासोबत जनजागृती सत्र घेतले जातात. या घटना घडल्यांनातर ज्या ज्या शासकीय यंत्रणा काम करतात अश्या सर्व यंत्रणांसोबत प्रशिक्षण कार्यशाळा देखील घेतले जातात.
वेगवेगळ्या संस्था संघटना तसेच शाळेतून येणाऱ्या केसेस हाताळल्या जातात. केस मधील सर्व प्रकिया पार पडेपर्यंत पीडित बालकास व पालकांचे समुपदेशन या संस्थेकडून केले जाते. पिडित बालकांसोबत काम केले जाते त्याचबरोबर १८ वर्षाखालील बालक गुन्ह्यात अडकले आहेत अशा मुलांसोबत बाल न्याय मंडळासोबत देखील मुलांचे समुपदेशन केले जाते. या सर्व कामाची आज अत्यंत गरज आहे.
आज बालकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने सारख्याच वयाच्या मित्रांची अवस्थाही सारखीच असल्यामुळे पुरेशी माहितीचा अभाव व परिणामांचं तारतम्य नसलेले, बऱ्याच वेळा भावनेच्या भरात निर्णय घेण्याकडे मुलांचा कल असतो व इथेच चूक होण्याची शक्यता जास्त असते. मुलांवर ही वेळ येऊच नये म्हणून पालकांकडून योग्य माहिती वेळोवेळी मिळाले तर या सर्व भावना कश्या पद्धतीने हाताळू शकतो याची माहिती मुलांना येते. शारीरिक गरज ही कितीही नैसर्गिक जरी असली तरी ती ‘जबाबदार’ असणं हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन व जबाबदार लैंगिक वर्तन यातला नेमका फरक काय हेच अनेकांना माहीत नसतं. अशा अज्ञानामुळे लैगिक भावनांचा निचरा कसा करायचा हे माहीत नसणे व पालक ही या प्रश्नावर मुलांसोबत बोलणं टाळतात व वेळ मारून नेतात. बऱ्याच वेळा पालकांनाच लैगिक जबाबदार वर्तन म्हणजे नेमकं काय हे माहीत नसतं किंवा ते सांगता येत नाही.
मुलांना या परिस्थिती काय आणि कसं वागायचं याच भान नसतं, भावनेच्या भरात केलेल्या लैंगिक चुका शरीरावर, मनावर, व्यक्तिमत्त्वावर तर कधी व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर कायमस्वरूपाचे घाव करू शकतात. त्यामुळे मुलांच्या वाढीच्या काळात पालकांनी या सर्व गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे गरजेचे असते. मुलांसोबत त्याच्या मानसिक, शारीरिक, भावनिक बदलाच्या काळात मुलांसोबत योग्य संवाद साधत राहून खूप गरजेचे असतं. हा संवाद करताना एकूणच मुलांच्या विकासाच्या सर्व विषयावर त्यांच्याशी मनमोकळं बोलणं व त्यात शरीरात होणाऱ्या बदलांवर बोलणं ही अपेक्षित असतं की ज्यावर त्यांच्याशी कुणीच बोलत नाही, किंबहुना आपली समाजरचनेतही याची सोय नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालक वर्ग व एकूणच सर्व जबाबदार व्यक्तींना यावर गमभिर्याने विचार करून योग्य वेळी योग्य भूमिका घेत राहणं गरजेचे आहे. या विषयावर काम करणाऱ्या संस्थांसोबत समन्यव साधून आपले योगदान देऊन ती परिस्थिती बदलण्याच्या प्रक्रियेत नक्की सहभागी होऊया व आपल्या अवतीभोवती असलेल्या बालकांना सुरक्षित करूयात.
सौ नलिनी साठे (पुणे) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !
या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————