‘Sex Chat’ करताय!! जरा सांभाळून !!!
सुजाता बजाज
मुलगा किंवा मुलगी वयात आले की अनेक हार्मोनल बदल घडत असतात. अनेक विचार मनात येऊन जातात.खूप गोष्टी आकर्षित करतात. घरातून योग्य मार्गदर्शन हवे. काहीजण चुकीच्या मित्रांच्या संगतीत जातात, कुठेतरी गुंतात,वाईट मार्गाला जातात. यात mobile हातात आहे प्रत्येकाच्या, इंटरनेट बरीच माध्यमातून अनेक विषय हाताळले जातात. त्यातलाच एक प्रभावी विषय लिहते आहे. खुपजनांना प्रश्न पडला आहे आता मी काय लिहणार एवढा sensitive विषय ,नको लिहू बरेचजण inbox गाठला. काहीजण रागावले ही. पण मला काही सांगू वाटते आहे म्हणून लिहते आहे कारण या वयातून आणि अनेक प्रश्न डोक्यात घेऊन मी ही गेली आहे. नशीब इतकेच की आई ने खूप छान समाजवले सगळं योग्य वयात काय चूक ,काय बरोबर ते. त्यामुळे चूक कधी घडली नाही आणि अजून ही काही चुकीचे करावे वाटत नाही.
माझा आजचा विषय आहे सेक्स चाट . हा विषय वाचून अर्धे लोक अस्वस्थ झाली, अर्धे लोक उच्छुक झाली. बरेचजण माझ्यबद्दल वेगळा विचार ही करू लागली असतील. पण एक लक्षात घ्या fb वापरणारे प्रत्येकाला या विषयाला रोज सामोरे जावे लागते. अगदी साजूक आणि अडाणी कोणी नाही इथे. मला हा विषयात काहीच नावीन्य वाटत नाही आहे.
लोक लग्न का करतात याचे उत्तर माहीत आहे का ? अनेक उत्तर येतील. निसर्गाने स्त्री आणि पुरुष दोन वेगळे मानव बनवले आहेत. या दोघांमध्ये नैसर्गिक बदल घडत असतात जसे जिवंत राहण्यासाठी जेवण लागते तसेच माणसाची शारीरिक गरज ही असते. ती गरज पूर्ण होणे ही महत्वाचे असते. ही गरज भागविण्यासाठी लग्न करणे गरजेचे नाही . पण लग्न करून मान्यता दिली जाते की तुम्ही आता एकत्र राहू शकता. समाजात या कारणासाठी लग्न हा विधी आहे.
सेक्स विषयावर लोक जास्त इच्छुक आहेत कारण जग ही बदलत जात आहे. Tv, media, net या माध्यमातून अनेक गोष्टी लहान वयात सामोरे येतात. मग मुले नकळत सगळे जाणून घेतात त्यांना ही त्याचे आकर्षण असते. काहीजण प्रेमात ही पडलेले असतात. प्रेमात पडणे,gf, bf असणे ही खूप साधी गोस्ट आहे. कोणी ही कोणच्या ही प्रेमात पडतो आहे याचे कारण आकर्षण, अतृप्त असणे असे अनेक कारणे आहेत. मला fb वर खुपजण ब्रेकअप झालेलं दिसतात.काहीजण online, काही real life मध्ये.
या गोष्टी का घडत आहेत कारण घरी लोकांना एकमेकांना देण्यासाठी वेळ नाही. मग बरेच गोष्टी आपण मित्र, मैत्रिणीशी बोलतो काहीजण इतके गुंतात की प्रेमात पडतात, अगदी वाहवत जातात. अचानकपणे समोरची व्यक्ती गायब झाली की जीवनात एक पोकळी निर्माण होते मग बेचैन,अस्वस्थ होणे, मिस करणे, मग आपोआप मानसिकरित्या व्यक्ती कमजोर होत जातो. त्याला कोणाचीतरी गरज भासू लागते. मग नवीन व्यक्तीचा शोध चालू होतो. असे खूप प्रकार आहेत आजकाल. काहीजण मनोरुग्ण ही झाले आहेत यातून,भयानक आहे हे सगळे.
सेक्स चाट म्हणजे काय ?
हा प्रश्न मला ही पडला होता मी एकदा चाट रूम join केली 8 दिवस तिकडे होते आपली identity दिसत नाही ,मुलगा ,मुलगी काही कळत नाही. तिकडे बोलला जाणार विषय म्हणजे sex. यात सुरवात शरीराचे भाग , त्यांचा आकार ect मधून चालू होते. मग खूप खोलवर चर्चा केली जाते. समोरच व्यक्ती मानसिकदृष्ट्या हानिकारक आहे. मला आधी समजत नव्हते हा काय प्रकार आहे. मी बघत बसायचे काही शब्द ही समजत नव्हते मग google वर अर्थ शोधून मग समजायचे. 4 दिवसांनी लक्षात आले काय चालू आहे. मी कधी असले प्रकार केले नाही आणि आवडत ही नाही. नंतर मला किळस येऊ लागली. मी लेफ्ट केली चाट रूम. परत कधीच गेली नाही. मग मी विचार केला काय केले आपण या 5,6 दिवसात? काहीच केले नाही फक्त जो विषय महत्वाचा नाही त्यावर जास्त अभ्यास केला. यातून मनात विचारांचे काहूर माजले, बेचैन झाले. यातून मिळाले काही नाही फक्त काय असते हे समजले. हा विषय शास्त्रीय दृष्टीने किंवा शैक्षणीक पातळीवर घेतला तर बोलता येतो पण त्याचा दृष्टीकोन आणि हेतू ही तसा हवा maturity levle ही हवी. हा विषय चर्चा करणे किंवा चाट करणे याची गरज का भासते याची कारणे
1)लहान वयात आकर्षण
2)सारखे sex आणि porno video बघणे
3)ब्रेकअप
4)घरी आपला जोडीदार आपली शारीरिक गरज भागवू शकत नसेल.
5)नोकरीमुळे दोघांचे वेळ जमत नाही एकमेकांना वेळ देता येत नाही.
6)साधारण 23 to 29 वयातील मुले याबाबतीत जास्त exited असतात त्याचे कारण आहे शारीरिक बदल. हार्मोनल लेव्हल बदल होत असते.
7)काहीजण timpass म्हणून करतात आणि व्यसनी बनतात.
अश्या अनेक प्रकारच्या करणामधून याचा जन्म होतो. मला एक गोस्ट समजते जो विषय आपण जगापासून लपवून करतो किंवा चर्चा केली तरी लाज वाटते. हा विषयावर अनोळखी लोकांशी बोलून काय मिळणार आहे. फक्त exitement याने आपल्या मनावर आणि शरीरावर ही परिणाम होतो. शारीरिक गरज भागत नाही तर मानसिक समतोल आणि हर्मोनल लेव्हल बिघडते. पण हे सांगणार कोण? कारण हा विषय आमचा नाही बाबा ,आम्ही असे वाटतो का ,काहीपण विचारता तुम्ही अनेक शंका मनात घेऊन व्यक्ती जगत असतात. चूक किंवा बरोबर हे आपले आपणच ठरवत असतो. परिस्थिती आणि गरज या दोन्ही गोष्टीची सांगड घालून व्यक्ती वागतो. हे पण कडू सत्य आहे. मग आता यावर उपाय काय करावे ?
1) योग्य वाटेल आणि स्पष्ट मनमोकळे बोलता येईल अशा व्यक्तीशी या विषयी बोलावे.
2)असे कोणी सापडत नसले तर आपल्या फॅमिली डॉक्टर सोबत बोलून घ्यावे.
3) meditation म्हणजे ध्यान योग याने ही खूप फरक पडतो.
4)आपल्याला या गोष्टीसाठी प्रवृत्त करणारे व्हिडीओ बघणे टाळावे.
5)आपल्या जीवनसाथी हा विषय बलावा माझी ही गरज आहे मला एवढे पुरत नाही काय करता येईल यावर मार्ग काढावा.
6)हार्मोनल inbalnce ही एक मोठी समस्या आहे याचा योग्य तो उपाय करावा.
एकंदरीत आणि थोडक्यात म्हणजे जी गोष्ट लग्नानंतर चार भिंतीत केली जाते . त्या गोष्टीची चर्चा करणे म्हणजे सेक्स चाट. जे लोक आधीच करतात या गोष्टी त्यांना त्याची चव नसते. लग्नानंतर केली जाणारी गोष्टी ही लग्नानंतरच सुंदर असते. आता या वाक्यावर हसतील खुपजण. इथे असे हि नाही आहे की लग्न झाले नाही म्हणून हा विषयावर बोलतात उलट आहे लग्न झालेले लोक जास्त बोलतात. वर कारणे दिली आहेत आणि उपाय ही दिले आहेत. सेक्स चाट स्त्रिया ही करतात आणि पुरुष ही.
एक मानसिक विकृती म्हणजे सेक्स चाट आहे बाकी काही नाही. माझं मत असे आहे जी गोस्ट अनुभवायची असते त्याचा आनंद घ्याचा असतो ती बोलून किंवा चर्चा करून त्याची चव घालवतात लोक. तुम्ही यातून लवकर बाहेर पडावे आणि चांगले जीवन जगावे एवढीच इच्छा आहे.
मला जेवढे समजले किंवा माहीत आहे त्यावरून मी लिहले आहे योग्य ,अयोग्य माहीत नाही. अजून काही मुद्दे असतील तर नक्की कंमेंट्स करा मला ही माहीत होईल. फक्त एक विनंती आहे पोस्टला वेगळे वळण देऊ नका. साकारण जे लिहायचे ते तुम्ही लिहा. मी विषय लिहला म्हणजे मला आवड आहे असे नाही. मला या विषयाची किळस येते. मी चर्चा ही करत नाही पण गेले 2 महिने मध्ये असे प्रसंग समोर आले की मला लिहल्याशिवाय राहवले नाही.
धन्यवाद एवढी मोठी पोस्ट वाचली म्हणून आणि मला समजून घेतले म्हणून. काळजी घ्या आणि सुखी,आनंदी रहा बस इतकेच. ?
शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!
क्लिक करा!
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !