राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ६
कोणत्याही मानसिक समस्येची किंवा आजाराची सुरुवात ही चिंतेने होते. प्रत्येक व्यक्ती ही चिंतेचा अनुभव घेत असते. परंतु परीस्थीती जेव्हा व्यक्तीच्या अवाक्याबाहेर जाते आणि मनातली चिँता ही विस्फारते तेव्हा दडपण, भीती, झोप न लागणे, भूक न लागणे, आयुष्य शून्य वाटणे, आवडते काम करावेसे न वाटणे, घराबाहेर पडावेसे न वाटणे, अति विचार करणे, एकलकोंडे वाटणे इ लक्षणे व्यक्तीच्या ठिकाणी आढळून येतात.
कालांतराने व्यक्ती स्वतः आपल्या क्षमतेनुसार ही अवघड स्थिती आटोक्यात आणते, ज्यांना आटोक्यात आणणे अशक्य असते, त्यांच्या ठिकाणी वरील लक्षणांची हळूहळू सवय होऊन एक मानसिक समस्या किंवा आजार व्यक्तीच्या ठिकाणी जन्म घेऊ लागतो. हीच ती वेळ असते ज्याठिकाणी व्यक्तीला आपुलकीची, जिव्हाळ्याची, प्रेमाची आणि समजून घेण्याची गरज असते.
दुर्दैवाने अशा कोणत्याच बाबी व्यक्तीच्या सभोवताली आजकाल आढळताना दिसत नाहीत. अशावेळी त्या व्यक्तीने समुपदेशन घेणे हे केव्हाही उत्तम !
असाच एक ताजा अनुभव मागच्या आठवड्यात येऊन गेला. फार काही सांगत नाही, काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात. २५ वर्षीय तरुण, “ई टीव्ही” या नामांकीत वृत्तवाहिनीत पत्रकारीतेच्या नोकरीसाठी हैदराबादला गेला होता. त्या तरुणाला ब्लड प्रेशर चा त्रास होता. हार्ट अटॅक येईल की काय, या अति विचाराने त्याला त्याचे काम योग्य रीतीने करता येत नव्हते. १५ दिवसाची त्याने मेडीकल लिव्ह घेतली. महाराष्ट्रात आल्यानंतर पत्रकारितेचे स्वप्न उराशी बाळगणारा त्या तरुणाच्या मनात पुन्हा हैदराबादला जाण्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
खरंतरं त्या तरुणाला ब्लड प्रेशरच्या गोळ्यांपेक्षा स्वतःला ओळखण्याची जास्त गरज होती. ती मर्मदृष्टी येण्यासाठी त्याच्या मनात अगोदर किती प्रमाणात चिंता पसरलेली आहे, या बद्दल चाचणी घेऊन प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचा अर्थ त्या तरुणाला सांगण्यात आला. तसेच त्याच्या ठिकाणी असणाऱ्या सकारात्मक क्षमता-कौशल्य यांची नव्याने जाणीव करून दिली. मन आणि श्वास नियंत्रित ठेवण्यासंबंधित काही तंत्रे शिकविले गेले. यामध्ये सातत्य ठेवले जात आहे की नाही, याकडे विशेष लक्ष पुरविले गेले.
शिकविल्या गेलेल्या तंत्रांचे सातत्य ठेवल्याने त्याच्या ठिकाणी स्वतःच्या क्षमतांविषयी मर्मदृष्टी निर्माण झाली. आज तो तरुण हैदराबादमध्ये आपली नोकरी समाधानकारकपणे पार पाडतोय.
आणि विशेष म्हणजे ही समुपदेशन प्रक्रीया केवळ फोनवर घडली. आजपर्यंत नाही तो मला भेटला, नाही मी त्याला. पण फोनवर सुद्धा प्रभावी समुपदेशन घडून येते, याला पुन्हा पुष्टी मिळाली.
एका नवीन अनुभवासोबत पुन्हा भेटूया !
तूर्तास धन्यवाद !
■ अधिक माहीतीसाठी
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
————————————————————————-