Skip to content

मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १२

राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १२


या एका अनोख्या कुटुंबात खास एका व्यक्तीला मला भेटता आले. शेवटी त्यांच्या सोबत स्वतंत्र फोटो काढायचा मोह काही मला आवरता आला नाही. तो फोटो खाली दिलेला आहे. प्रसिद्ध चित्रपट बाहुबली सर्वांनाच माहीत आहे आणि हे गृहस्थ बाहुबली ऍनिमेटेड चित्रपट दिग्दर्शित करतात. ही त्यांची प्रोफेशनल ओळख. अमेझॉन प्राईमवर त्यांचे चित्रपट आपल्याला सहज पाहता येतात. भाच्याची करीअर कॉउंसिलिंग होणार म्हणून हे गृहस्थ खास हैदराबादवरून भेटीस आले. काउन्सिलिंगची सर्व प्रक्रिया त्यांनी माझ्याकडून समजून घेतली. आणि सत्राला सुरुवात झाली.
दोन्हीही पालकांपैकी काही वेळेस एक पालक सकारात्मक तर दुसरा पालक नकारात्मक असतो. सत्राची वेळ आणि दिवस ठरवताना सौ. पाटील यांनी आपल्या पतींच्या नकारात्मकतेची भूमिका स्पष्ट केली आणि सोबतच मिस्टर नसताना आपण सत्र पार पाडूया, अशा सूचना केल्या. परंतु सत्र मुलासाठी जरी असलं तरी त्यासाठी दोन्हीही पालक सकारात्मक असणे गरजेचे आहे, एकवेळेस मिस्टर सकारात्मक असून अनुपस्थितीत असले असते तर चालून जाते, परंतु नकारात्मक असल्यास सत्रात दिलेल्या शिस्तबद्ध गोष्टी हुबेहूब रीतीने अमलात आणता येत नाही. याला कारण एकतर नकारात्मकता आणि वरून सत्रातील अनुपस्थिती. म्हणून सत्र हे मिस्टरांसोबतच आणि समोरच होईल, असे सांगितले गेले.
पुष्कळ पालकांना कॉउंसिलिंग किंवा IQ आणि Aptitude टेस्ट हा काय प्रकार आहे, याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अशा पद्धतीची नकारात्मकता त्यांच्या ठिकाणी आलेली असते. आणि बाहेर DMIT आणि Mid-Brain Technology सारखी आकर्षक नावे देऊन लुटणारी टोळी सज्ज आहेच. म्हणून वाटले की होकारात्मकतेत बदलण्याची ही चांगली संधी आहे.
शेवटी समाधान याचेच आहे की, पतीदेवांना यातलं गांभीर्य समजले. आणि आलेल्या निकालाबद्दल आपल्या पुढच्या जबाबदाऱ्या साध्या भाषेत सांगून त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसले.
तो अनुभव मनात साठवून आणि आगामी चित्रपटात माझ्यासाठी काही रॉल आहे का, असा गृहस्थांना विनोदी टोला मारून त्या सर्व कुटुंबाची रजा घेतली.
एक नवीन कुटुंब घेऊन पुन्हा भेटूया……
■ अधिक माहीतीसाठी
***
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
क्लिक करा !

————————————————————————-

1 thought on “मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १२”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!