Skip to content

अन वडिलांनी शंतनूला जबरदस्ती अभियांत्रिकीला पाठवलं!!

पालक : दोस्त कि घोस्ट…..


ईश्वरी कि. शिरुर
अंबरनाथ


प्रस्तुत कथा मुंबईच्या स्मार्टसिटी मधील एका उच्चभ्रू अशा सावंत कुंटुंबाची आहे. अपत्य झाल्यावर मुंबईत स्थायिक झाल्याने घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई यांच्यासाठी तशी नवीनचं. सावंतांचं कन्यारत्न स्वरा आणि वंशाचा दिवा शंतनू अशी ही नवसाची दोन अपत्ये. मूल जन्माला येऊन मोठं होईपर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पालकांचं मुलांसोबतचं नातं बदलत असतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तर पालक बालक होतात नि बालक पालक होतात.

स्वरा शंतनू पेक्षा चार वर्षाने मोठी, अभ्यासात हुशार, गोड गळ्याची आणि स्वावलंबी स्वभावाची तर शंतनू मात्र खोडकर आणि हट्टी स्वभावाचा. पण घरात आजी नावाचं देवभोळं व्यक्तिमत्व असल्याने सावंतांच्या मुलांवर पाळण्यात असल्यापासूनच सुलभ संस्कार झालेले. हा आता घरातलं शेंडेफळ म्हणून शंतनूचे फार लाड पुरवले जात. शिवाय सावंत मंत्रालयात उच्च पदावर आणि सौ. सावंत या गृहलक्ष्मी. घरात लक्ष्मी जणू पाणी भरत असल्याने आर्थिक चणचण अजिबात नव्हती. दिवसामागून दिवस जावे तसे सावंतांची अपत्ये मोठी होत गेली. आता मात्र आधी पुरविले जाणारे लाड बऱ्यापैकी लोप पावले होते.

स्वरा जगाच्या पाठीवर नेहमीच एक पाऊल मागे असायची. त्यामुळे कोणतीही गोष्ट तिच्यापर्यंत येई पर्यंत ती गोष्ट इतिहास जमा झालेली असे. ती वयात आली तेव्हाही तिच्याबद्दल असेच काहीसे घडले. वयात येईपर्यंत तिला या नैसर्गिक क्रियेची साधी कल्पनाही नव्हती. आणि, वयात आल्यानंतरची योग्य ती सूचना देखील तिला तिच्या काकी कडून मिळावी हे नवलच! मुळात घरातला संवाद एवढा खुंटावा का? या विचाराने स्वरा नेहमी त्रस्त होत असे. शिवाय आजी ने वयात आल्यावर सांगितलेल्या भयावह अंधश्रद्धा स्वरासाठी गळफास भासू लागल्या होत्या;असो.

आई, वडील, आजी आणि मुलं यांमध्ये वयोमानानुसार असलेले अंतर मुलांच्या प्रत्येक आवडीनिवडींना मान्यता देईल असे नव्हते. शंतनूला अभ्यासेतर सर्व गोष्टींची आवड आहे हे माहीत असूनही सावतांनी त्याच्या मानगुटीवर बसून अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यावा यासाठी हट्टहास धरला. प्रसंगी शंतनू मोठ्या पेचप्रसंगात सापडला. अशी सगळी तुमची स्वप्न आमच्यावर लादली तर आम्ही पाहिलेल्या स्वप्नांच काय? हा प्रश्न शंतनू पुढे सतत ऊभा राहत होता. आणि शेवटी तेच झाले जे वडीलांना अपेक्षित होते. गुणवत्ता आणि क्षमता नसूनही बाबांच्या ओळखीवर शंतनू अभियांत्रिकी क्षेत्रात ढकलला गेला.

आता स्वरा आणि शंतनू दोघांचेही कुटुंबावरचे प्रेम जणू आटलेच होते. दोघांचेही आता घरात मन रमत नसल्याने संवादाची भाषा आगळं वेगळं रुप धारण करू लागली होती. सतत काही तरी निमित्त साधून हे भाऊ बहिण घरातून पळ काढत असे. शाळेच्या पालकसभेला कधीही उपस्थित न राहिलेले बाबा त्यांची स्वप्ने आमच्या मानगुटीवर लादून पुर्ण करुन घेताय हे काही मुलांना पटण्यासारखे नव्हते. अभियांत्रिकी क्षेत्र शंतनू ला काही झेपण्यासारखे नव्हते त्यामुळे त्याने अर्ध्यातच ते सोडून संगीत क्षेत्रात प्रवेश मिळवला. अर्थातच त्याची दोन वर्ष वडीलांनी लादलेल्या चुकीच्या निर्णयामुळे वाया गेली.

पालकत्व स्विकारणं आणि परिपूर्ण पालक होणं यात समतोल साधता आला पाहिजे. मुलांच्या प्रौढ वयात त्यांच पालक नाही तर मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधावा. मुलांना त्यांच्या स्वप्नांना गगनभररी घेण्यास पाठिंबा द्यावा. सावंतांच्या शंतनू आणि स्वरावर आलेली वेळ कोणत्याही पाल्यावर येणार नाही याची दक्षता प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे.



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा

2 thoughts on “अन वडिलांनी शंतनूला जबरदस्ती अभियांत्रिकीला पाठवलं!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!