मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १०

राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १०


स्वतः पेशाने मराठी शाळेत एक शिक्षिका असलेल्या आणि गाण्याची आवड जोपासून मुलांनी सुद्धा गाण्याचा छंद जोपासावा असे मनोमनी वाटणाऱ्या आपल्या समूहातीलच एक प्रभावी सदस्य श्रीमती स्नेहा वाघमारे यांनी सध्या ८ वीत शिकणाऱ्या आपल्या मुलीच्या ‘करीअर समुपदेशन’ साठी पुण्यातल्या वारजे इथे बोलावले.
गाण्याची इतकी आवड आहे कि या वयातही कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी पार पाडून गाण्यांच्या शिकवणुकीला जातात. हे कसं बुवा ? हा प्रश्न विचारल्यानंतर मिळणारं उत्तरं फार अप्रतिम होतं, ते असं कि, “पालकांना पाहून मुलंही उत्तेजित आणि प्रोत्सहीत होत असतात. पालक जर चाकोरीबद्ध असतील, तर त्यांनी मुलांकडूनही नावीन्यतेची अजिबात अपेक्षा करू नये.”
काही काही पालक मुलांच्या पालकत्वाची भूमिका साकारताना वास्तव जगतात अत्यंत सक्षम असतात. केवळ हल्ली भरमसाट करीअर स्पर्धा दिसू लागल्यामुळे पालकांसकट मुलंही कोठेतरी गोंधळून जातात किंवा मुलांमध्ये इतके कला-कौशल्य विकसित झालेले असतात की नेमकं योग्य क्षेत्राची नाळ ओळखणे काहीसे कठीण होऊन जाते.
याचीच प्रचीती पुनः पुन्हा अनुभवामार्फत समुपदेशन करताना येत राहते. या जबाबदार युक्त स्थितीतही ते आपल्या गाण्याचा छंद जोपासत आहेत आणि त्यामागे मुलांचाही सर्वांगीण विकास होणे, ही छुपी ऊर्जा हे फार काहीतरी वेगळं सांगून जातं. अर्थात आपल्या समूहात असे बरेच पालक असतील जे याही पद्धतीपेक्षा काहीतरी निराळं आयुष्य जगत असतील, ते सर्व पालक इतरांसाठी नक्कीच एक नवीन अनुभूती आहेत. केवळ ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं.
तसेच या पालकांचा ‘करीअर समुपदेशन’ यातील पेपर-पेन्सिल चाचण्या यांवरच विश्वास होता, ही त्यांची आवडलेली मुख्य गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्यांनी बनवलेली पाव-भाजी व्हा… काही तारतम्य बाळगावे लागतात नाहीतर ४-५ पाव सहज फस्त केले असते.  आवडलं नाही का ? आपण प्रश्न केला होता, त्याचं खरं उत्तर इथे सर्वांसमोर देत आहे.
रिपोर्टमध्ये आलेल्या क्षेत्राकडे आपल्या मुलीला उज्वल यश मिळो, अशी एक इच्छा बाळगतो आणि आपण जो विश्वास ठेऊन बोलावलं त्यासाठी धन्यवाद देतो.
एका नवीन कुटुंबासोबत पुन्हा भेटूया !
■ अधिक माहीतीसाठी
***
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
क्लिक करा !

————————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.