मुलांना लैंगिक शिक्षण देताना पालकांसाठी महत्वाचे ‘८’ नियम !!!
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
१. पालकांनी लैंगिक शिक्षणाबाबत स्वतः अभ्यासू असले पाहिजे. आपली मते शास्त्रशुद्ध असतील तरच ते मुलांना समजावू शकतात. तसेच संशोधनातून येणाऱ्या नवीन माहितीबद्दल अपडेट असावे.
२. आईने मुलीला व सुनेला, तर वडिलांनी मुलांना लैंगिक ज्ञान द्यावे किंवा कोणताही संकोच न बाळगता आई-वडिलांनी एकत्रितपणे मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे.
३. कोणतीही कामुक भाषा, कामुक चित्र, कामुक स्पर्श व कामुक हावभाव न करता माहिती द्यावी.
४. स्त्री व पुरुष जननेंद्रियांबाबत बोलीभाषेतील शब्द वापरू नयेत, फक्त शास्त्रीय भाषेतील शब्दांचाच वापर करावा.
५. लैंगिक शिक्षण हे पूर्ण बंद खोलीत व आई – मुलगी किंवा वडील – मुलगा असतानाच द्यावे. जेवणाच्या टेबलावर, टीव्ही पाहताना या विषयावर बोलू नये.
६. मुले-मुली कितीही लहान व मोठी असली तरी त्यांच्या खाजगी जीवनाचा आदर करावा स्वतःचे खाजगी आयुष्य त्यांना सांगून दडपण आणू नये.
७. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची थट्टा करू नये. एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहीत नसल्यास खोटे उत्तर न देता माहिती मिळवून मग मुलांचे शंकानिरसन करावे.
८. पालक महिन्यातून एखाद्या रविवारी लैंगिक शिक्षणाचा तास मुलांसाठी घेऊ शकतात.
लैंगिक शिक्षणाचे बाहेर कोठेही अद्याप क्लास नाहीत. भविष्यात कदाचित ते निघतीलही. “मुलांसाठी लैंगिक शिक्षण का महत्वाचे” या वाक्याखाली प्रभावी मार्केटिंग करण्यात हे बाजार मंडळी जराही मागे सरकणार नाहीत. आणि येत्या काळात तो ट्रेंड सुद्धा पहायला मिळेल.
जवळच्या विश्वासू व्यक्तींनी मुलांना असे शिक्षण दिलेले केव्हाही उत्तम असेल.
म्हणून पालकांनो आपल्या मुलांशी दिलखोस्तपणे बोला, नाहीतर ते उत्तर मिळविण्यासाठी बाहेर बोलतील आणि ते आत्ताच्या स्थितीत परवडणारंही नसेल आणि पचणारंही !
शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे, आत्ताच मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————
Short and sweet information