चिडखोर मुलांना शांत कसे करायचे❓
प्राजक्ता पंडित
समुपदेशक, पुणे.
हल्ली मुलांचा राग,चिडचिड खूप वाढल्याचे जाणवते.त्याला बरीच करणेही आहेत. तर मुले जेव्हा खूप आकांडतांडव करतात त्यावेळी नेमके काय करावे हे पालक म्हणून उमजत नाही आणि बरेचदा पालकांचे वर्तन मुलांच्या चिडचिडेपणात भर घालायला कारणीभूत ठरते. पुढील ४ टीप आपल्याला अश्या परिस्थितीत नक्की उपयुक्त ठरतील.
१. रागाचे कारण समजून घ्या:
जरी तुम्हाला मूल का चिडले आहे हे माहिती नसेल तरीही तुम्ही ते समजून घेतलंय असे भासवा. त्यामुळे त्यांचा अर्धा राग कमी होईल,कारण त्यांना समजून घेतले गेल्याची भावनिक गरज शमेल. व पुढील सवांद साधायला मदत होईल.
२. चुकीच्या वागणुकीवर सल्ले नकोत:
जेव्हा एखादी व्यक्ती चिडते तेव्हा स्वतःच्या चूक , दोष ऐकण्यात कुणालाही स्वारस्य नसते हे लक्षात घ्या. त्यामुळे रागात अजून भर पडण्याची शक्यता असते.पालक- मुलांच्या मध्ये दुरावा निर्माण होतो.
३. मुलांना मदतीची विचारणा करा:
रागाचे कारण समजून घेऊन त्यांना नेमकी कुठे मदत हवी आहे ते समजून घ्या. किंवा कारण कळत नसेल तर मुलांना सहज मिठीत घ्या, मुलांना शांत होण्यासाठी बरेचदा हेही पुरे होते.
४. संगीत लावा:
मुलांच्या आवडीचे संगीत लावा. त्यामुळे मन त्या परिस्थितीतुन परावृत्त होईल व भावनांना शांत करण्यास मदत करेल.
एकंदरीत मुलांचं वय हे एका जिज्ञासेने भरलेले असते. त्या जिज्ञासेला मोकळी पायवाट मिळेल, अशाप्रकारच्या योग्य दिशा उपलब्ध करून देणे हे फार महत्वाचे आहे. एकदा दिशा चुकली की मुलांमध्ये असंख्य वर्तन समस्या निर्माण होऊन त्यांच्या ठिकाणी शैक्षणिक मागासलेपण येऊ शकते.
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा
Tts true
Good
Mulana khup samjun ghetal tar tyana ti savay passt jate. Mag Tyana Tich savay lagte. Ashaveli Tyana samjun ghyaych ki tyana emotionaly strong banvaych nem Kay mahatvach ast
खूप सुंदर