राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
?मुलांमधील हट्टीपणा?
लहानपणापासून मुलांमधील या हट्टीपणाला खत-पाणी मिळत गेल्यास किंवा त्याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढे चालून एक गंभीर वर्तन समस्या मुलांच्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यात ही दाट असते. परिणामी, मुलांच्या माध्यमिक शिक्षणावर तर त्याचा परिणाम हा होतोच शिवाय व्यक्तीगत आयुष्यही फार संकुचित झाल्यासारखे वाटते. परंतु जर वेळीच दक्षता व उपाययोजना केले तर वर्तनात सुधारणा होऊ शकते. मुलांच्या या हट्टी स्वभावामागे बरीच कारणे जरी असली तरी मुख्य घरातील वातावरण, शालेय वातावरण आणि सभोवतालीन वातावरण या तीनही मुख्य वातावरणात सदोषता असल्यास त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असतो. एका केसस्टडी मार्फत याचे स्पष्टीकरण करूया.
●केस :-
अमोल नुकताच ८वी ला गेलाय. ६ वी पर्यंत अमोल हा आपल्या आई-बाबांना त्याच्या अभ्यासाबद्दल एकही तक्रारीची जागा देत नव्हता. हल्ली-हल्ली अमोल आई-बाबांसमोर आक्रस्ताळेपणा करतो. कारण आई-बाबांचे म्हणणे आहे की, मागच्या वर्षी म्हणजे ७वी ला अमोल अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत होता. आता या वर्षीपासून आई-बाबा सारखे “८वी चे वर्ष आहे सांभाळून” या वाक्याने सारखे त्याला टोचत असतात. त्यांची ही वाक्य ऐकून अमोल एकटक रागाने त्यांच्याकडे पहायला लागलाय, त्यांना न जुमानता त्यांच्यावर जोरात ओरडायला लागलाय, तासानतास वडीलांच्या मोबाईल मध्ये काहीतरी करताना आढळतो. जर त्याला असे करण्यापासून रोखले तर तो आई-बाबांना नापास होईल, जेवणार नाही, कोणतेही काम करणार नाही, अश्या धमक्या देतो. त्याच्यातील हे विचित्र वर्तन पाहून आई-बाबा हैराण झाले आहेत. मुळात अमोल हा अत्यंत शिस्तप्रिय, पटकन मिसळणारा आणि महत्वाचे म्हणजे चारचौघात त्याचे अभ्यासाबद्दल कौतुक होईल असे वावरणारा होता. मग अमोलमध्ये ही वर्तन समस्या कशी निर्माण झाली ? शाळेतल्या प्रत्येक गोष्टी आई-बाबांबरोबर शेअर करणारा अमोल आज त्यांच्यापासूनच दूर का पळतोय ? हट्ट का सोडत नाही ?
●लक्षणे :-
१) एखादी अतार्किक बाब मनात आली कि ती स्वतःकडून आणि जास्तीत जास्त इतरांकडून पूर्ण झाल्याशिवाय अशी मुलं स्वस्थ बसत नाही.
२) यांचा हट्टीपणा इतका पराकोटीला गेलेला असतो कि काही मिनिटापर्यंत ज्यांच्याशी ते अत्यंत नम्रपणे वागलेले असतात, त्यांच्याकडेच क्षणात विक्षिप्त होतात.
३) कोणत्या वेळी कोणता हट्ट धरायचा हे या मुलांना बरोबर माहीती असते. म्हणजेच याबद्दल ते फार चपळ भूमिका बजावतात.
४) भर रस्त्यात हवी असलेली वस्तू न मिळाल्यास सर्वांसमोर आदळआपट करतात.
५) धमक्या देतात, गृहीत धरतात, तात्काळ हवे असलेल्या गोष्टीसाठी तात्पुरते ‘हो’ ला ‘हो’ म्हणतात.
●कारणे :-
१) आई-बाबांपैकी कोणीही एक व्यक्ती जर त्यांच्या लहानपणी हट्टी असल्यास अनुवंशिकतेमार्फत ते पुढच्या पिढीकडे संक्रमित होऊ शकते.
२) घरातील एखादा व्यक्ती म्हणजेच मोठा भाऊ किंवा बहीण हट्टी असल्यास अनुकरणाने ते वर्तन मुलं शिकतात.
३) दोन्हीही पालक नोकरी करणारे असल्याने आणि मुलांना समाधानकारक वेळ देता येत नसल्याने पुढे चालून अशी वर्तन समस्या निर्माण होऊ शकते.
४) घरातील मुल अतिशय लाडावलेले असल्याने, प्रत्यके हवी असलेली वस्तू त्याला मिळू लागल्यामुळे मुलांच्या ठिकाणी हट्टीपणा निर्माण होतो.
५) जर घरात मुलांना स्वातंत्र्य मिळत नसेल, म्हणजेच त्यांच्या आवडी-निवडीला विचारले जात नसेल किंवा गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळू लागले कि मोठे होऊन अशी मुलं अधिकार गाजवायला लागतात.
●उपाय :-*
१) सर्वप्रथम मुलांमधील हा हट्टीपणा कुठून उदयास आला आहे, याची शहानिशा करावी. जर तो घरातूनच उद्भवला असल्यास अत्यंत नम्रपणे त्याचा स्वीकार करावा.
२) मुलांशी त्यांच्या वयात जाऊन संभाषण करा, त्या वयातल्या निरनिराळ्या विषयांवर चर्चा करा. ही प्रक्रिया इतकी सोपी आणि सरळ आहे कि आपले आई-वडील आपल्याला वेळ देताहेत हे पाहूनच मुलं सुखावतील.
३) हट्ट केलेल्या बाबींविषयी शेवटपर्यंत सामंजस्यानेच बोला, मग तो हट्ट दरदिवशी होत असेल तरी सुद्धा. असे केल्याने मी चुकतोय की काय ? कारण आई-बाबा दोन्हीही एका विषयावर एक मत ठेऊन मला समजावत आहेत, ही जाणीव मुलांच्या ठिकाणी जन्म घेईल.
४) चार-चौघात किंवा भर बाजारात केलेल्या हट्टाला बळी पडू नका, कारण एकदा का तुम्ही बळी पडलात की पुढच्या तशाच आव्हानांना सामोरे जायची तयारी ठेवा. कारण तुम्ही कसे वागत आहात यावरून तुमची मुलं कशी वागतील हे ठरत असते.
५) त्यांच्या हट्टाची एकवटलेली उर्जा ही दुसरीकडे वळवा. म्हणजेच त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवा, आवडीच्या ठिकाणी फिरायला घेऊन जा किंवा त्यांच्यासोबत खेळ खेळा. जसे – क्रिकेट, फुटबॉल इ.
शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————-