(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ८
“सर, मुलगा आमचं ऐकत नाही, कोणतीही गोष्ट जर त्याच्या मनाविरुद्ध झाली कि, घरातल्या वस्तूंची तोडफोड करतो. काही वेळेस तर त्या वस्तू आमच्या अंगावर फेकतो. रात्री तासंतास मोबाईलवर PUBG खेळत असतो आणि रोज ११ वा. उठतो. यंदा १२ वी चे चार विषय गेलेत. आम्हाला म्हणतो कि, मला अभ्यासच करावासा वाटत नाही. कालच्या ३१ डिसेंबर ला पार्टीसाठी बाबांकडून पैसे मागत होता, मी साफ नकार दिला, तर माझ्यावर भयंकर चिडला. रात्रभर आम्हा दोघांना त्रास दिला. घरातल्या लाईट्स चालू ठेवणे आणि मोठ्याने गाणी लावणे वगैरे. हे त्याचे रात्रभर सुरूच होते.”
सौ. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तिकडचा आजूबाजूचा जर परिसर पाहीला तर मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने फार अपूर्ण असलेला वाटतो. कारण मुलांना घरातनं बाहेर निघावं आणि चार-चौघात मिसळावं असं जर आजूबाजूचं वातावरण नसेल तर मुलांचा विकास खुंटतो. बाकी झोपडीत सुद्धा लोकं गुण्यागोविंदाने राहतात. असो,
मुलाशी व्यक्तीशः बोलल्यानंतर एकंदरीत पालकत्वावर समुपदेशन केंद्रीत केले. आई मुलाला जास्तच बोलते, तर बाबा फार कमी बोलतात, आई एखादी गोष्ट करण्यास नकार देते, तर बाबा आईच्या नजरेआड त्या गोष्टी मुलाला पुरवितात. (कारण लहानपणी मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे) म्हणून येथे आई मुलाची नावडती आणि बाबा आवडते बनले. असेच बालपणापासून आई-बाबांची रस्सीखेच पाहत मुलगा आज तरुणपणात पदार्पण करीत आहे. आईला गृहीत धरून बाबांशी कसं वागायचं, याचे प्रशिक्षण त्याला अजाणतेपणाने घरातूनच मिळत गेले आणि जेव्हा त्याची ही लक्षणे प्रकर्षाने दिसू लागली, तेव्हापासून बाबांनीही विरोध करायला सुरुवात केली. आज अचानक बाबा का विरोध करताहेत !!, याचे संपूर्ण खापर त्याने आईवर फोडले. आता तो आईचा द्वेष करून बाबांनाही गृहीत धरतोय.
पालकांनो, या ठिकाणी जास्त काळजी करणारी आई चुकली की लाड करणारे बाबा, हे महत्वाचे नसून तर मुलाबद्दल कोणताही निर्णय देताना दोघीही पालक एकत्र येऊन मुलाला समजविण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. जेव्हा दोघीही पालकांचे एकमत नसते, म्हणजेच आईचे टोक या बाजूला आणि बाबांचे त्याच्या विरुद्ध बाजूला, तर हे सर्व प्रसंग मुलं छुप्या रीतीने निरीक्षण करीत असतात आणि यामुळे मुलं ही शेफारतात.
तसेच आणखी एक मुख्य कारण म्हणजे, फार कमी वयात या मुलाकडे आलेला फोन आणि त्यातही खेळला जाणारा PUBG हा व्यसनाधीन गेम. इथेसुद्धा आपण पालक वर्गच चुकतोय. विनाकारण कसलीही गरज नसताना आपण महागडे फोन स्वतःसाठी घेतो. कारण वाहत्या दिशेने स्पर्धेत असल्याचे समाधान मिळते. तो फोन घरी आला की १०० टक्के मुलं हाताळणार, कारण कोणत्याही आकर्षक गोष्टींकडे मुलं आकर्षित होतात, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून महागडे फोन घेतले जात असले तरी १० दिवसातच त्यामधली आपली रुची कमी होते, पण मुलांची दिवसेंदिवस वाढते. म्हणून गरज नसतात महागडे फोन घेण्यापेक्षा तोच पैसा मुलांच्या सर्वांगीण विकासात वापरणे, हे उत्तम नाही का ? (स्विमिंग, कराटे, डान्स, स्केटींग इ.)
म्हणून वरील कुटुंबाबाबत जे घडलं किंवा अशा हजारो कुटुंबाबाबत जे घडत आहे, ते तुमच्यासोबतही न घडो, म्हणून,
जागरूक रहा, जागरूक रहा, जागरूक रहा !
(मुद्दामहून कुटुंबासोबत काढलेला फोटो इथे टाकत नाहीये)
■ अधिक माहीतीसाठी
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
————————————————————————-
फारच छान? अश्या प्रकारे पालकांना समज देण्याची फार गरज आहे मोबाईल च्या अती वापराने मुल पालकांशी गैरवर्तन करू लागली आहेत पालकांना या मुलांशी कसे वागायचे याचे counseling करणे गरजेचे आहे