आपल्या मुलांना पैशाचं मॅनेजमेंट शिकवणं महत्वाचं!
घरातील मुले साधारण आठ-दहा वर्षाचे झाले की त्याला पैशाचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी त्याला समजेल अशा भाषेत सांगायला सुरुवात करा. नको त्या गोष्टींवर पैसे खर्च न करण्याची शिकवण लहानपणीच मिळणे आवश्यक आहे. फाईनन्सची ही ए.बी.सी.डी आई आणि वडीलच मुलांना शिकवू शकतात.
कारण आज तुम्ही मुलांना पैशाचं मॅनेजमेंट शिकवलंत तर तेच त्यांना पुढे उपयोगी पडणार आहे. तसेच शिकवण्याची भाषा ही सौम्य आणि नम्र असावी. कोणीही एक पालक जास्तच काटकसरी आणि जास्तच खर्ची असेल तर पुढे चालून मुलेही तसं वागण्याची शक्यता ही दाट असते.
म्हणून मुलांना कोणतेही ज्ञान देण्याअगोदर पाहिले ते आत्मसात करून त्यांच्या वागण्यातनं दिसेल असं वातावरण बनविणे आवश्यक आहे.
पुढे काही सोपे ट्रिक्स आहेत…
● घरखर्चाविषयी माहिती द्या
टीनेजर मुलांना घरातील खर्चाविषयी सांगा. त्यांना किराणा सामानाची यादी करायला सांगा. त्याचा हिशेब करायला सांगा. हिंदीत एक चांगली म्हण आहे, ‘आटे दाल का भाव मालूम पडणा’ आणि हे खरंच आवश्यक आहे. आपण खातो ते डाळ किती महाग आहे, ती ताटात टाकून देता कामा नये याची जाणीव त्यांना आपसूक होईल.
● तुमच्या पगाराविषयी सांगा
आपल्या आई-वडिलांना किती पगार आहे, याची माहिती मुलांना असायला हवी. आपल्या घराची खरी आर्थिक स्थिती काय आहे, याची स्पष्ट कल्पना मुलांना द्या. आपल्याला गरिबीत राहावे लागते, पण माझ्या मुलांना मी काही कमी पडू देणार नाही, असे अनेक पालक म्हणत असतात. या वाक्यातील प्रेम किती आणि भाबडेपणा किती हा फरक लक्षात घेतला पाहिजे.
● बचतीचे महत्व
पैशाला सर्वस्व मानण्याचे कारण नाही तसेच त्याचे महत्त्व टाळणे देखील योग्य नाही. भविष्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी बचत गरजेची आहे. लहान मुलांना बँकेत घेऊन जा, टीनेजर मुलांना बँकेत खाते उघडून द्या. घरातील पिगीबँक तर बचत शिकवण्याची उत्तम गोष्ट आहे यात पैसेही साठतात व आनंदही. तसेच बचतीपेक्षा गरजेपुरते कमविणे ही किती आवश्यक या दोघांमधला फरक समजावून सांगा.
● बिले भरायला द्या
लाईट बिल, फोन बिल, इंटरनेटचे बिल, घरातील काही दुरुस्ती केली असेल तर त्याचे बिल अशा गोष्टी हळूहळू मुलांना भरायला द्या. तुम्ही बिलासाठी दिलेले पैसे ते कसे वापरतात यातून तुम्हाला ते पैशांकडे कसे पाहतात हे लक्षात येईल.
● कमवा आणि शिका
अनेक कॉलेज आणि महाविद्यापीठांमध्ये कमवा आणि शिका ही योजना राबवली जाते. ती फक्त गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे, पण खरं तर ती सगळ्यांनाच लागू करावी अशी आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर त्याचा प्रयोग नक्की करू शकतात. जसे की उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन-चार तासाचे पैसे मिळवता येईल, असे काम करणे, कष्टाचे पैसे मिळवणे आणि ते खर्च करताना मनात नेमकी काय भावना येते याची कल्पना फक्त अनुभवातूनच येऊ शकते. म्हणून त्यासाठी मुलांना पूर्ण मोकळीक द्या.
इतरही अनेक असंख्य ट्रिक्स तुम्हाला सापडतील. केवळ तुम्हीच मुलांचे पुरावठादार आहात, असा विचार मनात असेल तर मग मात्र हा लेख तुमच्यासाठी नाही.
हा लेख त्यांच्यासाठी आहे, ज्यांना आपल्या मुलांमध्ये एक सक्षम व उत्कृष्ट मनी मॅनेजर बनवायचे आहे. जेणेकरून अक्खा देश जरी कर्जात बुडाला तरी त्याचा विशेष ताण मुलांवर पडणार नाही.
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा