Skip to content

पालकांनो, तुमच्या अपेक्षांचं डोंगर बुलडोझरने पाडा !

पालकांनो, तुमच्या अपेक्षांचं डोंगर बुलडोझरने पाडा !


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


परवाच पेपरात एक बातमी वाचण्यात आली, टेबल टेनिस खेळणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलाला अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली पण त्या वर्षीच्या एका स्पर्धेत बक्षीस मिळाले नाही, त्याच्या वडिलांनी त्याला खूप ओरडले. इतकं की त्याला आता टेबल टेनिसंच खेळूशी वाटत नाही.

मुलं महत्त्वाची की बक्षीस ??

अनेक पालक आपल्या लहानपणाच्या अपूर्ण इच्छा-आकांशा आपल्या मुलांकडून पूर्ण करून घेतात. मुलं ही आपली गोल्ड मेडल्स नाहीत. अनेक वेळा दहावीत मुलांना चांगले मार्क्स मिळाले की पालक सरळ त्यांच्यासाठी निर्णय घेऊन मोकळे होतात. मिळालेत ना चांगले मार्क्स, मग जा सायन्सला बन डॉक्टर, बन इंजिनिअर. पण मुलांना काय हवंय त्यांच्या काय इच्छा आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही.

एकंदरीत मुलांच्या वयाप्रमाणे पालकत्वाचा दृष्टिकोन बदलायला हवा. मुलं लहान असताना त्यांच्यावर संस्कार करावेत, पण इन्स्ट्रक्शन देऊ नये. वारंवार दिलेल्या इन्स्ट्रक्शन मुळे मग मोठेपणी मुलंही पालकांना इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात. त्यांना चांगले नागरिक बनवावे. हळूहळू त्यांच्या जबाबदारीपासून मुक्त होऊन त्यांची जबाबदारी त्यांना स्वतःला घेण्यास शिकवावे. नाहीतरी मुलगा आठवीला जरी गेला तरी त्याच्या शाळेची, आंघोळीची आणि जेवणाची सगळी तयारी ही पालक स्वतः करतात. म्हणजेच क्षमता असूनही पालकांकडून एक आधाराची काठी त्याला नकळतपणे मिळत असते जी शास्त्रीयदृष्ट्या अतार्किक आहे.

मुलांकडून अपेक्षा जरूर करा पण ती अपेक्षा अगोदर तुमच्या कृतीतुन बाहेर पडणं फार गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमच्या सभोवताली मुलांसाठी निर्माण केलेली अपेक्षा ही अस्तित्वाला धरून असेल, जर तुमची अपेक्षा ही केवळ तुमच्या बोलण्यातून बाहेर पडत असेल तर तुमच्या मुलांसाठी ती अपेक्षा एक दबाव ठरेल. म्हणून त्या अपेक्षांमागे 50% एफर्ट तुमच्या कृतीतुन बाहेर यायला हवेत. तर त्या अपेक्षांचा नेमका अर्थ अगदी सहजरीत्या तुमच्या मुलांच्या मेंदूपर्यंत पोहचेल.

आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडून निर्माण केली गेलेली अपेक्षा ही तुमच्या मुलांच्या क्षमतेपलीकडे असू नये. तसेच ती मुलांच्या आवडीनिवडी व छंद यांच्याशी जास्तीत जास्त समरूप असावी.

इतकं काटेकोरपणे आणि सूक्ष्मपणे तुम्हाला तुमच्या अपेक्षांचा विचार करावा लागणार आहे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

1 thought on “पालकांनो, तुमच्या अपेक्षांचं डोंगर बुलडोझरने पाडा !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!