‘इंडिपेंडट’
सुनील गोबुरे
आठ वर्षाचा पुष्कर रडत रडत घरी आला.
‘आई मी शाळेत नाही जाणार. अथर्व मला मारतो..आज पण मारलं त्याने मला शाळा सुटल्यावर. तू ये ना उद्या शाळेत..!’
पुष्कर हुंदके देतच म्हणाला.
पुष्करची आई, प्राजक्ता त्याला जवळ घेत म्हणाली
‘हो रे बाळा…तू मागे पण बोललास मला. मी आज तुझ्या पप्पाशी बोलते संध्याकाळी बरं…आम्ही दोघेही येउत उद्या तुझ्या शाळेत. बघतेच तो अथर्व कोण आहे जो आमच्या पुषूला उगीच त्रास देत असतो..ओके?’
पुष्करने डोळे पुसत हो म्हंटलं..
‘ चल आता, कपडे बदल, हात पाय धू..आणी खाउ केलाय तो खाउन खाली खेळायला जा..’ प्राजक्ता त्याच्या डोक्यातून हात फिरवत म्हणाली.
पुष्कर सोसायटीत खाली खेळायला गेल्यावर प्राजक्ता टेरेस मधे उभी राहून खाली गार्डन मधे खेळणा-या मुलांचं खेळणे पहात रहायची. आजही पहात असताना ती सहज विचारात गढली ‘आपल्या पिढीत आपण दोन-तीन मुलं असतानाही आपल्या आई बाबांनी आपली इतकी काळजी नव्हती केली..आपण कधी व कसे मोठे झालो हे कळलेही नाही असे आई बाबा नेहमी सांगतात..जवळपास तेच मत पंकजच्या आई वडिलांच अर्थात तिच्या सासू सास-यांचही होतं…मग एक मुल वाढवताना आपल्याला त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न आतापासूनच का? या मुलांचे विश्व, भाव भावना समजून घेणे इतके अवघड आहे का? हे एक सतत लागून राहणारे टेन्शन आपल्या पिढीला का…?’
संध्याकाळी पंकज घरी आल्यावर, जेवण उरकल्यावर तिने हा विषय काढला. पंकजने पुष्करला जवळ बोलावलं. एव्हाना स्वारी दुपारचा किस्सा विसरलीही होती. त्याला स्वतःच्या व प्राजक्ताच्या मधे बसवत त्याने हलकेच विचारलं
‘ पुषू बेटा..मला सांग हा जो अथर्व आहे तो फक्त तुलाच मारतो का?’
‘नाही पप्पा..अजून तिघेजण आहेत आमच्या क्लासमधे..सार्थक, शिव, पृथू यांना पण तो मारतो..आणी तो नेहमी एका मुलीचे, सायलीचे केस पण ओढतो..आजही ओढले त्याने आमच्या रिसेस मधे..मग मी त्याला ओरडलो आणी त्याचा हातातून सायलीचे केस पण सोडवले’ पुष्कर शाळेतला प्रसंग मनातच आठवत म्हणाला.
‘तोपर्यंत रिसेस झाली व बाकी मुले पण आली..अथर्व मला म्हणाला “शाळा सुटल्यावर तूला फटके!!”. मी टिचरना सांगणार होतं..पण घाबरुन सांगितलं नाही..अथर्व सारखा सांगत असतो..त्याचे पप्पा पोलीस इन्स्पेक्टर आहेत..त्याला जो त्रास देइल त्याला ते जेल मधे टाकतील’.
आता सारा उलगडा झाला होता. पंकजने थोडा वेळ विचार केला आणि प्राज्क्ताला म्हंटलं ‘ प्राजू तुझ्या व्हाट्सअॕपवर यांच्या वर्गातल्या मुलांचा गृप आहे ना? त्यात त्या अथर्वच्या आईचा नंबर असेल ना?’
‘हो पण…? तू तिच्याशी बोलणार आहेस?’ तिने आश्चर्याने विचारलं.
‘तिच्याशी नाही…त्याच्याशी’ डोळा मारत पंकज म्हणाला
‘इन्स्पेक्टर कदमशी..’
प्राजक्ताने लावून दिलेला नंबर घेउन पंकज टेरेस कडे गेला..’वहिनी मी पंकज सामंत बोलतोय..माझा मुलगा पुष्कर तुमच्या अथर्वच्या क्लासमधे आहे.. मला जर कदम साहेबांशी बोलता येइल का?’
पाच-एक मिनीटे बोलून फोन घेउन पंकज हाॕलमधे परतला…फोन चालू होता बहूधा..त्याने पुष्करला फोन दिला..
‘पुषू..हे बघ फोनवर जे काका बोलताहेत ते अथर्वचे बाबा आहेत..त्यांना तुझ्याशी बोलायचय..’
पुष्कर आधी घाबरला..फोन घ्यायला नाही म्हणाला..
‘पुषू..न घाबरता बोल..अरे खूप छान आहेत काका’
पुष्करने बिचकतच फोन घेतला.. कसाबसा बोलला ‘हॕलो..’
समोरुन एक शिळ ऐकू आली..मग एक भारदस्त आवाज आला..
‘हाय पुष्कर..अरे तू तर हिरो आहेस यार…क्या बात है..तू एका मुलीला एका आगावू मुलाच्या तावडीतून वाचवलं..वेल डन बेटा..प्राउड आॕफ यू..’
काय बोलाव हे पुष्करला कळेना..
पलिकडून पुन्हा तो भारदस्त आवाज पुन्हा आला..
‘पुष्कर..ऐक बेटा..या जगात लोकांवर अन्याय का होतो माहीत आहे? कारण ते गप्प बसतात व समोरच्याचे अन्याय सहन करतात..त्यामुळे तो अन्याय करणारा जास्त स्ट्राँग होतो..अशा लोकांना बूली म्हणतात.. त्यांना वाटतं मी हे असं बूलीइंग केल तरी लोक गप्प बसतात..सहन करतात..असे लोक दुस-यांना एखाद्या गोष्टीची उगीच भिती दाखवतात..जसा अथर्व तुला व इतरांना त्याच्या वडिलांची म्हणजे माझी भिती दाखवतो.. पण…आपण तेच करायच जे आज तू केलस..त्यांना विरोध करायच..त्यांना भ्यायच नाही..
ओ के..?’
एव्हाना पुष्करचा चेहरा नाॕर्मल झाला होता..त्याच्या चेह-यावर आता हसू होतं..’हो काका..!’
‘सो…उद्यापासून अथर्वने तुला त्रास दिला किंवा मारायला हात उगारला तर सरळ त्याचा हात पकडायचं आणी त्याला सांगायच..मी तुला घाबरत नाही..माझ्या वाटेला जाउ नकोस..तो तुला माझी भिती दाखवेल ना..तर त्याला सांगायच..माझे काका पण पोलीस मधे आहेत..ते कोथरुड पोलीस स्टेशन ला असतात..त्यांचं नाव आहे इन्स्पेक्टर सागर कदम…मग बघ..अथर्व तुझ्याच काय..कोणाच्याच वाटेला जाणार नाही…आणी तुझ्यासारखे डेअरिंग वाली मुले आम्हाला पोलीस खात्यात हवी आहेत.. येशील का आमच्या डिपार्टमेंटमधे?’
पुष्कर आता हरकला..म्हणाला..’हो नक्की काका..थँक्यू काका’..असं म्हणत त्याने फोन त्याच्या पप्पांकडे देत पुष्करने आपल्या रुमकडे उड्या मारत धूम ठोकली.
पंकज हसतच फोनवर बोलला..’थँक्यू कदमसाहेब…That worked…!! so nice of you…!’
‘छे..छे..’ समोरुन आवाज आला..’मिस्टर पंकज..अॕक्च्यूली..its the other way round…मी खर तर तुमचे आभार मानले पाहिजेत..तुम्ही हा वेगळा मार्ग चोखाळला..नाहीतर नाॕर्मली शाळेत तक्रार करणे..पालकांना बोलवून वाॕर्नींग द्यायला लावणे असे प्रकार झाले असते तर आपल्या मुलांना उगीच एक गिल्टी फिलींग आलं असतं व अशा गोष्टी त्यांच्या मनावर long term impact करतात. पंकज, आपल्या लहानपणी कसे आपण आपले शाळेतली किंवा गल्लीतली भांडणे,वाद बाहेरच मिटवून यायचो..घरी आणायचो नाही..तसं आपल्या मुलांनाही शिकवणं जरुरी आहेच..स्वतःच्या प्राॕब्लेमशी स्वतः डिल करायला आपण मुलांना शिकवलं पाहिजे…’
‘ॲब्सोल्यूटली सागर..’ पंकज होकार देत म्हणाला..’मुलांच्या आयुष्यात नको तितकी ढवळाढवळ करुन, त्यांची गरजेपेक्षा जास्त काळजी करुन आपण त्यांना खूप डिंपेंडंट बनवतोय..त्यांना मानसिकरित्या इंडिपेंडट बनवणे हे आपल सगळ्यात मोठ चॕलेंज आणी पेरेंट्स म्हणून कर्तव्य देखील..’
‘सो राइट पंकज..ग्रेट..मला तुमच्यासारखा वेगळा विचार करणारा मित्र मिळाला तर आवडेल..भेटूयात लवकरच..’ सागर समारोप करत म्हणाला..
‘बिलकूल..! मलाही आवडेल…सो नाइस टाॕकींग टू यू सागर’ पंकज हसत म्हणाला.
‘ सेम हिअर पंकज..बाय..’
‘बाय..’ फोन कट करत पंकज म्हणाला.
पुष्करच्या रुम मधून नुकतीच बाहेर आलेली प्राजक्ता म्हणाली.. ‘वेल डन पंकज..स्वारी जाम खूश आहे…’
पंकजने पुष्करच्या रुममधे सहज डोकावून पाहिलं.
झोपेत त्याचा चेहरा कधी नव्हे इतका शांत व हसरा दिसत होता..
सौ नलिनी साठे (पुणे) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !
या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा
Excellent
Really very nice
आज एक नविन lesson शिकायला मिळाला याचा आम्हाला आनंद आहे
Thanku sir
Great
सर खूप छान…
आज खूप ठिकाणी ही समस्या पहायला मिळते…
तसं पहायला गेलं तर आज बालक-प लक संबंध आणि हा खूप मोठा गंभीर विषय बनत चालला आहे…
आपण एका चांगल्या सामाजिक विषयावर मार्गदर्शन करता हे पाहून-वाचून समाधान वाटले…
अभिनंदन सर…