पालकत्वात हवा मैत्रीचा संवाद
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
पालकांना आणि मुलांना एक गोष्ट सोबत धरून ठेवते आणि ती म्हणजे संवाद. जेव्हा तो व्यवस्थित असतो तेव्हा त्या नात्याला योग्य दिशा मिळते. कधी होतो असा निखळ संवाद? जेव्हा त्या नात्यात मैत्री, मोकळेपणा, विश्वास असतो. संवाद व्यवस्थित होण्यासाठी काय करावे? त्याबाबत जाणून घेऊ…
? तुम्ही मुलाला जन्म दिला म्हणजे तुम्ही त्यांच्यावर अधिकार गाजवू शकता हा विचार चुकीचा आहे. तुम्ही माध्यम होता त्यांच्या जन्माचं! मात्र त्यांना त्यांचं अस्तित्व आणि विचार आहेत ही बाब नक्की लक्षात घ्यायला हवी.
? आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. हा सुद्धा संवादाचा एक भाग आहे, हे समजून घ्या.
? तुम्ही पालक आहात म्हणजे तुम्ही केवळ मुलांना चुका दाखवणे किंवा त्यांना उपदेश करणे अपेक्षित नसते. त्यांना समजून घेणे, वेळप्रसंगी त्यांच्या विश्वात रममाण होणे देखील तुम्हाला जमायला हवे. मुलांचे भावविश्व तुमच्याभोवती फिरत असते, हे लक्षात ठेवून त्यांना प्रेमळपणे वागवणे महत्वाचे आहे. त्यांचे मित्र बनून राहा. त्यांना तुमच्याशी बोलताना कोणत्याही प्रकारची अडचण वाटणार नाही, याची काळजी तुम्हीच घ्यायला हवी.
कित्येक घरातील वातावरण हे दूषित असते. त्याठिकाणी उघडपणे बोलता येत नाही, वागता येत नाही आणि अगदी ठराविक चौकटीबद्ध रहावे लागते. अशा वातावरणात मुलांच्या बुद्धिमत्तेवर, भावनिकतेवर तसेच सर्वांगीण विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
याउलट काही घरातील वातावरण हे खूपच मोकळे असते. प्रचंड लाड, अति काळजी, अति सुरक्षितपणा यांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावरही त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो.
वरील अशा दोन्हीही परिस्थितीत पालकांचा कंट्रोल नसल्याने आपल्या हातून मुलं सुटताहेत की काय, अशा भयंकर संभ्रमावस्थेत पालक अडकून पडतात आणि मग सय्यम तुटतो व मुलांना शारीरिक शिक्षा सुद्धा पालक करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. हीच परिस्थिती शालेय शिक्षकांवर सुद्धा ओढावते.
अशा परिस्थितीत वेळीच मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग करणं केव्हाही उत्तम.
श्री. आणि सौ परांजपे (पुणे) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!
क्लिक करा!
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
Khupach chhan