आज मराठी शाळकरी मुलं दोन गोष्टींमध्ये चुकतायत✌
पुणे
सर्वठिकाणी आपण ऐकतो बोलतो काय तर ,मराठी मुलं मागे असतात. का असतात ?? विचार केलाय कधी ?
किती पालकांनी या विषयावर विचार केलाय? कारणं शोधली आहेत? आणि महत्वाचे म्हणजे उपाय केला आहे?
स्टेज वर मागे, स्पोर्ट्स मध्ये बोटावर मोजण्या एव्हढी, व्यवसायात तर काय विचारायलाच नको बर लेबल काय लावतो आपण तर म्हणे व्यवसाय रक्तातच असावा लागतो,काही गुण हे जन्मजातच असावे लागतात, नाही हो माईंड मध्ये असावे लागतात, आणि राहिला प्रश्न रक्ताचा तर त्याचा गौरव,शौर्य गाथा किती हे सांगण्याची गरज पडायला नको.
शिवाजी महाराज मराठीच होते ना!त्यांच्यासारखा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला नेता, हरहुन्नरी व्यावसायिक झालाय आजवर ??
मग काय शिकलो आपण त्यांच्याकडून …. आज मोठे मोठे उद्योजक त्यांचा अभ्यास करतायत आणि यशस्वी होत आहेत .
पहिल मराठी मूल चुकते ते त्याला प्रत्येक गोष्टीत ‘Perfection’ हवं आणि हे कुणी शिकवलं तर समाजाने.समाज म्हणजे कोण तर आपणच नाही का! त्याची मानसिकताच झालीये त्याला सर्व ठिकाणी Perfection हवं शाळा,मार्क्स, लग्न ,उद्योग ,घर ….
शाळेत जायचं तर ९० च्यावर मार्क्स हवेतच कमी चालणारच नाही,घर हवं तर टोलेजंग हवंच , गाडी,मोबाइल हवा तर इतर मित्रांचेपेक्षा भारीतलाच हवा ……महाराजांनी कधीच म्हटलं नाही लढेन तर जगातल्या श्रेष्ठ तलवारीनेच…
दुसरं त्याला प्रत्येक काम ‘उद्या’ करायचं असत.
काय रे अभ्यास कधी सुरू करतो? , हो हो उद्यापासून करतो ना! तो महत्वाचा फॉर्म कधी भरतोस उद्या भरतो हो ….काय तेच तेच ऐकवता ….
….काय ग तुझी ती मैत्रीण शिक्षण घेत घेत डान्स च नॅशनल लेवल ट्रेनिंग घेतेय ,ती दुसरी बाबांच्या ऑफिस ला जाते ….तू ट्युशन घ्यायचं म्हणत होतीस ते कधी सुरू करतेयस …हो ग आई मी पण उद्या पासून नक्की करते …
हे असे काहीसे संवाद मराठी घरात ऐकायला येतात ,हो ना
लक्षात घ्या आपल्या मराठी मुलांमध्ये खूप पोटेनशीयल आहे,नव्या,सर्जनशील कल्पना ओसंडून वाहत आहेत,उत्तम निर्णय क्षमता आहे,चिकाटी धाडस आहे,नेतृत्व करण्याची जन्मजात क्षमता आहे,अशी धाडसी पिढी आपल्याकडे आहे गरज आहे ती फक्त त्यांना उत्तम योग्य मार्गदर्शनाची,पाठीवरच्या आश्वासक थाप देणाऱ्याची हो ना!
धन्यवाद??
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा