राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १३
काही वेळेस घरात नुकतेच एखादे बाळ जन्माला आल्यास संसाराचा गाडा सांभाळायला थोडेसे अधिक प्रयत्न करावे लागतात. आणि त्यात मोठ्या मुलांकडे दुर्लक्ष होण्यास सुरुवात होते. लहान बाळाचे आगमन झाल्यामुळे मोठ्या मुलांचा अभ्यास, शाळेची तयारी, इतर जबाबदाऱ्या नेहमीसारख्या पार पाडता येतीलच, हे काही सांगता येत नाही. कालपर्यंत आपली काळजी घेणारे आई-बाबा आज आपल्यापासून दुरावत आहेत, याबद्दलचा पूर्वग्रह मग घरातील मोठ्या मुलांना छळतो आणि तेथून सुरुवात होते शैक्षणिक मागासलेपणाची. याठिकाणी दोघांपैकी एक पालक जर नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात वास्तव्यास असल्यास, तर अशा वातावरणाचा संपूर्ण ताण हा एका पालकावर पडतो.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर घरातील चिडचिडेपणा वाढतो. अगदी त्या मानाने हे संबंधित कुटुंब एकमेकांना समजून जरी घेत असले तरी अशा गोंधळलेल्या वातावरणाची झळ ही नुकत्याच जन्मलेल्या बाळापर्यंत सुद्धा पोहोचते.
त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांसकट पालकांचेही योग्य समुपदेशन होणे गरजेचे आहे. आणि तेही घरातल्या वातावरणाचे निरीक्षण करून अगदी घरातल्याच वातावरणात समुपदेशन मिळत असल्यास हे तर सोने पे सुहागा असल्यासारखे आहे.
आणि काही समस्या किंवा शंका आहे, म्हणूनच समुपदेशन करून घेतले जाते, हा निव्वळ एक गैरसमज पसरलेला आहे.
घरातले वातावरण सदृढ आहे, कुटुंबातील व्यक्ती एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना समजून घेतात, परंतु मुलांकडून किंवा पालकांकडून करीअरच्या दृष्टीने जर चुकीचे क्षेत्र निवडले गेले, तर त्याची नकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते.
म्हणून योग्य वयात मुलांचे करीअर समुपदेशन करून घ्या !
■ अधिक माहीतीसाठी
***
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
क्लिक करा !
————————————————————————-