Skip to content

मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते !

आणि मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते !


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


सहावी-सातवीनंतर शाळेतला पहिला क्रमांक सोडला नव्हता तिने. फक्त क्रमांकच नव्हेतर इतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैदानी खेळ सुद्धा ती गाजवायची. शिक्षकांची फार आवडती होती ती. पटकन सहज सर्वांमध्ये मिसळण्याची हुन्नर तर तिची निराळीच. बहुधा या सर्व गोष्टी तिने तिच्या वडिलांकडून आत्मसात केल्या होत्या. कारण वडिलांची अत्यंत लाडकी चिमणी होती ती. असं भर समारंभात सुद्धा ती अत्यंत स्वाभिमानाने सांगत असे.

मग चुकलं कुठं…..

चुकलं कुठेच नाही, पण सारं विस्कटलं नक्की.

पालकांचा व्हाट्सएपग्रुप मधले उद्याचे शाळेतले अपडेट्स पाहण्यासाठी तिने पप्पांचा मोबाईल घेतला. गणिताच्या मिसेसने अंकिताला उद्या तिची home work ची बुक आणायला सांगितली होती.अंकिता म्हणजे हीच!तिने ok ma’am असा रिप्लाय दिला. मॅडमने ग्रुपवर एका आर्टिकलची लिंक शेअर केली होती. ती अंकिताने ओपन केली. अंकिताला ते आर्टिकल प्रचंड आवडलं. आर्टिकलच्या खाली काही संदर्भ दिले होते. तिने ओपन केले. आता तिला मागच्या आर्टिकलकडे पुन्हा यायचे होते. तिने लास्ट हिस्टरी मध्ये जाऊन चुकून ५ वा पर्याय निवडला.

आणि अचानक….

अनेक नग्न चेहरे चित्रफीतच्या रूपाने तिच्या समोर आदळले. क्षणातच डोळ्यासमोर अंधार येऊन अंकिताला घाम फुटला. तशी ती टॉयलेटमध्ये शिरली आणि बदाबदा उलट्या करायला लागली. ते चित्र तिच्या तार्किक बुद्धीला धक्का देणारे होते. प्रचंड तणावग्रस्त स्थितीत ती टॉयलेटमधून बाहेर आली. तिच्या मनात प्रचंड धडकी भरली होती….

“मी काहीतरी पाप केले आणि पप्पा खूप घाणेरडे आहेत…..”

हे अतिविचार तिला छळू लागले. पुढच्या ३ महिन्यात अंकितामध्ये बरेचसे बदल झाले. आतल्या-आत हा आलेला अनुभव दडपून तिने तिच्या कोवळ्या मनावर भय, चिंता, अपराधी अशा खुपश्या गोष्टींची चादर चढवली होती. या मुद्द्यावर तिच्याशी बोलायला कोणीही नाही, नेमका घडलेल्या प्रसंगांचा अर्थ समजावून सांगायला कोणीही नव्हतं. कारण जी व्यक्ती तिची सर्वात लाडकी होती, तिचीच तिला किळस आणि भीती वाटू लागली होती.

जेव्हा जेव्हा पप्पा एकट्यात काहीतरी मोबाईलवर काम करत बसायचे, तेव्हा तेव्हा पप्पा तसलं काहीतरी घाण बघताहेत, असा अर्थ लावून घडलेला प्रसंग पुन्हा तिच्या डोळ्यासमोर यायचा. आणि ती संपूर्ण मनाच्या दडपण अवस्थेत शिरायची.शाळेतून अंकीताच्या खूप तक्रारी यायला लागल्या. बोलत नाही, एकटक एका ठिकाणी काहीतरी पाहत असते, भावविश्वात रमते, पटकन रडते…पालकांना बोलावून घेतले. पालकांनीही तिच्या अशाच घरातल्या तक्रारी प्रिन्सिपलला सांगितल्या.

नेमकी समस्या काय आहे, त्याच्या खोलात न शिरता चहूबाजूंनी अंकिता दोषी ठरली होती. त्याचा वेगळा परिणाम तर तिच्या शालेय जीवनावर झालाच, पण अंकिता वाढत्या वयानुसार विरुद्ध व्यक्ती, माणसांकडे आकर्षित होत होती.

कारण किळस या भावनेची जागा आता आकर्षणाने घेतली होती.

मनात बऱ्याच गोष्टी दबून त्या प्रचंड वेगाने बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. ही एक ऊर्जा असते आणि ही जेव्हा प्रचंड वेगाने बाहेर पडते त्यावेळी काय चांगलं, काय वाईट याचा विचार केला जात नाही. केवळ त्या उर्जेचं समाधान इतकंच काय ते त्याचं ध्येय असतं.आणि अंकिता सारख्या आज असंख्य मुलं-मुली आपलं बालपण गमावत आहेत. दुसऱ्या ठिकाणी पालकांची पैसे कमावण्याची स्पर्धा सुरू आहे. म्हणून बंगला आहे, गाडी आहे…पण ऐन तरुण वयात मुलं माती खाताना दिसतात.

कारण पालक म्हणून मुलांना सर्व गोष्टी मिळतात….शिवाज एक सोडून, ते म्हणजे लैंगिक शिक्षण. हा विषय जितका डावलला जाईल, दुर्लक्ष केला जाईल त्याची जाणून घेण्याची ऊर्जा ही चौपटीने वाढते.

जर तुम्ही समजावून नाही सांगितलं, तर याविषयी बाहेर विक्षिप्त विचार पसरले आहेतच…जिद्द, चिकाटी, ध्येय, छंद, खेळ, मजा, मस्ती, दंगा हे पराक्रम करण्याच्या वयात जेव्हा लैंगिक शिक्षणाअभावी अशा गोष्टी घुसतात तेव्हा कसलं ध्येय आणि कसली जिद्द. हे असलं काहीही उरत नाही. केवळ कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून करून मोकळं व्हायचं एवढाच काय तो अर्थ मुलं घेतात.

जसं अंकिताबद्दल घडलं….

हा संपूर्ण लेख डोळ्यासमोर एक कल्पना करून जरी लिहिला असला तरी त्याची झळ ही वास्तववादी आहे. कारण मुलं कुठेच चुकत नसतात, चुकतोय आपण त्यांना समजून घेण्यात.शेवटी एकच प्रश्न उरतो…

आपल्याही घरी कोणी अंकिता तर वाढत नाहीये ना……



सौ नलिनी साठे (पुणे) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !


या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा

11 thoughts on “मी माझ्या पप्पांना पॉर्न व्हिडिओ पाहताना बघत होते !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!