Skip to content

मुलांच्या बेस्ट करीअरसाठी येणाऱ्या आव्हानांचा विचार करा.

मुलांच्या बेस्ट करीअरसाठी येणाऱ्या आव्हानांचा विचार करा.


करिअरच्या या टप्प्यावर मार्गदर्शन अथवा सल्ला या गोष्टी आवश्यक असतात. मात्र प्रत्येकाचा अनुभव अथवा सल्ला प्रत्येकासाठी उपयोगाचा नसतो. स्वतःचा मार्ग शोधत जाणं हाच सर्वोत्तम उपाय आहे.

करिअरच्या एका टप्प्यावर ज्यावेळी अनेक पर्याय समोर असतात आणि एका महत्त्वाच्या निर्णयावर येणे आवश्यक असतं तेव्हा योग्य निर्णय घेणे ही सर्वात महत्वाची बाब असते. या संदर्भात एका तज्ञाने एक महत्त्वाचा सल्ला दिला…

ते म्हणतात, एक मित्र मला म्हणाला तुला अनेक प्रकारचे सल्ले मिळतील. त्यातील एकाची निवड करून त्यावर सर्वोत्कृष्ट काम करणे हाच पर्याय प्रत्येकाच्या समोर असतो. सहाजिकच समोर अनेक प्रकारच्या संधीचे अनेक पर्याय असले तरी त्यातील कशाची निवड करायची यावर शक्ती खर्च करण्यापेक्षा जो पर्याय निवडला गेला त्यावर सर्वाधिक ताकदीने आणि ऊर्जेने काम करणं जास्त महत्त्वाचं असतं. अडथळ्यांवर मात करत करिअर घडवण्याची संधी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मिळते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

तसेच अशा वाट्यांमध्ये अनेक पराभावाचा सामना आपल्याला करावा लागतो. कोणत्याही पराभवानंतर आपण कसे स्वतःकडे बघतो, जर पराभूत नजरेने बघत असाल तर ती शेवटाला जाणाऱ्या प्रवासाची सुरुवात असते. या भावनेला बांध घालायचा असेल तर ही सुरुवातच आहे हा शेवट नाही आणि स्वतः मध्ये पूर्ण आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आहे याची जाणीव प्रत्येक क्षणाला करून देण्याची आवश्यकता असते. प्रत्येक प्रसंगाला ताठ मानेनं सामोरं जायला हवं. अपयश अथवा भिती याकडे दुर्लक्ष करत स्वतः सोबत संवाद साधणे फार गरजेचे आहे. मनातल्या शंका अथवा भीती बाजूला सारत काय साध्य करायचं आहे, याचाच विचार समोर ठेवायला हवा. आत्मविश्वासात सातत्याने वाढ होण्यासाठी नियोजन आणि मनाचा सराव या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.

स्वतःला दिलेल्या शब्दाला जागणे हा कोणत्याही क्षेत्रातला सर्वोत्तम सल्ला आहे. हा सल्ला आयुष्यातील प्रत्येक गोष्टी सोबत जोडला गेला आहे. करियर हा त्यातला एक टप्पा झाला. रोज नियमाने एक्सरसाइज करण्याचा आणि जिममध्ये जाण्याचा नियम किती गंभीरपणे अमलात आणला जातो ? जे उच्चतम कामगिरी करतात, त्यांनी स्वतःला शब्द दिलेला असतो, स्वतः सोबत कमिटमेंट केलेली असते. ज्यावेळी लहान लहान गोष्टी वेळेत पूर्ण करण्याची सवय लागते, तेव्हा मोठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मनाची तयारी पूर्ण होते.

म्हणून तुम्ही सध्या कोणत्याही क्षेत्रात काम करीत असाल अगोदर स्वतःच्या मनात डोकावनं फार गरजेचं. कारण त्यावरूनच ठरतं कि भविष्यात आपण किती प्रमाणात उत्तम करिअर करू शकतो.

तसेच तुमचे अद्याप महाविद्यालयीन करिअर सुरू झाले नसेल तर लवकरात लवकर आपल्या करिअर चाचण्या करून कोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला स्पीड जास्त आहे हे समजून घ्या.

कारण एकदा चुकीचे क्षेत्र निवडले गेले तर मात्र शेवटपर्यंत मनाविरुद्ध अभ्यास आणि पुढे नोकरी करावी लागते.

हे सर्व टाळायचे असल्यास त्वरित आपलं करिअर कौन्सेलिंग करून घेणे हे केव्हाही उत्तम असेल.


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांसाठी व्हाट्सऍप समूह!

क्लिक करा!



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!