राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ९
बदलापूरमधील एका अत्यंत नियोजित आणि संस्कारीत कुटुंबामध्ये बोलावणं आलं. आपल्या समूहामध्येच असलेले आणि विशेष म्हणजे आपल्या समूहावर जिवापाड प्रेम करणारे तुमच्या-आमच्यासारखेच असलेले सदस्य यांनी आपल्या भाच्याच्या “करीअर समुपदेशना” साठी बोलावले होते.
अनोळखी लोकं भेटल्यावर थोडंसं बोलण्याचं आणि वागण्याचं तारतम्य बाळगावं लागतं, असं म्हणतात. परंतु हे मित्र ‘बरसो कि पहचान’ या पद्धतीने मिसळून गेले आणि माझ्यातलाही मुक्तपणा मग व्यक्त होऊ लागला.
निमित्त जरी करीअर समुपदेशनाचं असलं तरी या आपल्या मित्राचं सर्वांगीण कौशल्य कळायला सुरुवात झाली. हा आपला मित्र शाळेत मराठी आणि संस्कृत विषय शिकवतो, घराच्या आसपास राहणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे आल्यास २४ तास याचा दरवाजा एक ‘हेल्प लाईन’ म्हणून खुलाच असतो, स्वतः एक उत्तम दर्जाचा गायक आहे आणि गोड गळ्यांचं उपजत गुण घेऊन येणाऱ्या मुलांनाही गाणं शिकवतो. तसेच याच्या गाण्याचं रेकॉर्डिंग हंगामा.कॉम आणि इतर मार्केटमध्येही उपलब्ध आहेत.
अशा उत्साही आणि मुलांच्या मदतीला धावणाऱ्या या व्यक्तिमत्वासोबत मला काही वेळ घालवता आला, हा माझ्यासाठी फार ग्रेट अनुभव होता.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधीना कधी एकदा तरी Bad Patch येतो, या आपल्या मित्राच्याही आयुष्यात आला, तुमच्याही आला असेल आणि माझ्याही येऊन गेला. अशा सर्व व्यक्तींशी बोलणं, त्यांचा अनुभव जाणून घेणं हा फार लाखमोलाचा अनुभव आहे, जो या समूहाच्या माध्यमातून मला मला वेचता येतोय आणि माझ्यापर्यंतच न ठेवता तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता येतोय, हे कोणत्याही १ लाख पगारी नोकरीपेक्षा फार मोठी बाब आहे, असे मी समजतो.
आपल्या या मित्राचं एक स्वप्न आहे की, त्याला संगीत या विषयावर भली मोठी शाळा काढायची आहे, ज्यामध्ये अशी मुलं असतील ज्यांचा आवाज गोड आहे, पण त्या आवाजाला मंच नाहीये.
त्याच्या या स्वप्नांना सलाम करून त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊया !
■ अधिक माहीतीसाठी
***
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
क्लिक करा !
————————————————————————-