Skip to content

मुलांची चिडचिड कमी होण्यासाठी एका शिक्षकाने केलेला प्रयोग !!!

मुलांची चिडचिड कमी होण्यासाठी एका शिक्षकाने केलेला प्रयोग !!!


दादासाहेब नवपुते

जि. प. प्रा. शाळा, बिट गारखेडा,
ता. जि. औरंगाबाद


मुलांची चिडचीड कमी होण्यासाठी काय उपाय करता येतील, असा काहीसा प्रश्न होता. त्यावर एका जि. प. शिक्षकाने किती भारी डोकं लढवलंय! वाचा. शिक्षक ज्ञानभाषा मराठीच्या व्हॉट्सॲप गटाचे सदस्य आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझ्या शाळेवर देखील अशीच समस्या आली होती.
तेव्हा मुलांच्या मनातील ताण-तणाव चिडचिड कमी करण्यासाठी, मी मुलांना शालेय परिपाठात व्यक्त होण्याची संधी दिली.

उपक्रमाचे नाव असे होते की “मला माझ्या आईचा राग आला”.
होय ! मला माझ्या आईचा राग आला.

काल दिवसभरात मुलांना स्वतःच्या आईचा किती वेळेस आणि कोणत्या कारणांसाठी राग आला, ते परिपाठात साउंड सिस्टीममध्ये सर्वांना सांगायचं असं ठरलं.
दुसऱ्या दिवशी पहिली ते सातवी पर्यंत सर्वच मुलांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला.

एक तर मुलगी असं म्हणाली की, “मी टीव्ही बघत होते. आईने येऊन पाठीत धपाटा घातला. टीव्ही बंद केला. तेव्हा मला आईचा असा राग आला, की वाटलं असाच रिमोट फेकून मारावा. पण नाही मारता आला. निमुटपणे पुस्तक वही घेऊन बसले.”

एक दुसरीतला मुलगा म्हणत होता, “मी दुकानात गेलो नाही म्हणून बापाने मला शिव्या घातल्या. बापाचा असा राग आला की, वाटलं मी जर या वेळेस मोठा असतो तर, घेतलं असतं कोपऱ्यातलं लाकूड हातात”.

अशाप्रकारे मुलं व्यक्त होत होती.
मनातील खदखद सांगत होती.
आठ दिवस हा प्रोग्राम चालला.
सगळ्या गावात चर्चा झाली, की मुलं आपल्याविषयी शाळेमध्ये काय काय बोलतात.
जे काही मुलं बोलत असतील, ते ऐकण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी शाळेच्या गेटवर, आजूबाजूला होऊ लागली.

आठ दिवसांनंतर मी विषय बदलला.

विषय असा घेतला की, “मला माझ्या बापाचा राग येतोय !”

मुलांनी तेच करायचं, काल दिवसभरात त्यांना त्यांच्या बापाचा राग किती वेळेस आणि कुठल्या कारणासाठी आला, ते परिपाठात सांगायचं.
हेही आठ दिवस चाललं.
आठ दिवसांनंतर एकदम विषय बदलला.

कहानी में ट्विस्ट.

मी मुलांना असं सांगितलं, की उद्यापासून तुम्हाला, “मला माझ्या गुरुजींचा आणि बाईंचा राग आला!” यावर परिपाठातच बोलायचं.

काल दिवसभरात किती वेळ आला आणि कुठल्या कारणासाठी आला ते सांगायचं.

मुलांना सांगितलं की, बिनधास्तपणे बोलायचं. शाळेतील कुठलेही शिक्षक तुम्हाला काहीही बोलणार नाहीत.
आणि त्याविषयी नंतर चर्चा होणार नाही, अशी मुलांना खात्री दिली. सर्वांसमोर !
मग मुले व्यक्त होऊ लागली.

शाळेत मुलांना सरांचा आणि बाईंचा किती वेळेस राग येतो !

मला असं वाटत होतं की मी मुलांशी खूपच मैत्रीपूर्ण वागतो.
त्यामुळे माझं काही नाव येणार नाही.
पण सुरुवात माझ्यापासूनच झाली.
मी जेव्हा मोजलं, तेव्हा काल दिवसभरात माझ्या लेकरांना 27 वेळेस वेगळ्या कारणांसाठी माझा राग आला होता!

त्यातलं एक कारण तर फारच मनाला लागणारे ठरलं. इयत्ता तिसरीतील एक पिल्लू असं बोललं की, सर (मी), काल मला दुपारच्या जेवणानंतर रांग मोडली म्हणून ओरडले, तेव्हा मला सरांचा असा राग आला की वाटलं, हातातील ताट असंच फेकून मारावे.”

मित्रांनो मी ही ते ऐकून घेतलं.

शिक्षक म्हणून असा विचार केला की,
ज्या माणसाचा मला एका दिवसात सत्तावीस वेळेस राग येतो त्या माणसाकडून मी काय डोंबल शिकणार आहे का?

अशा माणसाचं तोंड तरी बघावं वाटेल का?

आणि मग या दिवसापासून आम्हा शिक्षकांना स्वतः आत्मचिंतन करावं लागलं.
आपण खरंच कळत नकळत किती वेळा दिवसातून मुलांचा अपमान करत असतो. मुलांना आपला राग येतच असतो.

मित्रांनो खरं सांगतो, या उपक्रमानंतर माझी शाळेतल्या मुलांशी एवढी गट्टी जमली, एवढी कनेक्टिव्हिटी वाढली की, आम्ही एकमेकांचे पक्के मित्र झालो !

मुलांना व्यक्त होण्यासाठी एक मोकळं व्यासपीठ मिळालं !
त्यातून मुलांची चिडचिड, तिरस्कार, ताणतणाव, राग जवळपास संपलाच.

आता माझी त्या शाळेतून बदली झाली आहे. तरीही ते विद्यार्थी मला विसरले नाहीत. मी त्यांना विसरलो नाही.अजूनही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत.

या उपक्रमानांतर पालकांत आमूलाग्र बदल झाला. अन आमच्या लेकरांचं आनंदी जीवन सुरू झालं. त्यांचा टीव्ही मात्र संपला. पालकांसोबत गप्पा वाढल्या.


शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !

————————————————————————-

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!