Skip to content

मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग २

राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग २


डोंबिवलीमध्ये एका बंगाली कुटुंबाच्या घरी गेलो होतो. त्यांचा ७ वर्षाचा मुलगा (आता दुसरीत शिकत आहे) अभ्यासच करीत नाही, अशी तक्रार त्यांनी फोनवर केली होती. प्रत्यक्ष घरी गेल्यानंतर अनेक तक्रारींचा भडीमार ऐकवायला दोघीही पालकांनी त्यात कसलीही कमी पडू दिली नाही. मी निमूटपणे आणि गांभीर्याने दोघांचेही बोलणे ऐकत होतो आणि मध्ये-मध्ये त्यांच्या मुलाकडेही पाहत होतो.
पालकांनी जो रेटा ऐकवायला सुरुवात केला होता, खरंतर ती सर्व लक्षणं होती. मूळ कारणं ही पालकांच्या पालकत्वात दडलेली होती. ज्याची योग्य शहानिशा करून ती पालकांना नम्रपणे जाणीव करून देणं ही मुख्य जबाबदारी होती. त्याशिवाय समुपदेशन प्रक्रियेला शून्य अर्थ आहे. वस्तुस्थिती नम्रपणे सर्वांच्या समोर ठेवणं आणि त्यातनं अमुक अमुक मार्ग काढणं इथपर्यंतची प्रक्रिया एका समुपदेशकाला पार पाडावी लागते.
त्यांनी आपल्या मुलाची शाळा व्यतिरीक्त (CBSC) दोन क्लास आणि एक डान्स क्लास अशी दिनरचना ठरवलेली होती. जी शास्त्रीयदृष्ट्या अतार्किक आहे. कारण एकच विषय तीन चेहऱ्यांच्या माणसांकडून शिकण्यात त्यांच्या मुलाची ऊर्जा ही दबावात्मक स्वरूपात वाया जात होती. जर हीच स्थिती काही वर्ष कायम राहील्यास संकुचित स्वभाव किंवा वर्तन समस्या निर्माण होण्याचा धोका हा जास्त असतो. एकंदरीत परिस्थिती पाहून मुलाच्या काही ठराविक चाचण्या घेतल्या.
तो काय नाही करतोय, यापेक्षा जास्त तो काय काय करू शकतो, हे त्यांच्या पुढ्यात ठेवणं गरजेचं होतं.
चार – पाच क्लास लावले किंवा इतकं करूनही यांच्यातच काहीतरी दोष आहे, अशी आरोपाची पाचही बोटे मुलांकडे रोखून धरणे आणि वरून चार -पाच माणसात त्यांची प्रतारणा करणे, यातनं समस्या आणखीन द्विगुणित होत जातात. हे गांभीर्य समोर ठेऊन मुलांच्या उपजत गुणांनुसार तुम्हाला बदलण्याची कशी गरज आहे आणि तसे न घडल्यास त्याच्या तरुणपणी एकही गुण/कौशल्य शिल्लक राहणारी नाही, केवळ उदरनिर्वाहासाठी अंगात धडपड असेल, अशी डोळ्यात अंजन घालावी अशी भूमिका याठिकाणी समुपदेशकाला घ्यावीच लागते.
असो, आलेले अनुभव समोर मांडत जाईल !
एका नवीन कुटुंबासोबत पुन्हा येथेच भेटूया !


■ अधिक माहीतीसाठी
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
————————————————————————-

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!