मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग १८
राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
डोंबिवली, मुंबई.
यंदा चौघेही १० वीच्या महत्वपूर्ण वर्षाला सामोरे जात आहेत. या वर्षाला विशेष महत्व असल्याने जवळजवळ ९०% पालक मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग करण्याच्या प्रयत्नात असतात. कारण पालकांना कळून चुकलंय की निव्वळ टक्के जास्त मिळून उपयोग नसून तर ते योग्य क्षेत्रासाठी (करिअरसाठी) वापरता येणे जरुरीचे आहे आणि तेच क्षेत्र जर मुलांच्या आवडीचं किंवा कलेचं असेल तर….क्या बात हें !
आणि तो कल जितका लवकरात लवकर त्यांना समजेल तितकं ते विश्वसनीय असेल. कारण वर्षभर तश्या पद्धतीच्या अभ्यासाची दिशा निवडणं मग सोपं जातं.
तसेच इतके-इतके टक्के मिळवणे, या मर्यादित ध्येयापेक्षा करीअर कॉउन्सिलिंगच्या रिपोर्टमध्ये आलेल्या अमुक-अमुक क्षेत्र निवडीसाठी इतके टक्के काहीही करून मिळवणे, असं मोठं ध्येय त्यांच्यापुढे निर्माण होऊन, सेल्फ स्टडी साठी मुलं जागृत होतात.
म्हणजेच आता केवळ टक्क्यांपुरते मुलं अभ्यास करणार नसून तर उपजत गुणांना वाव मिळण्यासाठी आणि उज्वल करीअर घडविण्यासाठी मुलं अभ्यासाला लागतात.
या चारही मुलांचे पालक एकमेकांचे अत्यंत जवळचे स्नेही (लहानपणापासूनचे मित्र) असून त्यांनी आपल्या मुलांसाठी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांचे खूप खूप आभार मानतो.
चारपैकी एका विद्यार्थिनीने आत्तापर्यंत अजिबात खाजगी क्लास लावलेला नव्हता. तसेच तिची बुद्धिमत्ता सुद्धा उत्कृष्ट नोंदली गेली. उर्वरीत मुलांना सुद्धा बाहेरच्या खाजगी क्लासेसची अजिबात आवश्यकता नाही, अशी त्यांचीही बुद्धिमत्ता सांगते. अशा बुद्धिमत्तेच्या मुलांनी जास्तीत जास्त सेल्फ स्टडी करण्यावर भर द्यावा. त्या अगोदर आपली बुद्धिमत्ता चाचणी करून घ्यावी.
चारही मुलांना सेल्फ स्टडी करण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले गेले. सलग ९० दिवस त्यांनी अभ्यासाची कशी सवय लावून घ्यावी, मेडिटेशन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन दिले गेले.
तसेच मुलांची आणि पालकांची रजा घेतली !
शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————-