मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ५

(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ५


One of the great experience या अशा सुंदर वाक्यानेच या लेखाची सुरुवात करणार आहे. दुसऱ्यांदा जळगाव मध्ये मुलांच्या Career Counseling साठी जाण्याचा योग आला. पाहता पाहता तारीख जवळ आली आणि तेथील परिसर पुन्हा अनुभवण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्याहीपेक्षा जास्त नवीन कुटुंब, नवीन माणसं, नवीन मुलं, नवीन प्रश्न आणि मिळणारी नवीन उत्तरं या सर्व बाबींची जास्त ओढ होती. आज सकाळीच ११ वाजता घरी मुंबईत परतलोय. एकंदरीत घेतलेल्या अनुभवावरून One of the great experience असा उल्लेख पुन्हा करावासा वाटतोय. असो,
या एकत्र कुटुंबात जाणवलेली शिस्तप्रिय, प्रत्येकाला असणारी स्वतंत्र मतं, विनोदी वातावरण, तसेच मुलांच्या ठिकाणी जाणवलेली सृजनशील वृत्ती आणि जळगावच्या झणझणीत मटणाच्या रस्स्यासोबत हे सत्र दिमाखात पार पडलं. प्रमुख म्हणजे पालकांच्या आई-बाबांशी मुक्त संवाद करता आला आणि मुलांसाठी ५ वर्ष आधी निवृत्ती घेतलेल्या त्याच बाबांनी आपल्या गत काळातला प्रेरणादायी आलेख व्यक्त केला. तेथेच खात्री पटली कि या प्रेरणेवरच पुढची ही दिसणारी पिढी फार आदरतिथ्याने टिकून आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबात एक घटना घडली होती, जी काहीशी त्यांच्यात मिसळतानाही जाणवली, परंतु त्या मुद्द्यांवर फार न बोलता कुटुंबांच्या गुणवैशिष्ट्यांवर आणि पुढच्या दिशांवर भरमसाठ चर्चा झाली. कुटुंब इतकं सकारात्मक होतं कि सर्वांना मेडिटेशन आणि कॉउंसेलिंग करायला फार मेहनत घ्यावी लागली नाही.
एकंदरीत या कुटुंबात सर्व कलेची माणसं होती, म्हणून कदाचित त्यांच्यासोबत माझी “नाळ” घट्ट जुडली गेली.
एका नव्या कुटुंबासोबत, नवीन अनुभव घेऊन इथेच भेटूया !
तूर्तास धन्यवाद !
■ अधिक माहीतीसाठी
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
————————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.