राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग १६
भायखळा, मुंबई.
मुलगा फार बोलत नाही, अभ्यासात लक्ष नाही, एका जागी स्थिर बसत नाही अशी प्रत्येक मुलांमध्ये थोडीफार आढळणारी लक्षणे लक्षात घेऊन गृहस्थांकडून करीअर कॉउन्सिलिंग साठी बोलावणं आलं. तेथे प्रत्यक्ष गेल्यावर फार निराळा अनुभव घेतला. मुलाची बुद्धिमत्ता ही फार चांगली आली. त्याचा नेमका अर्थ मुलाला आणि पालकांना सुव्यवस्थितपणे कसा पोहोचेल याची पुरेपूर काळजी घेतली.
पुष्कळ वेळा मुलांची बुद्धिमत्ता ही नकारार्थी गोष्टींकडे वाया जात असते. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी किंवा एखादे काम लक्षपूर्वक करण्यासाठी बुद्धिमत्तेची फार कमी ऊर्जा मुलांजवळ उरते. त्यामुळे एका ठिकाणी लक्ष एकाग्र करण्यात मुलांना अपयश येते. ही फार साधी, सोपी आणि शास्त्रीय बाब पालकांना निदर्शनास आणून देणे, हे करीअर कॉउन्सिलिंगचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याशिवाय ही प्रक्रिया पुढे सरकवता येणार नाही.
मुलाचे १० वीचे नवीन वर्ष सुरू झाले आहे, ही बाब लक्षात घेऊन पालकांनी फोन करून बोलावले. आणि हा निर्णय अगदी उत्तमच. कारण आपल्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण मुलांच्या अभ्यासाच्या सवयी कश्या आहेत, यावर सुद्धा चाचणी घेऊन त्याचा संपूर्ण वर्षभराचा दिनक्रम आखून देण्यात मुलांना प्रोत्साहित करतो. आपल्यातले गुण आणि अवगुण एखाद्या प्रशिक्षित आणि प्रभावी व्यक्तीकडून समजल्याने आत्मचिंतन, स्व-जाणीव आणि स्व-जबाबदारी विकसित मदत होते.
आणि अभ्यास करण्यासाठी मुळात याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.
वडील पोलीस खात्यात १५ वर्षापेक्षा अधिक कार्यरत असून “मानसशास्त्र” दैनंदिन जीवनात किती महत्वाचा आहे आणि कसा, हे त्यांना फार जवळून माहीत आहे. आणि हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच जाणवले.
संपूर्ण कुटुंबाला मेडिटेशन म्हणजे काय, कसं करायचं, किती वेळ करायचं आणि तुम्ही ते किती गांभीर्याने घ्यायला हवं, याविषयी प्रॅक्टिकल रुपात माहिती दिली.
आणि उज्वल करीअरसाठी मुलाला शुभेच्छा देऊन कुटुंबाची रजा घेतली.
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————-