Skip to content

मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ११

राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ११


एका अथांग सागरातून जर कोणी ४-५ ड्रम पाणी काढून घेतले तरीही त्या सागराला अंश सुद्धा फरक पडत नाही, अगदी त्याचप्रमाणे काही व्यक्तींचं व्यक्तिमत्व इतकं सुदृढ असतं की अगदी टोकाकडील आयुष्याने दिलेल्या नकारार्थी अनुभव सुद्धा त्यांना पुढे चालून अगदी क्षुल्लक वाटतात आणि हे जे वाटणं आहे तेच पुढे गती देतं. पुन्हा आयुष्याची रेलचेल ते त्यांच्या पद्धतीने नव्याने आखायला सुरुवात करतात.
होय, असंच व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती फार योगायोगाने किंचित रूपात भेटतात आणि त्या भेटल्या. आयुष्यातला पडता काळ सांभाळून पुढे जायचं असतं, लढायचं असतं हे तुम्ही-आम्ही आजपर्यंत ऐकले आणि ऐकवले. परंतु याचं जिवंत उभं राहीलेलं उदाहरण पाहण्यात जी खरी आयुष्याची गंमत आहे ती नुसती ऐकण्यात नाही.
सौ. आरेकर मॅडम हे त्यांच्या महाविद्यालयीन आयुष्यात एकेकाळी उत्कृष्ट धावपटू होत्या. त्यांचे पती सुद्धा मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. म्हणजेच याबाबत दोघांची ट्युनिंग इतकी छान जमली असावी की त्यांच्या मार्फत मुलाला सुद्धा मैदानी खेळाबाबत प्रोत्साहन मिळत आहे.
क्रिकेटमध्ये घडणाऱ्या बारीक-सारीक गोष्टींचे विश्लेषण करून पुढील मार्ग कसा सुखकर बनवता येईल, याबद्दल सदैव मुलगा मैदानात प्रयत्नशील असतो, हे वडीलांकडून समजले. मुळात मुलांमध्ये याची जाणीव येण्यासाठी पालकत्व ताजेतवाने असणे फार गरजेचे तर आहेच शिवाय समवयस्करांशीही मुलांचे स्नेहाचे संबंध असावे लागते. तेव्हाच खऱ्या अर्थाने चारही बाजूंनी मुलांना प्रोत्साहन मिळू लागते.
एकवेळेस दडपणयुक्त म्हणून अंगाशी आलेला अभ्यास सोडा पण मैदान कधीच सोडू नका आणि यासाठी पालकांनाही मुलांसोबत मैदानात उतरावे लागेल.
मॅडमचे शब्द अजूनही कानावर घुमल्यासारखे जाणवतात,
“खचायचं नाही, तर लढायचं” !
मॅडम आपण आपला संघर्षमय प्रवास अत्यंत प्रेरणादायी रीतीने चालू ठेऊन सोबतच मुलाच्या उज्वल भविष्यासाठी करीअर कॉऊन्सिलिंगवर विश्वास ठेवलात, याबद्दल आपले आभार आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
पुन्हा एका नवीन कुटुंबासोबत नव्याने भेटूया !
■ अधिक माहीतीसाठी
***
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
क्लिक करा !

————————————————————————-

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!