लैंगिक शिक्षण दिल्याने त्याचा मुलांवर वाईट परिणाम तर होणार नाही ना ???
डॉ. राहुल पाटील
लैंगिक शिक्षण देणे खरोखरच गरजेचे आहे. मुलामुलींना लैंगिक शिक्षण दिल्याने वाईट परिणाम होत नाही. उलट पौगंडावस्थेत जे अंतर्बाह्य बदल घडत असतात. उदा. मुलांमध्ये लिंगाला ताठरता येते, वीर्य सखल होणे, आवाज बदलणे, जननेंद्रियाची वाढ होणे, तसेच मुलींमध्ये पाळीची सुरुवात होणे, स्तनाची वाढ होणे या विषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होते व त्याचे उत्तर घेण्यासाठी ते लाजून पालकांना न विचारता मित्र-मैत्रिणींना विचारतात व यातून अशास्त्रीय माहिती जास्त मिळण्याची शक्यता असते व त्यांचे नुकसान होत असते. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. मुला-मुलींमध्ये परस्परांचे आकर्षण निर्माण होते. यात नैसर्गिक हेतू निश्चितच असतो. परंतु माणसांना इतर प्राण्यांप्रमाणे वागता येत नाही, काही चूक करण्याआधीच त्यांना योग्य ती शास्त्रीय माहिती देणे आवश्यक असते.
शास्त्रीय लैंगिक शिक्षण दिलेच नाही, तर मित्रांनी दिलेल्या चुकीच्या पुस्तकांतील माहिती ‘हीच खरी माहिती’ असे त्यांना वाटते. यातूनच किडके व्यक्तिमत्व आकार घेऊ लागते. लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ समागमाचे शिक्षण नव्हे तर स्वतः विषयी, विरुद्ध लिंगी व्यक्ती विषयी, सुदृढ संबंध विषयी माहिती देणे, व्यक्तिमत्व चांगले घडविणे, आदर्श पती, पत्नी,माता, पिता जागरूक नागरिक निर्माण करणे हेच या शिक्षणाचे उद्दीष्ट आहे.
सध्याची वाढती लोकसंख्या तसेच एचआयव्ही / एड्स गुप्तरोग अशा प्रकारच्या समस्या भारतात वाढण्याचे कारण लैंगिक शिक्षणाचा अभाव हेच आहे.
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————
लेख आवडला