Skip to content

मुलांच्या चिंतेमुळे पालकांचे ढासळणारे आरोग्य!! उपाय वाचा!!

मुलांच्या परीक्षा आणि भविष्याची चिंता यामुळे पालकांचे ढासळतेय आरोग्य❗ उपाय काय ❓


प्राजक्ता पंडित
समुपदेशक


समुपदेशक , पॅरेटिंग कोच असल्यामुळे बऱ्याच पालकांशी सतत संवाद साधला जातो. तेव्हा एक सामायिक बाब लक्षात आली ती म्हणजे मुलांच्या परीक्षा, त्यांच्या भविष्याची चिंता, शिक्षणाचा खर्च , स्पर्धात्मक जगात माझे मूल टिकेल का हा यक्ष प्रश्न, मुलांना सर्वात पुढे ठेवण्याची धडपड, कळत नकळत केली जाणारी तुलना ….इत्यादी बाबी आज पालकांचा ताण तणाव वाढवत आहेत.

त्यामुळे बी. पी. , शुगर , लठ्ठपणा, हार्मोन असंतुलन,झोप न येणे, अशा एक ना अनेक आजारांना पालक बळी पडत आहेत.आजचे पालक म्हणजे ‘काळजी वाहू सरकार’ झाले आहे ?हे म्हणजे एखाद्याला ताप आलाय आणि आपण त्यावर उपाय न करता किती ताप आलाय? का आलाय? ही चर्चा करीत बसलोय. हो ना❗

समस्या कुठलीही असुदेत त्यावर केवळ चर्चा करण्यात , टेंशन घेण्यात काही अर्थ नसतो, त्यावर त्वरित उपाय करणे हे कधीही उत्तम. पण सध्या वेगळेच चित्र बघायला मिळते ते म्हणजे पालक तासन तास नव्हे तर वर्षानुवर्षे मुलांच्या समस्यांवर केवळ चर्चा आणि काळजी करीत बसतात दिवसेंदिवस समस्या वाढायला लागतात आणि आजारही.

उपाय काय❓

★पालकत्वाची जबाबदारी पार पाडत असताना आई आणि बाबा दोघांनी ती समान वाटून घ्यावी.म्हणजे कुणा एकावरच बर्डन येणार नाही.

★ मुलांचे स्कुल,बोर्ड निवडतांना स्टेटस पेक्षा मुलांना अभ्यास किती पेलवेल ते बघावे म्हणजे पुढील ताण टाळता येईल.

★ मुलांचे संगोपन अगदी जन्मल्यापासून कसे करावे याचे प्रशिक्षण घ्यावे म्हणजे सुरवाती पासूनच मुलांना योग्य ते संगोपन व ब्रेन प्रोग्रामिंग करता येईल.

★ मुलांचे प्रेम आणि लाड करण्यात फरक असतो तो समजून घ्या.

★ मुलांना सतत रागावणे , उपदेश देण्यात काही अर्थ नसतो,त्यामुळे केवळ घरातील वातावरण दूषित होते.

★ मुलांचे ब्रेन सायन्स समजून घ्या म्हणजे मुले अशी का वागतात हे कळेल आणि त्यावर सहज उपाय करता येईल.

★ मुलांच्या म्हातारपणा पर्यंत ची तरतूद करून ठेवण्याची जबाबदारी तुमची नाही हे लक्षात घ्या.

★ मुलांना योग्य संस्कार, नैतिकतेची शिकवण,कौशल्ये, आत्मविश्वास,जिद्द ,धाडस, बुद्धिमत्ता,ध्येय एवढे नक्की द्या.

★ मुलांचे यश अपयश त्यांनी फेस करावे ही क्षमता निर्माण करा. अपयश हाही आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका.

★ परीक्षा,मार्क्स,स्पर्धा… हे केवळ Task आहेत संपूर्ण आयुष्य नाही.

वाचकांचे आभार????



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा

1 thought on “मुलांच्या चिंतेमुळे पालकांचे ढासळणारे आरोग्य!! उपाय वाचा!!”

  1. खुपच छान सर , मला वाटतं अलिकडे समुपदेशनाची गरज मुलांपेक्षा पालकांनाच जास्त आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!