आजकालचे पालक मुलांचं खूपच टेंशन घेतात!!!
M.A. (Clinical Psychology), M.Sc. (Psychology)(UK)MBA(HR)(UK)
माइंड मास्टर कौन्सेलर्स, पुणे.
कधी कधी वाटतं, मी जर २००० साली किंवा त्यानंतर जन्माला आले असते तर माझं आयुष्य कसं असलं असतं?माझ्या यथा-तथाच असणाऱ्या चित्रकलेचं माझ्या आई-वडिलांना जाम टेन्शन आलं असतं.
माझं गणित हा तर उठता-बसता चर्चेचा विषय झाला असता.
मी खेळाडू असून माझ्या मुलीचे ग्रॉस मोटर स्किल्स अगदीच undeveloped आहेत ह्याचं माझ्या आईला सॉलीडच वाईट वाटलं असतं.
‘पोरगी चार लोकांसमोर उभी राहून तशी बरी बोलते, पण पळताना तिचे पाय काहीतरी विचित्र होतात. पायात पाय अडकून पडतेच..’ हि चिंतेची बाब असली असती.
‘अक्षर चांगलं आहे, वह्या पूर्ण असतात; पण अहो जेवढं सांगितलं ना ते कमीत कमी शब्दात बसवते. मार्क्स कमी होतात मग..’ अशी गोड तक्रार माझ्या आईने केली असती.
मी सगळ्यांचं सगळं ऐकूनच घेते, म्हणून लेबल लावलं असतं.
‘एकदा वाचायला बसली कि हलतच नाही जागची, आणि वहीत काहीबाही मनातलंच खरडत असते. लक्ष मुळी नसतंच कुठे, day dreaming चालू असतं.’ अशा असंख्य तक्रारींची मालिका माझ्या आई-वडिलांनी रचली असती. मग मला न आवडणाऱ्या खेळाच्या कोचिंगसाठी मला पाठवलं असतं. चित्रकला शिकवली असती.माझा अलर्टनेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले असते. Abacus, Q-maths वगैरे क्लासेस लावले असते. आणि मग stress वर काहीतरी उपाय करायला हवा, ह्या काळजीत माझे पालक असले असते. माझा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आईने रात्रीचा दिवस केला असता.
पण मी लहान असताना असं काहीही झालं नाही. काही गोष्टी मला जमत नाहीत म्हटल्यावर, “ठीक आहे, नसेल जमत’, एवढंच म्हटलं गेलं. मला ज्या गोष्टी शिकणं, शिकवणं गरजेचं होतं त्या झाल्याच.प्रसंगी रागावले असतील, मारलं असेल; पण मला all rounder बनविण्याचा प्रयत्न केला गेला नाही.विनाकारण त्यांनी (माझ्या आई-वडिलांनी) त्यांची आणि माझी झोप खराब केली नाही.
मला आजही drawing जमत नाही. कोणताच मैदानी खेळ खेळता येत नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या पलीकडे गणित जमत नाही. मी अजूनही दिवास्वप्न पाहते, वाचते, त्यांत रमते, काहीबाही खरडत असते. ते माझं वेगळेपण होतं आणि आजही आहे, ते त्यांनी जपलं.
माझं हळू आवाजात बोलणं, कुणाशीही न भांडता ऐकून घेणं हा माझा स्वभाव आहे आणि तो योग्य बाजूने वळविला पाहिजे एवढंच त्यांनी ओळखलं.
माझं व्यक्तिमत्व ज्यात आधीच काही गुण-दोष होते. ते विकसित करताना ते जर एक ना एक दोष दूर करत बसले असते तर आज मी आहे तशी न राहता मशीन झाले असते. आनंदी असले असते कि नाही, देव जाणे!
माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचेच, माझ्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडीलही थोड्या फार फरकाने असेच होते. खरं सांगू, त्यामुळे कुणाचंच फारसं काहीच बिघडलं नाही.
मग आपल्या मुलांना एखादी गोष्ट जमत नसेल, स्वभावात नसेल तर खरंच काही बिघडणार आहे का?
आई-बाबा येतात, सांगतात, ‘अहो भांडतच नाही ही. खूप शांत आहे.’ ‘ अहो खूप खेळतो हा, पण वाच म्हटलं तर लगेच कंटाळतो.’ ‘छान dance करते पण चित्र काढ म्हटलं कि पळून जाते’,’चित्र छान काढते, रंग आवडतात पण गणित म्हटलं कि संपलं सगळं!’
सगळ्यांना सगळं यायलाच हवं का? त्याचा स्वत:चा गुण, स्पेशालिटी नसेल का? नाही आली एखादी गोष्ट तर आभाळ कोसळणार आहे का?
शांता शेळकेंच्या ओळी आहेत,
सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास
अधिक काही मिळविण्याचा करू नये अट्टहास.
सुवास, पाकळ्या, पराग, देठ, फूल इतकीच देते ग्वाही,
अलग अलग करू जाता हाती काही उरत नाही.
सौ नलिनी साठे (पुणे) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !
या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा
नमस्कार
परंतु आजच्या पालकांना सांगून पटत नाही तर कसे करावे . तीमची फी किती ?मोबाईल नंबर 7709138089