राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग १५
पनवेल, नवी मुंबई.
एकाच शाळेतील दोन मुलांच्या पालकांकडून बोलावणं आलं होतं. प्रत्यक्ष घरातल्या वातावरणात चाचण्या आणि समुपदेशन सेवा असल्यामुळे काहीसे प्रफुल्लित आणि उत्साहीत पालक प्रकर्षाने जाणवत होते.
खरंतर दोन्हीही पालकांचं एकमेकांशी फार वर्षांपासूनचं नातं जुडलं होतं, हे संभाषण करते वेळी निदर्शनास आलं. या नात्यांविषयी उल्लेख करण्याचा मुख्य हेतू म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टींबद्दल अप्रूप निर्णय घेताना आपल्या स्नेहींना सुद्धा त्याचा फायदा व्हावा, ही एकमात्र प्रामाणिक अपेक्षा आपली असते. ही एक आपसूकच घडणारी प्रक्रिया आहे. जी फार मोठ्या प्रमाणात सभोवताली सतत जाणवत असते. आणि महत्वाचे म्हणजे अप्रत्यक्षपणे मुलांकडून त्याचं निरीक्षण होऊन अनुकरण होण्याची खात्रीही वाढते. असो.
दोन्हीही मुलं यंदा १० वीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असून करीअर कॉउन्सिलिंग दरम्यान ज्या क्षेत्राकडे त्यांचा कल सर्वाधिक होता, त्यासाठी ते पात्र आहेत. या दोन्हीही मुलांची कॉउन्सिलिंग परीक्षेच्या काही महीने अगोदर झाली असल्यामुळे निश्चितच त्याचा त्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळाले असावे. कारण तशा पद्धतीची आखणी आपण अत्यंत सोप्या प्रक्रियेने मुलांच्या आणि विशेषतः पालकांच्या समोर ठेवलेली असते.
तुम्हा दोघांनाही उत्तम करीअरच्या खूप खूप शुभेच्छा !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————-