राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग १९
वारणा, कोल्हापूर.
‘आपलं मानसशास्त्र’ या समूहाच्या माध्यमातून चक्क पाचव्यांदा कोल्हापूरला कॉउन्सिलिंग करण्याची संधी मिळाली. कारण गृहस्थ हे आपल्याच समूहाचे सदस्य असून आपले सुरू असलेले प्रकल्प आणि काम पाहून त्यांनी आपल्या मुलासाठी आमंत्रित केले.
(कृपया या कुटुंबाच्या फोटोची प्रायव्हसी जपण्यात आलेली आहे)
त्यांचा मुलगा इयत्ता ६ वी पासून निवासी शाळेत शिक्षण घेत आहे आणि याबद्दल दोघीही पालकांना व विशेष मुलाला फार अभिमान करण्यासारखी ही बाब वाटते.
पालकांचेही हेच म्हणणे आहे की,
एका विशिष्ट वयात आल्यानंतर घरातल्या वातावरणात मुलांना मिळालेला सहवास हा पुरेसा असतो, म्हणून त्यांच्या बाकीच्या संकल्पना या बाहेरच्या स्वतंत्र वातावरणातच झपाट्याने विकसित होत असतात. जितकं मुलांना बंदिस्त वातावरण लाभेल, तितक्या त्यांच्या संकल्पना झेप घेऊ शकणार नाहीत.
त्यांचे हे वरील वाक्य स्वीकारण्याजोगे तर आहेतच, पण ते कृतिशील जास्त वाटते. पुष्कळ पालकांनी प्रत्यक्षरित्या अमलात आणल्यास कदाचित चित्र आजच्या परिस्थितीपेक्षा तरी नक्कीच चांगलं असेल, याबद्दल एक तज्ञ म्हणून माझ्या मनात जराही शंका नाही.
मुलाच्या चाचण्या घेण्यात आल्या (IQ, Aptitude Test & etc). मुलाची बुद्धिमत्ता ही अतिशय उत्कृष्ट म्हणून नोंद झाली. आलेला कल लक्षात घेऊन पुढची ध्येयधोरणे त्याच्या आणि पालकांच्या समोर ठेवली.
मेडिटेशन, नवीन अभ्यासाचे तंत्र आणि त्यामागचं शास्त्र सुव्यवस्थीतपणे सजावून सांगितले.
९० दिवस तुला आणि पालकांना हे का फॉलो करायचे आहे, याबद्दल दोघांनाही माहिती देऊन एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले गेले.
आईने बनवलेली कोल्हापुरी मसाल्यांच्या जेवणाची चव घेऊन मुलांच्या स्वतंत्रतेला खऱ्या अर्थाने जपणाऱ्या कुटुंबाची रजा घेतली
शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————-