राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
प्रत्यक्ष घरातल्या वातावरणात करीअर कॉउंसेलिंग करण्याचा वेग हा हळू-हळू वाढतोय. मुलांच्या करीअरच्या दृष्टीने पालक विश्वास ठेऊन संपर्क करू लागले आहेत. प्रत्यक्ष घरी भेट देऊन या चाचण्या घेत जात असल्यामुळे पालक त्याकडे अधिक सकारात्मक अंगाने पाहत असावेत. कदाचीत एक वेगळ्या प्रकारची विश्वसनीय “नाळ” या उपक्रमाद्वारे जोडली जात असावी.
ही झाली एक बाजू. याची दुसरी बाजू अशी कि मुलं ज्याठिकाणी लहाणाची मोठी झालेली असतात किंवा ज्या व्यक्तीच्या सानिध्यात ती वाढलेली असतात, अगदी त्याच ठिकाणी काहीशी नियंत्रित स्थिती निर्माण करून एक विश्वसनीय समुपदेशन प्रक्रिया पार पाडता येते, हा आत्तापर्यंतचा मी घेतलेला अनुभव. म्हणजेच क्लिनिकमध्ये बसून केलेले समुपदेशन आणि प्रत्यक्ष घरातील वातावरणात केलेले समुपदेशन या दोघांमधील महत्वाचा फरक हळू-हळू लक्षात यायला लागला आहे. यथायोग्य, तसेच अचूक बाबींचा मागोवा घेऊन नैतिक तत्वांना धक्का न बसता प्रभावी समुपदेशन करण्यासाठी घरातील वातावरणच सर्वोत्तम, असेच मी म्हणेन.मुलांच्या करीअरच्या दृष्टीने महत्वाची दिशा ठरवताना त्यांच्या वातावरणाचा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव घेणे एक केव्हाही उत्तम, तसेच त्याच वातावरणात IQ आणि Aptitude चाचणी वापरून समुपदेशन प्रक्रियाही पार पाडणे हे तर सर्वोत्तम ! असो,
आत्तापर्यंत ज्या-ज्या पालकांनी विश्वास ठेऊन मुलांच्या करीअरच्या दृष्टीने महत्वाची दिशा ठरवताना आमंत्रित केले, त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसेच ठरल्याप्रमाणे अपेक्षित ठराविक उंची आपल्या मुलांनी, तसेच कुटुंबाने गाठल्यास जरूर कळवा, नक्की मी आपल्याला पुन्हा भेटायला येईल.
एका नव्या कुटुंबाच्या नव्या अनुभवासोबत पुन्हा भेटूया !
■ अधिक माहीतीसाठी
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
————————————————————————-