Skip to content

शिक्षकांनी केलेल्या अशा अनेक संस्कारांमुळे मी घडलो!!

शिक्षकांनी केलेल्या अशा अनेक संस्कारांमुळे मी घडलो!!


शीतल दिवेकर


पुलकित….मी विद्यार्थांना पु.ल. देशपांडे यांचा पाठ शिकवल्याचे स्मरणात आहे. आज निमित्त मिळालं.पु.ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणात ते शिकत असताना म्हणजे ५०-५५ वर्षापूर्वीच्या आपल्या शिक्षकांविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत .ते म्हणतात ,” मी पार्ल्याच्या ज्या टिळक विद्यालयात शिकलो तिथे खूप शिक्षक मला लाभले . सगळेच शिक्षक प्रेमळ होते असे नाही . काही संतापीही होते .पण त्यांच्या संतापामागे विद्यार्थ्यांच्या भल्याची चिंता असायची .”

पु. ल. शाळेत शिकत असलेला काळ महात्मा गांधींनी चालू केलेल्या चळवळीचा काळ होता. शाळा इंग्रजांकडून अनुदान घेत नव्हती . लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ निघालेली शाळा होती . अशा शाळा राष्ट्रीय शाळा म्हणून ओळखल्या जात .. शिक्षकाला पगार कमी . ध्येयवादी शिक्षक अशा शाळांतून शिकवत .

पु.ल. नी अशा काही शिक्षकांचा उल्लेख केला आहे , ज्यांनी त्यांची साहित्य ,संगीत, नाटक असल्या गोष्टींची आवड पाहून उत्तेजन दिलं . तू चांगला लेखक होशील, नाटकात चांगले काम करू शकशील, संगीतात प्रगती करशील असा नुसता आशीर्वाद दिला नाही तर आत्मविश्वास निर्माण केला . तारकुंडे गुरूजी त्यांना फिजिक्स , केमिस्ट्री शिकवत .ते स्नेहसंमेलनात नाटक बसवत . पु.ल. त्यावेळी पंधरा वर्षांचे होते . त्यांनी बेबंदशाही नाटकाची एक स्त्रीपात्रविरहित रंगावृत्ती तयार केली होती. तारकुंडे मास्तरांनी त्यांचे नुसते कौतुकच केले नाही तर ते नाटक त्यांनी बसवून घेतलं.

एकदा कोंडकर मास्तरांनी ड्रॉइंगच्या तासाला फ्री_हॅंड ड्रॉइंग काढायला सांगितलं . पु.ल. हताश होऊन समोरच्या कागदाकडे बघत बसले होते. मास्तर म्हणाले , काय रे? तुझा कागद कोराच ?

पु.ल.ना रडू येऊ लागले . रडू आवरत ते म्हणाले , मला चित्र काढायला येत नाही सर . मास्तर म्हणाले , अरे, पण तू चित्र काढायला सुरूवात केली नाहीस , तर तुला येतं की नाही हे कळलंच कसं ? रेघा तर ओढायला लाग . आलं तर आलं , नाही तर नाही . परवा पेटी काय छान वाजवलीस ! ती काय आपोआप आली? अरे आपल्या बोटात काय लपलं आहे ते आपल्याला ठाऊक नसतं . ” पु. ल. आणि मास्तरांमध्ये एक खासगी करार झाला होता . त्यांनी इतर विषयांत पहिल्या श्रेणीतील गुण मिळवले तर मास्तर त्यांना ड्रॉइंग मध्ये पास करणार होते . पण पु. ल. नी देखील उगीचच त्यांना पास करायला लागू नये म्हणून ड्रॉइंग कडे लक्ष द्यायला सुरूवात केली .आणि त्यांची बोटं ही साथ द्यायला लागली .

म्हणून पु.ल. म्हणतात,अमुक एका शिक्षकाने मला घडवलं असं म्हणता येणार नाही . शिक्षकांनी केलेल्या अशा अनेक संस्कारांमुळे ते घडले . जेव्हा त्यांना शिक्षकांची आठवण यायची तेव्हा आपण पुन्हा शाळकरी व्हावं असं मात्र त्यांना नक्की वाटायचं…..



या दिवाळीच्या सुट्टयांमध्ये मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!