मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग १
१७ वर्षाची होती अनिता (नाव बदलून). दहावीनंतर वाणिज्य शाखा निवडली होती तिने. निवडली म्हणण्यापेक्षा मिळालेल्या % नुसार जे क्षेत्र योग्य तसं अत्यंत सोईची डील तिने आपल्या करीअरशी केली होती. तीच कशाला हल्लीचे विद्यार्थी आणि पालक बुद्धिमत्ता आणि क्षमता यांची पारख न करता केवळ % आणि मार्केट ट्रेंड पाहुन करीअरची निवड करतात, जे खरंतर अतार्किक आणि अशास्त्रीय आहे.
अनिताला भिंतीतला कलर खाण्याची सवय जडली होती. आणि ती अशी जडली होती की आता कोणीही ओरडेल म्हणून नकळत गुपचुप ती कलर खात असे. ४-५ महीन्यापासून तिच्या आई संपर्कात होत्या. परंतु संगीता समुपदेशनासाठी तयार नसल्यामुळे प्रक्रिया काही सुरु करता येईना. दरम्यान तिचे वर्तन आनखीन भरकटत जात होते. तसेच कलर खाण्याची तिची ही सवय बंद व्हावी म्हणून कसल्यातरी डॉक्टरने एक भलतच सिरप संगीताला दिले होते.
संगीताचे वय पाहता करीअरच्या दृष्टिने अत्यंत पूरक होते. तिची IQ (बुद्धिमत्ता चाचणी), Aptitude Test (क्षमता चाचणी) घेतली. आणि तिच्या ठिकाणी असणारे उपजत गुण आणि बुद्धिमत्ता यांच्या संयोगाने कोणते क्षेत्र अनुरूप आहे किंवा तिचा कल कोणत्या दिशेकडे सर्वाधिक आहे. हे तिच्या समोर ठेऊन तिला प्रोत्साहित केले गेले.
आपल्या बुद्धिमत्तेचा Power Supply हा योग्य ठिकाणी होणे फार गरजेचे आहे. त्या अगोदर ती बुद्धिमत्ता किती आहे, हे Blood Group माहीती असण्यासारखे महत्वाचे आहे. संगीताची बुद्धिमत्ता ही निरर्थक बाबींकडे (कलर खाने) अधिक वाया जात होती. म्हणून तिचा कल आणि क्षमता तिच्या समोर ठेऊन जास्तीत जास्त याठिकाणी तिची ऊर्जा खर्च झाल्यास चांगला रिसल्ट कसा मिळेल, यासंदर्भात तिला विश्वसात घेऊन एक – एक गोष्टीचा अर्थ तिला सांगण्यात आला. आणि Meditation शिकविले गेले.
आज ती समुपदेशनात सांगितलेल्या बाबींचे पालन करत आहे. तिची अभ्यासाकडे ओढ वाढते आहे. या गोष्टी जेव्हा कानावर पडल्या, तेव्हा वाटले की हे सय्यामाने केलेल्या समुपदेशनाचे यश आहे.
आपण कोणती औषधं घेत आहोत, कशावर घेत आहोत, यापेक्षा एकमेकांना विश्वासात घेऊन सय्यामाने केलेली समुपदेशन प्रक्रिया केव्हाही चांगली नाही का !
■ अधिक माहीतीसाठी
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
क्लिक करा !
————————————————————————-