Skip to content

समुपदेशन – पालकांमधील समज आणि गैरसमज

समुपदेशन – पालकांमधील समज आणि गैरसमज


राकेश वरपे

(करीअर कॉउंसीलर)
संचालक,आपलं मानसशास्त्र


“आमची मुलं खोटं बोलतात, आम्हालाच उलट बोलतात, बढाया मारतात, नाटकं करतात, घरात आणि शाळेत एका जागी शांत बसत नाहीत, हट्ट करतात, त्यांना पटकन राग येतो, अमुक-अमुक गोष्ट मिळविण्यासाठी आकाड-तांडव करतात, आम्हाला गृहीत धरतात, तासंतास मोबाईल आणि टीव्हीवर वेळ घालवतात, हल्ली खूप शेअरिंग कमी झालंय, अति आत्मविश्वासात असतात, स्वतःच्या फोनला हात लावायलाही देत नाहीत, ई, ई, ई.अशा अनेक तक्रारी पालकवर्ग इतर पालकांना, शिक्षकांना, नातेवाईकांना सांगत असतात. ते ही अगदी मुलांसमोर. याला आम्ही मानसशास्त्रात म्हणतो, ‘जितकी एखादी गोष्ट सर्वांसमोर बोलली जाईल, तितकीच त्या वेगाने ती वाढत जाईल.’ याठिकाणी ती गोष्ट मुलांमधून निघून जावी म्हणून सांगितली जाते, परंतु याचा विपरीत परिणाम मुलांच्या मानसिकतेत होत असतो.इथे सर्वांना सांगूनही ठोस मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मग एखादा समुपदेशक तज्ञ गाठला जातो, तेथेही समस्येची पाचही बोटं मुलांकडे रोखून ठेवली जातात. जे अतार्किक – अशास्त्रीय आहे.

शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही मुलांना समुपदेशनाची कधीच गरज नसते, तर त्यांच्या सभोवतालीन वातावरणात सदोषता निर्माण झाल्यामुळे मुलांना त्या गोष्टी करण्यास प्रेरीत करीत असतात.

जसे, असमाधानी वैवाहीक जीवनाचा त्रास मुलांना सहन करावा लागतो, घरात जर एकमत नसणाऱ्या दोन पिढ्या वावरत असतील तर मुलांचाही गोंधळ होतो, तसेच शाळेतले वातावरण, घरातल्या आजूबाजूचे वातावरण, मित्रांचा सहवास, नोकरी करणारे पालक, घटस्फोटीत पालक ई. मध्ये सदोषता आल्यास त्याचा मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होऊन काही वर्तन समस्या मुलांच्या ठिकाणी आढळतात.

म्हणून वरीलप्रमाणे आपण ज्या तक्रारी पाहील्या, खरंतर त्या तक्रारी नसून ते मुलांमधील वाढत असलेली लक्षणं आहेत, ज्याची कारणं ही मुलांच्या सभोवतालीन वातावरणात दडलेली असतात. इथे एकट्या पालकांना दोष देऊन उपयोग नाही, पण खोलात जाऊन मूळ मुद्दा समजावून सांगणे महत्वाचे वाटते.

म्हणून मुलांच्या सभोवतालीन वातावरणात जेव्हा बदल होतो, तेव्हा त्यांच्या मानसिकतेतही बदल होण्यास सुरुवात होते. जो बदल नैसर्गिक आणि चिरंतर टिकणारा आहे.

【 दोन मुख्य समुपदेशनाचे प्रकार 】

◆ पॉसिटीव्ह समुपदेशन

या प्रकारात मुलांच्या ठिकाणी काही फारसे वर्तन दोष, समस्या नसतात. कारण घरातले वातावरण अत्यंत पोषक असते. तसेच ही मुलं अत्यंत हुशार, अभ्यासू, आणि अनेक शालेय कामकाजात सहभागी होणारी असतात. केवळ त्यांची बुद्धिमत्ता, उपजत गुण, आणि कल या गोष्टींनुसार त्यांना प्रोत्साहीत केल्यास व त्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण केल्यास पुढील आयुष्यात ही मुलं स्वतः आणि इतरांसाठीही एक समाधानकारक आयुष्य जगतात. म्हणून त्यांना त्यांच्या कलेनुसार झेप घेता यावी यासाठी सभोवतालीन वातावरणातील उत्तेजन देणाऱ्या प्रमुख घटकांना समुपदेशन दिले जाते. यालाच पोसिटीव्ह समुपदेशन प्रक्रिया म्हणतात. नाहीतरी कितीही हुशार मुलं असली तरी चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे व ऊर्जा असंबंधीत गोष्टींकडे वाया गेल्यामुळे अशाच मुलांना पुढे फार दडपणयुक्त आयुष्य जगावे लागते, उदरनिर्वाहासाठी वाट्टेल ती नोकरी पत्करावी लागते, जे आजकाल आपण पाहत आहोत.

◆ निगेटीव्ह समुपदेशन

अति चंचल मुले, निराश मुले, आक्रमक मुले, लक्ष न देणारी मुले, स्वतःला त्रास देणारी मुले, दुसऱ्यांना त्रास देणारी मुले, एकटी राहणारी मुले, घातक मुले, लैंगिक समस्या असणारी मुले, शारीरिक तक्रार करणारी मुले, समाज अप्रिय मुले अशा सर्व वर्तन समस्यांशी निगडीत समुपदेशनाची ही प्रक्रिया कार्य करते. ज्यामध्ये सभोवतालीन वातावरणातल्या मूळ कारणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. तेथून मग सर्व वाया जात असलेली ऊर्जा एका ठिकाणी स्थिर कशी ठेवता येईल यासाठी काही उपचार तंत्रे, मेडिटेशन, सोप्या अभ्यास सवयी, याचे प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणीही मुलं मुख्य भूमिकेत नसून घरातले प्रमुख घटक केंद्रस्थानी असतात.

हे दोन प्रकार आपण पाहीलेत आणि कुठे जास्त समुपदेशनाची गरज असते याचा सुद्धा अनुभव आपण घेतला. म्हणजेच समुपदेशनाची ही शास्त्रीय प्रक्रिया अत्यंत विश्वसनीय असून यामध्ये फार सय्यम ठेऊन जबाबदार व्यक्तींना पुढे चालावं लागतं, ज्याचा फायदा हा केवळ मुलांना होत नसून तर संपूर्ण कुटुंबात नवचैतन्य येण्यास मदत होते आणि समूहातील प्रत्येक सदस्याला आपल्या भूमिका कळतात.

म्हणून कोणत्याही समुपदेशनाशी संबंधित भूलथापांना आपण पालक वर्ग बळी पडू नये, कारण याचं मार्केट इतकं फुगवून आपल्यासमोर मांडलं जात आहे, ज्याला वेगवेगळी आकर्षक नावं देऊन अनेक भंपक दावे आपल्यासमोर ठेवले जातात.

यामध्ये मुख्यत्वे DMIT (फिंगर प्रिंट) आणि Mid-Brain Technology अग्रेसर आहेत. जे काहीही अशास्त्रीय दावे पुढे करून पालकांना लुबाडत आहेत.

म्हणून आजच्या या लेखामार्फत एवढंच सांगेन की पालक वर्गहो सावध रहा. योग्य समुपदेशन प्रक्रीया समजून घेऊनच योग्य तज्ञाकडे समुपदेशन करून घ्या. त्या व्यक्तीची डिग्री, शिक्षण, अनुभव तपासून घ्या. कारण कोणताही मानसशास्त्रीय अनुभव नसून केवळ ८-१० दिवसाचं प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती स्वतःला तज्ञ म्हणवून घेत आहे.


श्री. आणि सौ परांजपे (पुणे) यांनी आपल्या मुलाचं करीअर कॉउन्सिलिंग करून व्यक्त केलेला अनुभव. नक्की वाचा !


शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग केल्यास वर्षभर पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यास मदत मिळते. आपल्यालाही आपल्या मुलांसाठी अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !

————————————————————————

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!