Skip to content

दहावीनंतर काय रे भाऊ?

गीता गजानन


दहावीनंतर काय रे भाऊ?


निशांत: विक्या ए विक्या अरे चल ना खेळायला.

विकी:ए तुम्ही जा रे.माझा आज मुड नाय.

पप्या: काय भाव खातो यार.चल ना, बस काय.
विकीः अरे सुशांत दादा पण येतोय खेळायला.(सुशांत दादा इंजिनिअरिंगला असतो नी बाकी तिघं दहावीची परीक्षा दिलेली .)

विकी: आई, मी.जातो खेळायला.

आई: अरे तुला काय चिंता आहे की नाही?आज तुझा रिझल्टना दहावीचा.

विकी:ए आई , जाऊ दे ना ग.मी लवकर येतोदोन तासात.
आई: बरं जा.पण लवकर ये बाबा घरी.

(विकी खाली पळतो. मैदानात थोडा वेळ खेळतात.गप्पा मारायला कठड्यावर बसतात.)

सुशांत दादा: काय बिनसलंय की काय तुमचं.कसले कारलं खाल्ल्र्यासारखी तोंड करताय.एनी वरी.

निशांत : अरे दादा कालपासून पावण्यांचे फोनावर फोन.
रिझल्ट लागला का? कधी लागणार?

विकी: होय रे डोकंआऊट करुन टाकलयं.आमच्या रिझल्टशी कधी नव्हे तो यांचा काय संबंध?

पप्या : होय रे.आमच्याव घरी सेम कंडीशन.आईने आज आमटीत मीठच नाही टाकलेलं.तिला मैत्रिणींचे फोनावर फोन.आज रिझल्ट. उद्या रिझल्ट.जाम टरकलेय तिची.नी थोडी थोडी माझी पण.☺️

सुशांत दादा : अरे बस काय.तुम्ही अभ्यास केलाय ना.मग टेंशन नही लेनेका.जस्ट चील. नी टेंशन घेऊन तुम्हाला पाच टक्के जास्त मिळणार असतील तर घ्या बाँ.
पण एक सांगू हे दहावीचे मार्कस काँलेजच्या प्रवेशापुरते मिळाले की बस असतात. पुढे कोण पण भाव देत नाय या मार्कांना.

निशांत:खरं की काय?

सुशांत दादा:अरे हो रे बाबा.लोकांनी नुसता प्रेस्टीज इस्यू करून ठेवलाय दहावीचा.खरा लोचा तर पुढे होतो.

विकी : म्हणजे रे दादा?

सुशांत दादा: अरे लोकं फक्त मार्क्स बघतात नी त्यावरुन पुढची education journey ठरवतात.म्हणजे बघा एखाद्याला खूप टक्के असले तर सर्वजण त्याच्या सायन्सच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करतात.
आमच्या बरोबरचा रितेश. त्याला दहावीत ९१% पडलेले. त्याला भाषेची, इतिहासाची मनापासून आवड होती. पण जास्त टक्के असल्याने सर्वांनी त्याला सायन्सला जायला लावले.
व्हायतच तेच झालं.त्याचे बारावीचे मार्क्स खूप कमी आले.दोष कुणाचा?

विकी: दादा, किती वाईट ना!

सुशांत दादा: अरे मित्रांनो, बारावी सायन्स तसं कठीण नाही. पण जर मेडीकल, इंजिनिअरिंग कडे जायचं असेल तर सरकारने प्रवेश परीक्षा ठेवल्यात. त्या द्याव्या लागतात.
मेडीकलसाठी नीट.
इंजिनिअरिंगसाठी दोन परीक्षा.
आय आय टी त प्रवेश मिळवण्यासाठी jee advance.
पण jee advance प्रवेश परीक्षा देणेस
पात्र होण्यासाठी प्रथम jee mains द्यावी लागते. मुलांच्या पेपरातील कामगिरीनुसार jee advance प्रवेशासाठी लागणारे मार्कस निश्चित होतात.
nit ,iiit ह्यात प्रवेशासासाठी फक्त jee mains काफी असते.
व महाराष्ट्र राज्यातील इंजिनिअरिंग काँलेजात प्रवेश घेण्यासाठी cet ,( jee mains ऐच्छिक).
महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ज्यांना महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग काँलेजात शिकायचय त्यांना jee mains.
नीट, jee mains ,jee advance परीक्षेचे पेपर हे ncert च्या अभ्यासक्रमावर आधारित.
मुलांना स्टेट ची पुस्तके व ncertची दोन्ही
पुस्तके यांचा अभ्यास करावा लागतो.शिवाय जरनल भरायची कामं असतात.
मेडीकलला प्रवेश घेणार्या मुलांसाठी नीट तर फार्मसी, अँग्रीकल्चर सारख्या शाखांच्या प्रवेशासाठी cet ची परीक्षा असते.या cet साठी physics, chemistry ,biology हे विषय असतात .तर इंजिनिअरिंगच्या cet ला physics,maths, chemistry हे विषय असतात.
ज्यांना मेडीकलची cet किंवा नीट द्यायची असते त्यांनी मँथ्स घ्यायची गरज नसते. तसेच इंजिनिअरिंगची cet द्यायची असेल तर biology drop करतात.
दोन्ही परीक्षा देणारे pcmb हा आँप्शन निवडतात.
हे सगळं अकरावीचा प्रवेश घेण्याआधी
ठरवावं लागतं. बारावी सायन्सनंतर बरीच जण बीएससी करतात.एमएससी करतात. बीएड,एमएड करतात. स्टेट टीइटी देऊन टिचर होतात. प्रोफेसर होतात.

ज्यांना खरंच सायन्स आवडतं, एवढ्या परीक्षा देण्याची चिकाटी आहे,शिवाय क्लास जाँइन किया तो उसकेलिए लगनेवाला भरमसाठ पैसा है,नहीतो खुदके दमपे स्टडी करनेकी तैयारी है तो सायन्स इज युअर कप आँफ टी यारो नहीं जाने दो.और भी बहुत सारे आँप्शन है .
बारावी सायन्सनंतर बरीचजण बीएससी करतात,एमएससी करतात.बीएड करुन टीइटी देऊन टिचर होतात. कुणी प्राध्यापक होतात.

विकी: ये दादा आर्टसबद्दल सांग ना.

सुशांत :अरे पहिले ना कमी टक्के असले की आर्ट्स असा समज होता.पण आत्ता बरीच 80,90टक्कयांवरची मुलंही आर्टसला जातात. बीए करता करता mpsc, upscया परीक्षांचा अभ्यास करतात व पदवी मिळाल्यावर ह्या परीक्षांना बसतात. इसमे पास हो गया तो लाईफ सेट हो जाती है यार.आय ए एस, आयपीएस व अन्य ग्रेड ए व ग्रेड बी अधिकार्यांची भरती युपीएससी, एमपीएससी थ्रु होते. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार ,नायब तहसिलदार अशा तसेच अन्य महत्तवाच्या पदांवर नियुक्ती होते. किंवा बीएड करुन tet परीक्षा देऊन टिचर बनता येतं,प्राध्यापकही बनू शकता.पीएचडी करता येते.
बारावीनंतर बीए इन जरनँलिजम अँड कम्युनिकेशन हा तीन वर्षाचा कोर्स केला तर न्यूज रिपोर्टर, टीव्ही अँकर, न्यूज रीडर,ब्राँडकासस्ट जरनँलिस्ट,स्क्रिप्ट रायटर, पब्लिक रिलेशन्स ओफिसर अशा करिअरच्या अनेक संधी आहेत.

पप्या: दादा डिप्लोमाबद्दल सांग ना.

सुशांत:अरे दहावीनंतर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतात. डिप्लोमात चांगले मार्कस मिळाले तर डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षाला प्रवेश मिळतो नी डिगरी घेता येते. jee,cetद्यायची गरज नाही.

सुशांतदादा: आत्ता काँमर्सबद्दल..
Commerce शाखेतली मुलं बारावीनंतर b com करू शकतात.तसेच बरेच विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट या कोर्सला प्राधान्य देतात. तुम्ही कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करु शकता. कंपनी सेक्रेटरीला कार्पोरेट जगतात मानाचे स्थान आहे. Icwa (cost and management account professional)हा कोर्स केल्यावर लोक सीइओ,managing director, finance controller, chief accountant सारख्या महत्त्वाच्या पदांवर काम करतात.

पँरामेडिकल: उपवैद्यकीय क्षेत्रातही अनेक संधी आहेत.बारावी सायन्सला पीसीबी ग्रुप घेतलेले विद्यार्थी यात नीटची परीक्षा देऊन प्रवेश मिळवू शकतात.
Laboratory,radiography, cardiology technician, foreign six science,operation theatre technician, endoscopy, perfusion technician असे बरेच अभ्यासक्रम batcher of paramedical technology मध्ये उपलब्ध आहेत.

तुम्ही बारावी नंतर डिफेन्समध्येही जाऊ शकता.
बारावी सायन्स केलेल्या विद्यार्थ्यांना nata ही एक्झाम देऊन आर्किटेक्चरला प्रवेश मिळवता येतो.

काहींना शेफ व्हायचे असते.काहींना पायलट, काहींना म्युझिक इंडस्ट्री खूणावत असते.तर काहींना संस्कृत, फ्रेंच, जर्मन अशा भाषेत करीअर करायचं असतं.
तर फ्रैंड्स मी तुम्हांला जुजबी माहिती दिली की जेणेकरुन तुम्ही पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेरचे जग पहाल.

विकी: दादा आम्ही या एवढ्या संधींचा कधी विचार केला नव्हता रे.

निशांत :पण दादा यातली नेमकी आपण कोणती संधी घ्यायची? बहुत कन्फ्युजन है.

पप्या: मी असं काय म्हंटलं तरी आईबाबा म्हणणार तु लहान आहेस अजून. त्यांच्या सोयीने लहान मोठं करतात रे मला. म्हणजे बघ खाऊ आणला की पहिला गुड्डीला.का तर ती लहान नी मी मोठा.नी डिसीजन घेताना परत मी लहान.?

सुशांतदादा:अरे हे डिसाइड करण्याइतके तुम्ही मोठे नाही.नी आई बाबांच्या मध्ये एक पझेसिवनेस असल्याने ते सुद्धा गोंधळतात. म्हणून सरळ करिअर मार्गदर्शकांकडे जा,आईबाबांसोबत. ते तुमची aptitude test घेतात.तुमचा बुद्ध्यांक (intelligence quotient ) काढतात.तुमची आवड पहातात.आर्थिक, सामाजिक परिस्थिती लक्षात घेतात नी तुम्हाला योग्य ते करिअर सुचवतात.

विकी: निशांत, पप्या आपण दादाच ऐकूया.आपल्या आईबाबांना घेऊन करिअर मार्गदर्शक कांकडे जाऊया. मग नो झंझट.??

विकी:दादा किती सोप्प केलस रे आमचं काम.

थँक्यू सुशांत दादा.☺️?


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !

————————————————————————-

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!