राकेश वरपे
(करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग – भाग ३
फार Extra Forward कुटुंब होतं, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मुळात त्यांचा हा कौटुंबिक आराखडा फार उत्साहीत वाटत होता. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. तसेच वडिलांचा समाजातील संपर्क हा फार दांडगा होता आणि आई गृहिणीची जबाबदारी पार पाडुन L.L.B चे शिक्षण पूर्ण करीत होत्या व त्याला वडिलांचा मनमुराद पाठिंबा होता. हे आजुबाजुला फार नगण्य आहे म्हणून मी याला उत्साहीत कौटुंबिक आराखडा असेच म्हणेन.
असे असताना पालकत्वाची जबाबदारी निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. याचा अर्थ पालक चुकताहेत असा होत नाही. तर पालकत्व आनखीन सदृढ व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी योग्य समुपदेशन घेणे केव्हाही उत्तम. कारण पालक जरी दोन्हीही बाजू सांभाळत असले तरी त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताण हा मुलांवर पडतो.
त्यांच्या मुलीला खरंतर मानसशास्त्र या विषयात करीअर करायचे होते. पण मार्गदर्शनाअभावी ते करता आले नाही आणि असेही नाही की आता ती करू शकत नाही. परंतु एका ठिकाणी तिने प्रवेशिका घेतली होती. जे योग्यरित्या तिच्याकडून पार पडणं गरजेचं होतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अति चंचल, रागीट आणि मोबाईलचा अति वापर (जी ही लक्षणे आजकाल सर्वच मुलांमध्ये आढळतात) या लक्षणांकडे तिची सकारात्मक ऊर्जा वाया जात होती. याचा नेमका अर्थ पालकांना सांगण्यात आला.
तिच्या चाचण्या घेतल्या, आलेले रिपोर्ट पद्धतशीर समजावून सांगितले, मेडीटेशन स्किल शिकविले, सोप्या व परिणामकारक अभ्यास करण्याचे कौशल्य शिकविले आणि शेवटी अशा दिलखुलास कुटुंबाचा निरोप घेतला.
करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ माझ्या आवाजात ऐका !
***
आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ?
————————————————————————-