Skip to content

पालकांनो, शिक्षणाचं बाजारीकरण झालंय असं वाटतंय का??

समाज, शिक्षक आणि ढासळत चाललेली शिक्षण व्यवस्था…


संभाजी भाईक

शिक्षक, प्राथमिक शाळा


आज मी या ठिकाणी माझं मनोगत मांडत आहे….हे फक्त माझं मनोगत नसावं तर समस्त जातीचे मनोगत असावं.

एक काळ होता की शिक्षण क्षेत्र हे सेवेच क्षेत्र होत …..शिक्षक होण आणि ज्ञानदान करून समाज घडवणं हे खूप मोठं पुण्य होत…आणि या पुण्याच्या बदल्यात शिक्षकाला समाजात मान सन्मान होता…….गावातील प्रत्येक छोट्या मोठया गोष्टी या शिक्षकाशिवाय जवळपास अशक्य होत्या परंतु काळ जसा बदलला तसा समाज बदलला आणि त्यात शिक्षक आणि शिक्षण ही….शिक्षण हे सेवेचे व्रत न राहता ते व्यावसायिक झालं…..आणि व्यवसायामुळे शिक्षणाचा अक्षरश बाजार मांडला…. तो स्वतःला शिक्षक म्हणणाऱ्यांनी…..शिकवणीच्या नावाखाली प्रचंड पैसा गोळा करून शिक्षणाचा व्यवसाय झाला म्हणून पालकांकडे असलेले पैसा पाल्यांच्या प्रेमापोटो बाहेर आला…..आणि तो शिकवणीमध्ये गुंतवला गेला….आणि उभे राहिले इंग्रजी माध्यमाचे इमले…..मराठी शाळा ओस पडू लागल्या ……मुलांना जन्म देण्यापालिकडे आमचं काहीच कर्तव्य नाही आस पालकांना वाटू लागलं….

मागेल तेव्हडी फी दिली की आमच्या मुलांना भविष्यात परदेशी जायला किंवा सरकारी नोकरी मिळायला साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी अडवू शकत नाही असा खोटा विश्वास शिक्षणाचा बाजार मंडणार्यांनी रीतसर तयार केला… लोकांच्याच पैशावर टोलेजंग इमारती…सुटाबुटातील पोर…गळ्यात टाय…ने अन करायला गाड्या पण हे सगळं होत असताना शिक्षण देणारे किती उच्च शिक्षित आहे याचा न केलेला विचार…पोर घरी आली की 1-2 राहिम्स अडाणी आई वडिलांच्या पुढे बोलतात यातच आई वडिलांना आपला पोरगा मोठा अधिकारी होणार आस दिसत…

लोकांना पण ते खरं वाटू लागलं आणि कष्टाने कमावलेला आणि ना कमावलेला पैसा पालक प्रेमापोटी शिक्षणावरती गुंतू लागले नाहीतर अक्षरश उधळू लागले…काही शिक्षण तज्ज्ञांनी मातृभाषेत शिक्षण घ्या अशी आरोळी पण दिली पण ती समाज मनापर्यंत पोहचली नाही आणि ती नक्की पोहचेल पण तो पर्यंत काही पिढ्या बरबाद झालेल्या असेल…..

पण म्हणून मराठी शाळा चांगल्या का?तर नक्की चांगल्या आहेत पण त्यामध्ये काम करणारे शिक्षक पण प्रामाणिक राहिलेत का हा पण विचार आता पुढे येऊ राहिलाय….विध्यर्थांच्या आयुष्यात नंदनवन फुलवन सोडून कितीतरी शिक्षक आता डाळिंब… केली…ऊस…कांदा यांच्या बागा फुलवताना दिसतात….शेती करण्याबद्दल किंवा स्वतःचा वाडीलोअर्जित व्यवसाय करण्याबद्दल काही नाही परंतु शाळेच्या वेळेत आणि इतर ही वेळेत शाळेकडे दुर्लक्ष करून हे राजरोज पणे चालू आहे….शेती आणि इतर गोष्टींमुळे शाळा आणि राहण्याचं ठिकाण यातील अंतर वाढलं म्हणून पण शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं…. यात भर म्हणून की वेगवेगळ्या समित्या, त्यांच्या मिटिंगा,इतिवृत्त,लसीकरण, जनगणना, निवडणुका, जयंत्या, पुण्यतिथ्या, ऑडिट आणि अजून बरच काही….

अशी पद्धतशीर काम शिक्षकांना लावून बहुजनांची मुलं शिक्षणापासून दूर सारायची आणि गरीब श्रीमंत ही दरी कायम ठेवायची असा हा उपक्रम चालू आहे आणि या सगळ्यातून जर शिक्षक सुटला तर तो त्या विध्यर्थांना शिकवणार आणि त्यातून सक्षम देश उभा राहण्यासाठी तरुण घडणार….बरं समाज आणि पालक पण यातून मागे राहिले नाही…कित्येक पालकांना एकुलती एक मूल…त्यात कायद्याने शिक्षा बंद म्हणजे गुरुजींचा उरलासुरला धाक पण कायद्यात बंद…..समाज बदलत चालला तसा शिक्षक पण बदलत चालला…आपलेपणा ,आपुलकी,प्रेम,ह्या गोष्टी पण शिक्षक आणि शिक्षीकामध्ये कमी पडत चालल्या…काही गोष्टी या फक्त शिकवण्या पुरत्या असतात पण त्या अनुकरनातं नसतात आशा पद्धतीने शिक्षक वागू लागले…स्वतः अनुकरण करायचं नाही म्हणून विद्यार्थाना त्याच गांभीर्य लक्षात येत नाही…शिक्षकाची व्यसन आणि शिक्षीकांची दुटप्पी भूमिका या मुळे पण विध्यार्थी गोंधळून गेलेत..सावित्री बाईणी ज्या उद्देशाने मुलीना शिकवलं तो उद्देश पण आज बाजारात विकायला निघालाय…. मी, माझा नवरा आणि माझी 2 मुलं इतकच माझं कुटुंब हा जर शिकलेली स्त्री विचार करत असेल तर तो सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा अपमान आहे…

म्हणून विध्यर्थाना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोणार नितीमूल्यांची धडे मिळायला पाहिजे आणि त्याची सुरवात आधी शिक्षक आणि समाज यांच्या कडून होयला हवी….माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते की शिक्षण सोडून बाकी सर्व गोष्टीना जिथे प्राथमिकता भेटते तिला प्राथमिक शाळा म्हणतात…

ही जरी शिक्षणाची एक पडकी बाजू झाली तर अजूनही काही शाळा आणि शिक्षक मुलांच्या भविष्यासाठी खूप मेहनत घेतात….परंतु अशा लोकांची संख्या कमी असल्याने जितकं यश शिक्षण क्षेत्रांत असायला हवं तितकं आज तरी दिसत नाही.

काही शाळा आणि शिक्षक आणि समाज किती चांगला असू शकतो यावर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल पण इथे विषय वेगळाच आहे, हे कृपया समजून घ्याल अशी आशा…

धन्यवाद.



आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !

धन्यवाद !


क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !

९१७५४२९००६ / ९१३७३००९२९


करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

आपल्या मुलांच्या नावनोंदणीसाठी !
क्लिक करा !

करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!