राकेश वरपे
(मानसोपचार तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
मुलांचं करीअर कॉउन्सिलिंग – भाग १७
आकुर्डी, पुणे.
अत्यंत तारेवरची कसरत करून आईने मुलाला इथपर्यंत शिकवले. आणि पुढेही शिकून मोठा व्हावा, हे सर्वसामान्यांसारखं असणारं स्वप्न उराशी बाळगून ती माऊली आपली नोकरी सांभाळत आयुष्याचा गाडा पुढे सरकवत होती.
नुकताच मुलगा ९ वी ला गेलाय. नोकरीच्या धडपडीने मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नसल्यामुळे मुलाच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये योग्य बदल व्हावा, हा उद्देश ठेऊन बोलावणं आलं.
तेथे पोहोचल्यावर प्रत्यक्ष मुलाशी भेट झाली. तो स्टँडवर मला घ्यायला आला होता. स्टँडपासून ते त्यांच्या घरापर्यंत चालत असताना मी त्याला काही प्रश्न विचारले. त्याची अत्यंत हुशारीने आणि प्रामाणिकपणे उत्तरे मिळाली. चेहऱ्यावरचा निरागसपणा प्रकर्षाने जाणवला. थोडक्यात मुलाला आणि आईला संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती दिली. आणि सत्र सुरू झाले.
वडील लहानपणीच गेल्यामुळे आईची होणारी सतत धावपळ आणि पुढची अंगावर येणारी जबाबदारी यांच्या जाणीवेबद्दल मी त्याचे निरीक्षण करत होतो. याबद्दल त्याच्या डोळ्यातील चमक मला सकारात्मक भाव देत होते, अर्थात याबद्दल त्याने माझं मन केव्हाच जिंकलं होतं. प्रश्न फक्त उरला होता, करीअरच्या दृष्टीने त्याला योग्य दिशा दाखवण्याचा.
संबंधित त्याच्या सर्व चाचण्या घेतल्या. पुढचा तासभर आलेल्या रिपोर्ट अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रोत्साहित केले, अभ्यासाचे काही कौशल्ये शिकवले. एक प्रखर आठवण म्हणून छानपैकी एकत्र फोटो काढले.
आणि या आयुष्याच्या धावपळीत टिकून राहिलेल्या त्या माऊलीला सलाम करून दोघांची रजा घेतली.
क्लिक करून थेट व्हाट्सएपवर संपर्क करा !
क्लिक करा !
करीअर काउंन्सिलिंग म्हणजे काय ? वाचा !
क्लिक करा !
————————————————————————