Skip to content

प्रत्येकाच्या मनात एकमेव हाच प्रश्न…”सध्या ती व्यक्ती काय करत असेल?”

सध्या तो काय करतो? – भाग १


जयश्री हातागळे


निशा आणि राहुल आज खूप दिवसांनी एक मराठी सिनेमा बघून आले होते. सिनेमाचे नाव? “सध्या ती काय करते?”

दोघांनाही तो सिनेमा प्रचंड आवडला होता. घरी आल्यानंतर त्या सिनेमावरंच चर्चासत्र सुरू होतं…. बोलता-बोलता राहुलने निशाला एक प्रश्न केला, ए निशा, तुझ्या लाईफ मध्ये कोणी होतं का गं असं ? सध्या तो काय करत असेल? असा प्रश्न तुला पडण्यासारखा……

निशा क्षणाचाही विलंब न लावता पटकन उत्तरली….अजिबात नाही. (पण, थोडी अंतर्मुख झाल्यासारखी दिसत होती) उलट, निशानेच राहुलला प्रति प्रश्न केला, तुझ्या लाईफमध्ये कोणी? आणि मिश्किल हसली. यावर राहुल मात्र सहज बोलून गेला हो होती एक कॉलेजमध्ये असताना…. खूप आवडायची मला ती आणि तिलाही मी.

माझं खुप प्रेम होतं तिच्यावर आणि तिचंही. जवळ-जवळ तीन वर्ष आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. ती तीन वर्ष खूप सुंदर गेली एकमेकांच्या सोबतीने. खूप घट्ट आणि निखळ प्रेम होतं आमचं एकमेकांवर….

“प्रिया” दिसायला अतिशय सुंदर आणि सालस होती…. राहुल प्रिया बद्दल भरभरून बोलत होता… अचानक त्याचे लक्ष निशाच्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे गेलं…. लगेच तो भानावर आला आणि निशाची माफी देखील मागितली… सॉरी निशा मी जरा जास्तच बोलून गेलो तुला राग आला असेल ना?

निशा निस्तेज चेहऱ्याने म्हणाली, अरे नाही, तो तुझा पास्ट होताना….

निशा तशी समजूतदार, प्रॅक्टिकल होती. प्रत्येकाचा कुठला ना कुठला भूतकाळ हा असतोच……

एवढे बोलून झाल्यावर राहुल मात्र जरा शांतच बसला होता. निशा त्याला पुन्हा म्हणाली, राहुल सांग ना थांबलास का?

मला आवडेल ऐकायला. आणि गोड हसली.

राहुल मनातल्या मनात खुश होता त्याला निशा सारखी समजूतदार बायको मिळाली होती.

राहुल : अगं नाही हे एवढंच होतं, तिच्या घरच्यांनी आधीच तिचं लग्न ठरवलं होतं…. एक दिवस तिने मला फोन करून सांगितले कि आता आपण एकमेकांना विसरायला हवं. आपल्या प्रेमाला इथेच पूर्णविराम द्यायला हवा. मी घरच्यांनी ठरवलेल्या मुलाशीच लग्न करणार आहे. फोनवरचं तिचं बोलणं ऐकून मी शॉक झालो होतो. माझ्या पायाखालची जमीनच जणू सरकली होती. आपण अंधाऱ्या खोल दरीत कोसळत असल्याचा भास झाला पण सावरलो…प्रेमभंग झाला होता पण मी खचणाऱ्यांपैकी नव्हतो….आत्महत्या तर त्याहून नाही….

यात आपल्या घरच्यांचा काय दोष? आपण एखादं चुकीचं पाऊल उचलून त्यांना का शिक्षा द्यायची ?त्यांच्या प्रेमाची अवहेलना का करायची? किती प्रेमाने जपलेलं असतं त्यांनी आपल्याला…. आयुष्यात असे प्रसंग येतात पण खचून न जाता खंबीरपणे अशा प्रसंगांमधून सावरता आलं पाहिजे.

निशा भान हरपून हे सगळं ऐकत होती…..
ए निशा, अगं कुठे हरवलीस ऐकतेस ना? की मी एकटाच बडबडतोय? निशाचा हात हातात घेत राहुल म्हणाला.

अरे! नाही बोल ना मी ऐकत आहे…. निशा म्हणाली.

राहुल : चल, बास आता मला खूप झोप आली आहे सकाळी ऑफिसला जायचंय मॅडम. ए निशा पण खरंच तुला राग नाही आला ना हे सगळं ऐकताना…. नाहीतर ऐकून घेशील आणि भांडत बसशील नंतर माझ्याशी…. असं म्हणत राहुल जोरजोरात हसायला लागला. निशाही मोकळेपणाने हसली.

निशा: राहुल, झोपण्याआधी ज्युस घेणार का थोडा? मी लगेच बनवते. डिनर तर आपण बाहेरच केलंय.

राहुल: ओके बनव थोडा…. ए पण साखर खूप नको घालूस, नाही तर ऐकना साखर टाकूच नकोस…. नॅचरल ज्यूसच दे मला….

निशा ठीक आहे म्हणत किचन मध्ये गेली आणि ऑरेंज ज्यूस बनवून घेऊन आली…. टीव्हीवरच्या न्यूज बघत-बघत दोघेही ज्यूस पीत होते.

निशा मनातल्या मनात विचार करत होती हे पुरुष कसे पटकन बिनधास्त व्यक्त होतात ना? पण स्त्रियांचं तसं नसतं…. खूप गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो.

एव्हाना, राहुलचा ज्यूस पिऊन झाला होता टिपॉयवर रिकामा ग्लास ठेवतच राहुल निशाला म्हणाला, चल, मी झोपतो गं आणि बेडरूममध्ये निघून गेला….

निशा: हो ठीक आहे, मी जरा किचन ओटा आवरून येतेच….

निशा सोफ्यावर बराच वेळ बसुन होती तीही हरवली होती भूतकाळात, तिलाही प्रश्न पडला होता.

सध्या तो काय करत असेल?


भाग २

??

क्लिक करा


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!