Skip to content

इतरांनी तुमच्यावर प्रेम करायला हवं, म्हणून स्वतःला बदलवू नका..

इतरांनी तुमच्यावर प्रेम करायला हवं,म्हणून स्वतःला बदलवू नका..


सौ. मयुरी महेंद्र महाजन


प्रत्येकाला वाटतं ना….! माझ्यावर सर्वांनी भरभरून प्रेम करायला पाहिजे , हो की नाही …. प्रत्येकालाच वाटतं पण प्रत्यक्षात असं होतं का? नाही होत… येथे जगणार्‍या प्रत्येकाची जीवन शैली वेगळी आहे, प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे ,प्रत्येकाने एकमेकांना समजून घेण्याची पद्धत वेगळी आहे, एवढेच काय सारख्या चेहऱ्याची असलेली माणसं सुद्धा वेगळी आहे, आपल्या बोटांचे ठसे जगाच्या पाठीवर कुणाचेच नसतात …ते आपल्या सर्वांची एक वेगळी ओळख असते….

आणि हो जरी सर्वांना वाटत असलं की माझ्यावर सर्वांनी प्रेम करावं तर त्यासाठी आपण स्वतःला का म्हणून बदलावं… जर का आपल्या स्वभावात ,वागण्यात ,बोलण्यात,…. काही चुका असतील तर त्या नक्कीच बदलल्या पाहिजे परंतु इतरांनी प्रेम करावं म्हणून आपण काय खोटं खोटं वागावं, चांगलं असण्याचा फक्त दिखाऊपणा करायचा, कुणाचं प्रेम मिळावं म्हणून आपण आपलं सर्वस्व पणाला लावत असू तर ते चुकीचे आहे, कारण प्रेमामध्ये कुठली बंधनं नसतात खरं प्रेम तुम्हाला आहे त्या परिस्थितीत, आणि आहे तसचं स्वीकारतं…

आपण सर्वजण जसे आहोत तसे खूप भारी असतो…..किंबहुना ते आपल्यालाच माहिती नसते …..🤦🏻‍♀️पण आपण सर्वात आधी ना स्वतः प्रेम केले पाहिजे आणि भरभरून केले पाहिजे….., आपण आपल्यावरच प्रेम करायला लागलो ना ….मग इतर सर्व पण आपल्याला सुद्धा प्रेम देतात आणि खरं म्हणजे स्वतःवरती प्रेम करावं म्हणजे काय तर कधी काही चुकलं तर स्वतः समजून घेऊन स्वतःला माफ करावे, आणि पुढे निघावं..

कारण मी असाच आहे, माझ्याने नेहमी असंच होतं ,मी खूप मूर्ख आहे, असं म्हणून कित्येक वेळा आपणच आपल्या स्वतःला खूप चुकीचे समजतो ,एकमेकांशी तुलना करत असतो, त्याला हे येतं मला तर तेही जमत नाही….. मला सांगा …! आपण जाड असू बारीक असून उंच असू, बुटके असू ,कसेही असू……..

1- आपण स्वतःला जसे आहोत, तसंचं स्वतःला स्वीकारले पाहिजे.
2- सर्वात आधी स्वतःचं स्वतः सुद्धा वरती प्रेम केलं पाहिजे .

3- जगात असं कोणीच नाही जो परिपूर्ण आहे .
4- प्रत्येकात काहीतरी नावीन्य असतं ते शोधून ,आपली वाट तयार केली पाहिजे .

5- प्रत्येकासाठी जर तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणारं तर तुमचं अस्तित्व संपून जाईल. प्रत्येकाचं प्रेम मिळावं असं जरी वाटत असलं ना तरी आपण काही त्यासाठी स्वतःला बदलुन नाही घेऊ शकत कारण आपण सुद्धा मानव आहोत मशीन नाही… ज्याला त्या मध्ये जे फिच्यर टाकायचे ते टाकू शकतो आणि हो आपण जसे आहोत ना खूप भन्नाट असतो, आपल्या प्रेमाचा आणि आपला आदर करणाऱ्या आपल्या प्रेमाचा आणि आपला आदर करणाऱ्या लोकांना कधीच गमावू नका…

सर्वात महत्त्वाचं जसं आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना…! आपल्यावर सर्वांनी प्रेम करावं तसं सर्वांना वाटतं ना….मग आपण सुद्धा सर्वांना प्रेम दिलं पाहिजे… पण त्यासाठी तुला माझ्यासाठी बदलावं लागेलं,असं राहावे लागेल, तसं करावं लागेल, अशा अटी आणि बंधन नको कारण अटी व शर्ती लागू झाल्या ना….. मग तिथे प्रेम राहत नाही ती फक्त तडजोड असते, आपले आई-वडील प्रत्येकाचे आई-वडील प्रत्येक मुलांवर प्रेम करतात त्यांचे बाळ गोर असो अपंग असो कसे असो तरी ते प्रेम करत असतात ,

या जगात सगळेचं लोक आपल्याला चांगली भेटतील असंही नाही, आणि सगळेचं वाईट असतात असंही नाही, समोरच्या व्यक्तीचं तर खरोखरचं तुमच्या वरती प्रेम असेल तर ती व्यक्ती तुम्हाला आहेत तसं आणि आहे त्याच परिस्थितीत स्वीकारणारं कधी तुमच्या प्रेमाला पारखं नाही करणारं.. कारण प्रेम ही जबरदस्तीने दमदाटी करून दहशत दाखवून नाही निर्माण करता येत जर तुम्ही कोणाला पैसे देऊन सांगितले तरी जमेल का? नाही जमणार…

प्रेम मिळवण्याची नाही तर जाणून घेण्याची गोष्ट आहे ,आपलं आपल्या स्वतःवरती असो, आई-वडिलांचे मुलांवर असो, मुलांचे आई-वडिलांवर असो, असे कितीतरी… फक्त एकच लक्षात ठेवायचं आपली स्वतःचीच नजर स्वतःच्याचं नजरेत कधीच झुकली नाही पाहिजे ,स्वतःशी प्रामाणिक राहून वागायचं काहीच कमी पडत नाही.

“”में बदलूँ क्यूँ खुद को,
प्यार मेरा हो तेरा हो ,
सच्चा है ख्वाँब मेरा ,
चाहे जैसा भी हो…..!

स्वतःचं सुद्धा काही अस्तिव असतं, ज्यांना आपण आवडतो,त्यांन् आपल्या स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना आपण आवडत नाही, ती लोक आपल्या स्पष्टीकरणावरती कधीचं विश्वास ठेवत नाही…. म्हणून काही आपण प्रत्येकाला स्पष्टीकरण देतं बसायचं नाही,…..

‘जिसकों जो समझना हैं, वो वँही समझें’…..

आणि हो प्रत्येकवेळी आपण सर्वांना खूश नाही ठेवू शकतं….कधी कधी सर्वांना खूश ठेवण्याच्या भानगडीत आपण स्वतःचं खूश राहायचं विसरुन जातों…..जी लोक हळव्या मनाची असतात,त्यांना अशा गोष्टींचा खूप त्रास होतो….. नाही होवू द्यायचा ,कारण प्रत्येक गोष्टीचा घडण्यामागे जरं आपण स्वतःला दोष देतं असू, तरं आयुष्याचा आनंद पूर्णपणे नाही अनुभवू शकतं…..

चुका प्रत्येका कडून होतात, शेवटी माणूस आहोतं ,चुका ह्या होणारचं…..चुकाचं झाल्या नसत्या तरं देवाच्या गादीवर आपणचं बसलो असतों ना…..मला नेहमी असं वाटतं… माझ्या चुका ह्या मलाचं सांगा, ईतरांना नको, कारण सुधरायचं मला आहे, लोकांना नाही…..!

आपल्या चुकांची जाणीव ही आपल्यालाचं झाली पाहिजे…प्रत्येकातं जसं काहीतरी चांगलं नक्कीचं असतं, तसं वाईटही असतं…. आपण नेहमी ते बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे….पण कुणाच्याही प्रेमासाठी स्वतः च्या स्व अस्तित्वाला संपवू नका……..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “इतरांनी तुमच्यावर प्रेम करायला हवं, म्हणून स्वतःला बदलवू नका..”

  1. Prakash Bhalerao

    खरच उगाच आपण दुसऱ्यांनी चांगले म्हणावे म्हणून स्वतःला सजवतोय व सादर करतो पण शेवटी ते फार काळ टिकत नाही आपला लेख हा खूप छान आहे.अनुकरणीय व प्रेरणादायी लेख आहे 🙏

  2. फार सुंदर लेख लिहिला आहे मी नकीच स्वतःला आणि दुसऱ्याला बदलण्याची गरज नाही हे लक्षात आलं

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!