
प्रेयसी किंवा प्रियकर होणे सोपे, पण ‘मैत्री’ टिकवणे अवघड !
अभिनव ब.बसवर
इंटर्नशीप संपताच तिला जॉब मिळाला. तिथे एका सिनियरशी तिची मैत्री झाली. जेव्हा ती प्रियकराला भेटायची त्यावेळी ऑफिसमधील त्या मित्राचा बऱ्याचदा कॉल यायचा. मित्र तिच्यासोबत फ्लर्ट करतोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याला ते आवडेनासं झालं.चिडचिड झाली.त्याने तसं तिला सांगितलं.
पुढेही त्याचा उल्लेख झाला की दोघांमध्ये खटके उडायचे.त्याला आवडत नाही म्हणून तिने मित्रासोबतची चॅटिंग,कॉल हिस्ट्री डिलीट करण्यास सुरुवात केली. तिला नात्यात यामुळे भांडणे नको होती. पण एकदिवस कळालंच की ती चॅट डिलीट करतेय. त्यावरून दोघांमध्ये अजूनच जोराचं भांडण झालं. दोघेही एकमेकांना वाट्टेल ते बोलले. एकमेकांची मने दुखावली गेली.
दोघेही आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटले. घडला प्रकार सांगितला. ति म्हणाली, “एका तिसऱ्या माणसाची नात्यात एंट्री झाली त्यावेळी दोघेही अगदीच इममॅच्युअरपणे वागलात. आपली प्रेयसी आपल्यापासून कोणीतरी दूर घेऊन जाईल अशी तुला भीती वाटत होती तर त्यावेळी तिथे आदळआपट किंवा चिडचिड करून प्रश्न सुटत नाही तर प्रेमाने तिला जिंकणं गरजेचं होतं. तू नेमकं उलट वागला. तिच्यासाठी अजून वेळ काढायला हवा होता. ताकद दाखवून युद्ध जिंकता येते मित्रा, प्रेम नाही. तू चुकलास.
काही महिन्यांची ओळख असलेल्या मित्रासाठी इतक्या वर्षाचं नातं असलेल्या प्रियकरासोबत वाद घालणे हि तूझी देखील चूकच. आजकाल आयुष्यात आलेला माणूस कितीही गोड बोलत असला, काळजी दाखवत असला तरी त्याची तुलना इतकी वर्षे आपल्यासोबत खंबीरपणे चालणाऱ्या माणसाशी होऊ शकत नाही. कोणीतरी फ्लर्ट करतेय आणि त्याचा आपल्या प्रियकराला त्रास होतोय हे सहाजिक आहे पण तूलाही त्यावेळी खंबीरपणे वागता आलं नाही. तू देखील चूकली.”
दोघांना आपली चूक लक्षात आली. एकमेकांकडे पाहताच दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं. एकमेकांना मिठी मारताच दोघे मनसोक्त रडले…..
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!


मालकी अधिकाराच्या भावनेतून हे घडते. विचार नावाची गोष्टच येथे हद्दपार होते.त्यामुळे टोक गाठले जाते.
खरे आहे, आणि योग्य लिहिले आहे
Very true
माझाच अनुभव आहे हा….!!!
खूपच छान आहे