Skip to content

प्रत्येकाला ‘मानसिक स्वातंत्र्य’ मिळो…

प्रत्येकाला ‘मानसिक स्वातंत्र्य’ मिळो…


सोनाली जे.


आजच्या ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!

ज्यांनी पारतंत्र्य म्हणजे काय याचा अनुभव घेतला आहे , त्या भीती मध्ये , दरारा, दडपशाही मध्ये जगले आहेत, ज्यांनी काळे आणि गोरे हा वर्ण भेद अनुभवताना मानसिक अत्याचार ही सहन केले आहेत…जाळपोळ या सारख्या काळात घर दार ,,वस्तू सगळे गेले तरी आपण जीवंत राहण्याकरिता आणि आपल्या जवळच्या लोकांना वाचवण्याकारीता केलेली शारीरिक धडपड तर आहेच पण यात आपल्या हातात नसलेल्या परिस्थिती मध्ये मार्ग शोधताना मानसिक दृष्ट्या, मनाने खंबीर होणे , आपल्यावर अवलंबून असणाऱ्या ना आधार देणे हे खरेच अतिशय बिकट काम होते..

या अनुभवातून, संकटातून आज ७५ वर्ष आपण स्वातंत्र्यात आहोत हीच मानसिकता या लोकांना आज अतिशय आनंद देवून जाते..ते पारतंत्र्य अनुभवलेले , जगलेले आज गर्वाने सांगतात आणि पुढच्या पिढीला म्हणतात की तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही स्वातंत्र्यात आहात..

आज आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटलो आहोत निश्चितच .. परंतु आज आपण अडकत चाललो आहोत ते जीवघेणी स्पर्धा मग ती अभ्यासातली असेल , नंबर मिळविण्याकरिता असेल , उच्च पदावर जाण्याकरिता असेल , स्पर्धा असतील , किंवा इतरांकडे हे आहे , त्या वस्तू आहेत माझ्या कडे हे नाही , ते नाही ते घेण्याची स्पर्धा असेल , पैसे कमावण्याची असेल , चढाओढ.

मूल जन्माला येण्यापूर्वी पासूनच आई वडिलांचे प्लॅन्स की त्याला किंवा तिला या शाळेत घालू ..त्या शाळेत घालू ,एक वर्ष भराचे मूल झाले की लगेच शाळेत घालायची आई वडिलांची घाई कारण काय तर या स्पर्धेच्या काळात आपले मूल कुठे मागे राहायला नको ही मानसिकता.
यात होते काय की मुलाच्या मागे वर्ष भरापासून A,B,C,D शिकविण्याच्या मागे , मग त्याला तिला activity classes मध्ये गुंतवून टाकायचे..

पण पालकांच्या लक्षात च येत नाही की लहान मुलांना काही वर्ष तरी मुक्तपणे जगू देत .त्यांना हसत खेळत जगू देत..त्यांना आयुष्याच्या सुरुवातीला च आपण त्यांनी कसे जगायचे , आपल्या मानसिक ताण तणाव यांचा परिणाम होवू देवू नका..त्या उमलत्या वयात मुक्तपणे उमलू द्या..त्यांच्यातली curiosity जागी होवू देत, नवनवीन वस्तू , अनुभव घेताना त्यांना ते अनुभवू देत..त्यांच्या creativity, नाविन्याची आपल्याला ही जाणीव होवू देत..

एका ठराविक पठडीतले तुम्ही शिकवीत गेलात तर त्याची creativity आताच मारून टाकाल तुम्ही ..तसे करू नका ..त्याचे त्याला मुक्तपणे जगू देत…आतापासून च तुम्ही त्याच्या निर्णय क्षमता , काही तरी नवीन शोध घेण्याची वृत्ती , प्रयोगशील वृत्ती वर बंधने घालू नका..जसे puzzle असेल तर ते त्याचे त्याला शिकू देत कसे लावायचे , उलट आहे का सुलट ..त्याची विचार करण्याची क्षमता वाढू देत आणि त्यातून त्याची निर्णय क्षमता वाढविण्याकरिता मदत होईल..त्याचे त्याला प्रयत्न करू देत .

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ. Thorndike च्या नियमाप्रमाणे Trial and error . या learning technique प्रमाणे त्याला प्रयत्न करू देत , ती जिद्द निर्माण होवू देत , चुका त्याला शिकवितील की काय केले की बरोबर काय केले की चूक हे शिकू देत ..मग ते अभ्यास related असेल , व्यक्ती , अनुभव related असेल त्याचा आयुष्यभर उपयोग होईल..

पण याकरिता पालकांनी बाळाला एक स्वतंत्र व्यक्ती , व्यक्तिमत्त्व म्हणून वागविले पाहिजे..त्यांचे ही ऐकून घेतले पाहिजे..आणि अनेक प्रयत्न केल्यावर समजत नसेल तर मार्गदर्शन करण्याकरिता तुम्ही आहातच की, स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याच्या विचारांचा , बोलण्याचा , प्रयत्नांचा आदर ही करा आणि reward आणि punishment technique ही वापरा..मग योग्य वर्तन असेल तर त्याकरिता reward ek शाबासकी ची थाप असेल, किंवा एखादे chocolate, फळ असेल, किंवा पुस्तक वाचनाची आणि त्यातून वैचारिक क्षमता वाढेल अशी , किंवा मोठ्या लोकांची चरित्र त्यांच्या वयानुसार भेट द्या..reward द्या..याउलट वर्तन चुकले तर त्याची जाणीव करून द्याच पण तरी ही समजले नाही तर शिक्षा punishment द्या..पण ती ही अघोरी नको…

जसे की ठराविक अभ्यास पूर्ण होऊ पर्यंत खेळायला नाही पाठविनार..अशा स्वरूपाची की ज्यातून त्यांची मानसिकता बिघडणार नाही फारशी..याचेच उदाहरण माझ्याच मैत्रिणी ने तिची मुलगी अभ्यास करत नाही , ऐकत नाही म्हणून तळजाई सारख्या जंगलात एकटीला सोडून आली आणि मग थोड्या वेळाने परत घेवून आली..पुढे अभ्यासाची भीती ,एकटेपणाची भीती आणि आईच्या वर्तनाची भीती यातून ती मुलगी दोन वर्ष मानस तज्ञांचा सल्ला घेत होती..अतिशय डिस्टर्ब झाली असे करू नका..एवढी punishment ही नको.

आपल्या आयुष्याचे निर्णय असतील, शिक्षण कोणत्या प्रकारचे घ्यायचे , कोणती शाखा निवडायची , मित्र मैत्रिणींची निवड , अभ्यासाच्या पद्धती, जोडीदार निवड , छोटे मोठे निर्णय घेण्याची क्षमता आणि त्याच्या परिणामांना ही तोंड देण्याकरिता सक्षम करण्याकरीता दूर दृष्टिकोन याकरिता मार्गदर्शन करा पण त्यांना त्यांचे मत स्वातंत्र्य द्या , त्यांचे अनुभव घेवू द्यात त्यातून ते शिकतील..

कोणीच कोणाच्या इच्छा , अपेक्षा , मते यांची जबरदस्ती इतरांवर करू नका.. एखाद्याने ड्रॉइंग करताना आकाश निळे दाखविण्या ऐवजी लाल, काळे दाखविले तर ओरडू नका त्या मागे त्याने असा काय विचार केला जाणून घ्या , समजून घ्या..कदाचित त्याने संधी प्रकाश दाखविण्याचा प्रयत्न केला असेल..

नाती जोडताना , जपताना ही असे होईल की एखादा लांबचा जवळचा होवून जाईल कारण मानसिकता जुळत असते त्यात काहीच गैर नाही ना.. इतर कोण काय म्हणेल याचा विचार न करता , इतरांच्या विचार , अनुभव , मतांचा आपल्या विचारांवर , आपल्या इच्छा , अपेक्षांवर परिणाम होवू देवू नका…मानसिक पारतंत्र्य असण्यापेक्षा स्वातंत्र्य असू द्या..स्वतः करिता आणि इतरांच्या करिता ही.

आपल्या मनावर रूढी , परंपरा , संस्कृती या सगळ्या गोष्टींचा पगडा असतोच..शिवाय समाज काय म्हणेल काय विचार करेल यामुळे आपल्या वर्तनावर निर्बंध येत असतात..काय चांगले काय वाईट हे समाज ठरवीत असतो तेही बरेचदा त्यांच्या सोयी , सवडी , आवडी निवडी नुसार . त्यामुळे बरेचदा आपल्याला चुकीचे ही समजले जाते ..आणि आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येतात. स्वातंत्र्यावर बंधने म्हणजे काय तर इतर व्यक्तींची आपल्यावर असणारी बंधने..ज्या गोष्टी आपण आपल्या विचाराने करू पण त्या इतरांना योग्य वाटत नाहीत.

जसे मध्यंतरी fb वरती हेमांगी कवी यांची पोळ्या करताना पाठविलेली पोस्ट खूप गाजली होती..आपण काय पेहराव करावा , मग घरात असताना जे सुटसुटीत असेल आपल्या करिता comfortable असेल तेच पेहराव करणार ना..तरी ही त्यावरून जेव्हा सोशल मीडिया वर पोस्ट गेली तेव्हा त्यावरून गदारोळ माजला म्हणजे मानसिकता ही बदलली गेली .

समाज आणि व्यक्ती यांना त्यांचे दृष्टीने बरोबर असेच वाटते..जो तो दुसऱ्याला आपल्या फुटपट्टी तून मोजतो त्यामुळे आपल्या म्हणण्यानुसार वागला नाही तर तो चुकीचा त्यामुळे या सर्व गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळवीणे ही आता काळाची गरज झाली आहे .आणि म्हणूनच म्हणले गेले आहे की ” जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजात ” .
आजच्या भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी

प्रत्येकाला ‘मानसिक स्वातंत्र्य’ मिळो.. ही आजच्या दिवशी प्रार्थना.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!