जे नशिबात आहे तेच होईलं, असं समजून जगू नका.
मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
मुळात आपण सर्वांत अगोदर नशिबाची व्याख्या पाहू, नशिब म्हणजे काय? हो,काही वेळेस आपण सहजचं नशिब हा शब्द वापरत असतो, पण कधी विचार केलाय का? आपण नेमकं कुठल्या अर्थाने याचा वापर करतो, चला तर मग आज बघूया…
“नशीब” हा शब्द जरी सर्वजण सारखा वापरत असले, तरी त्यासाठी ठरलेली प्रत्येकाची चौकट मात्र वेगवेगळी असते, आता तुम्ही म्हणणारं की ते कसं?
प्रत्येकजण जन्मापासून ते आजतागायत ज्या वातावरणात,ज्या माणसांमध्ये, ज्या अनुभवांच्या आधारे मोठा झालेला असतो, त्या-त्या नुसार त्या प्रत्येकाला लाभलेली समाजशैली वेगवेगळ्या स्वरीपाची असते, आपल्या प्रत्येकावर झालेले संस्कार आणि जीवनप्रवास रोजचं अनुभवायला येणारे घटना व प्रसंग आपली विचारधारा पक्की करत असतात.
जेव्हा मनुष्य खूप प्रयत्न करुन सुद्धा एखादी गोष्ट मिळवू शकतं नाही, तेव्हा त्याला वाटू लागतं, ते आपल्या नशिबातचं नसणारं….. काही लोकांना फारसे काही प्रयत्न न करतासुद्धा खूप काही मिळून जातं, मग आपण म्हणतो अरे वा…! तुझं नशीब खूप चांगलं आहे आपलं काय जे आहे, जे असेल नशिबात तेच होईल…
पण मुळात आपली खरी गफलत होते, ती मात्र इथेच आपण नशिबावर सोडलं की आपल्या प्रयत्नांना मर्यादा येते, आणि प्रयत्न खुंटतात, आणि खरं सांगा द्राक्षी तोडायची आहेत, आणि त्यात असणाऱ्या अंतरापेक्षा जर आपण अर्धच अंतर कापले तर द्राक्षे आपल्या हातात कधीच लागणार नाही. प्रयत्नांमध्ये सातत्य असेल ,आणि कुठली गोष्ट मिळवण्यासाठी जिवापाड धडपड करण्याची जिद्द असेल, तर एक दिवस आयुष्यात तुम्ही नक्कीच तुमच्या नशिबाला हुलकावणी देणारं…..
1)- प्रयत्न केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही
2)-कोणीही मिळवलेल्या वैभवाला नशिबाची उपमा देऊ नका, त्यामागे त्याने केलेले कष्ट सुद्धा असतात ,
3)- काहींना वारसाहक्काने सर्व काही मिळतं ते त्यांचं नशीब नाही त्यांच्यातल्या प्रगतीची खुंटलेली मर्यादा आहे,
4)- जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुमचं आयुष्य आज ना उद्या नक्की खुलणारं यात शंका नाही,
5)- आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आपले प्रयत्न करण्याची सुवर्णसंधी आहे यापेक्षा दुसरं नशीब काय असू शकते .
काही असे असतात जे झालेल्या घडून गेलेल्या गोष्टींना नशिबाचा दोष म्हणून जगत असतात आणि माझ्यासोबत नेहमी असंच होतं, माझं नशीबच फुटकं आहे, काही करायला गेलो चांगलं तरी चांगलं होत नाही, असे नकारार्थी विचार मनात घर करू लागतात,
काळात अनेक जणांनी आपल्या नोकऱ्या, आपली माणसं ,तसेच आपली स्वप्ने, गमावली पण काय आपल्या नशिबात असचं असणार असे म्हणून कसे चालणार ,सांगा ना !काही जे लोक नशिबाच्या भरोशावरती जगत नाही त्यांनी मात्र काही वेगळे करता येईल का ?म्हणून शक्कल लढवली, आणि वेगळ्या पद्धतीने आपल्या प्रयत्नांना स्वरूप देण्याचं काम केलं ,जे काही होतं आयुष्यात ते चांगल्यासाठीच होतं याची प्रचिती आपल्याला नंतर होते आपण जर का घरात बसून आपलं नशीब चमकवण्याचं स्वप्न बघत असू तर ते विना प्रयत्नांची स्वप्नरंजन यात्रा आहे .
कुठल्याही विचाराला प्रयत्नांची साथ मिळाली ना मग मात्र तुमच्या आयुष्यात तेच घडणार जे तुम्ही ठरवणार .
खरं सांगायचं झालं तर काही गोष्टी आपल्या हातात कधीच नसतात म्हणून काही आपण पूर्णतः आपण त्या गोष्टींवर अवलंबून राहण्यात शहाणपण नाहीच, कारण प्रयत्न एवढ्या मनापासून करावे की नशिबात नसलेलंसुद्धा खेचून आणता येतं… कधी कधी आपली चौकट हे आपण ठरवलेली असते आणि आपल्याला वाटतं तेवढंच जग आहे आपण कधी त्या चौकटीच्या बाहेर जाण्याचा विचारच करत नाही, कारण म्हणजे काय तर कधी न पाहिलेला भविष्य आपल्या सोबत घडून गेलेलं एखादं दुःख घटना प्रसंग की अशी काहीतरी जादू जी तुमचं आयुष्य बदलून टाकेलं ,नाही .
जगण्याचं नाव संघर्ष आहे काल काय झालं याचा पश्चाताप न करता, उद्या काय होईल याची चिंता न करता, आता माझ्या आयुष्याला मला आनंदित कसं जगता येईल याची जाणीव असणं म्हणजे आयुष्य आहे
मी आज प्रयत्न कसे करणार की उद्या तेच होईल जे मला हवे नशिबाला दोष देऊन फायदा नाही आपण प्रयत्न करण्यातच कचरतो, कारण आपल्याला सर्व इन्स्टंट आणि तात्काळ हवं असतं,
सर्व झालेल्या घटना प्रसंग आयुष्याचा एक भाग म्हणून सोडून द्या, येणारं उद्याचं भविष्य मात्र स्वतःच्या प्रयत्नांच्या बळावर मिळविण्याचा निर्धार करा, आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही खचू, पळू, निराशा येईल, हरलो म्हणून धीर सुटेल, पण शरीरात प्राण असेपर्यंत लढू …हीच तुमच्या अपयशाला पांघरूण घालून यशाची गवसणी नक्कीच चढेलं…!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Thank You for giving this motivation 🙏👍👍
Thanks a lot very inspiring and motivating things are there
I am so happy with that thoughte🥰