Skip to content

जगण्याला आज प्रिय असतो, तो उद्यावर ढकलू नका.

जगण्याला आज प्रिय असतो, तो उद्यावर ढकलू नका.


मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


मी जर का समजा, तुम्हांला असं सांगितलं की,ही एक ‘डेअरी मिल्क’ ची चाॅकलेट आहे ,पण ती तुम्हांला आज दिली,तरी ती तुम्हांला आज नाही खायचीय, ती तुम्हांला दोन किंवा तीन दिवसांच्या नंतर खायचीय ,तरं तुम्हांला कसं वाटेलं?

आणि समजा नंतर तुम्ही ती चाॅकलेट खायचे विसरुनचं गेलातं,तुमच्या लक्ष्यातचं नाही राहिले,की तुम्हांला चाॅकलेट खायचे होते,आणि भरपूर दिवसांच्या नंतर जेव्हा तुमचे काहीतरी कामाच्या ठिकाणी काही शोधत असतांना अचानक तुमच्या हातात ते चाॅकलेट लागते,आणि जेव्हा तुम्ही ते उघडून बघता तेव्हा ते खराब झालेलं असतं किंवा त्याची ‘एस्पायरी डेट’ संपलेली असते, तेव्हा कसं वाटेलं तुम्हांला (फक्त कल्पना करा)

हो अगदी त्या कॅटबरी सारखचं आहे हो,आपलं आयुष्यसुद्धा जर का आज ओपन केलंत तरं आजचं जगून घ्या,त्याला उद्यावर ढकलू नका,
आयुष्य हे प्रवासासारखं असतं पुढे रस्त्यात आपल्यासाठी कुठली आव्हान आहेत, कुठली संकट आहेत,हे तुम्हांला कुठलाचं जोतिष नाही सांगू शकतं…

“जिंदगी एक सफर हैं सुहाना
यहाँ कल क्या हो किसने जाना…..”

अगदी या ओळी प्रमाणे आपण सर्वचं एक कधीही न पाहिलेल्या (भविष्याचा) विचारात रममाण असतो,पण त्याचं भविष्याचा विचार करत असतांना अनमोल असं काहीतरी हातून सुटतंय,याचा मात्र आपल्याला कधी अंदाजही लागत नाही ,उद्याची चिंता नाही म्हटलं तरी ती प्रत्येकालाचं असते आणि काही प्रमाणात असावी सुद्धा,

पण आपला वर्तमान आताचा क्षण आज जो आपल्याला खरचं खूप काही देण्यासाठी आलेला असतो तो पूर्णतः न जगता आपण उद्यावर ढकलून देतो, आयुष्यात कधीचं कुणाशी स्वतःची तुलना करु नका, भगवंताने प्रत्येकाला अलौकिक दिलंय,आणि भरभरुन दिलंय आणि आपल्या आज मध्ये प्रत्यक दिवशी तो देतचं असतो,आपल्या जगण्याला आपला आज द्या,

खरं म्हणजे खूप लोक खूप काही ठरवतात,पण फक्त उद्याच्या भरवश्यावर ,आपल्या आजमध्ये आता काय करता येईल,ते बघून जगायला लागलो नं,आपला आजचं नाही,येणारा प्रत्येक आज रोजचं साजरा होईलं आणि हो ,का करु नये साजरा,जरुर साजरा करुया आपला आज….

आजूबाजूला घडणार्‍या घटना, प्रसंग, ऐवढेचं नाही तर स्वतःवरती कोसळणारी दुःख,संकट, पायाखालची जमीन सरकावी अशी ऐक ना अनेक वार, यातना सहन करत आयुष्याचा हा प्रवास सुरु असतो,कधी कधी भुतकाळात घडलेली घटना प्रसंग ,एखादं दुःख काही केल्या आपण विसरुचं शकतं नाही, त्यामूळे आपल्याला आजमध्ये जगायला त्रास होतो,आपण फक्त दिवस ढकलतो,आज मात्र निघून जातो…

आणि आपल्या जगण्याला आपला आजचं प्रिय असतो,तो उद्यावर ढकलून त्याचं अस्तित्व संपतं… खरं म्हणजे आपण कुणाच्याही दुःखाला समजू शकतो ,अनुभवू नाही शकतं,यालाचं मानशास्त्रात तद्नुभुती म्हटंलं जातं… मी जरं असं म्हटले की, चाॅकलेट आज खा,पण चव मात्र उद्या घ्या होईलं का नाही होणारं असं..

ईतकं आपल्याला आपल्या जगण्याला आपल्या आजशी घट्ट करायचंय की चाॅकलेट खाणं आणि चवं घेणं, कारणं हे जमलं की आपला येणारा आणि गेलेला कुठल्याही क्षणाची आठवण मग समाधानाचीचं असणारं यात शंका नाही….

आणि जगायला काय पाहिजे ,अजून हे मिळाल्यावर मला चांगलं वाटेलं,ते मिळाल्यावर चांगलं वाटेलं,कशाला जे आज आहे,सर्वांत बेस्ट आहे, यात शंभर टक्के दिले नं, येणारं भविष्यसुद्धा शंभर टक्के नीचं परत करणारं यात शंका नाहीचं….

जगण्याला आज का प्रिय असतो माहितीय कारण की,आपल्या आजमध्ये कधीचं झालेल्या मुरगळलेल्या कुठल्याही नवीन आव्हांनाचा बोझा नसतो… आणि खरं सांगा,जरं प्रवासात आपण जास्त ओझं घेवून प्रवास केलातं तरं कमी ओझं आणणार्‍याचा प्रवास सुखाचा होणारं की जास्त ओझं आणणार्‍याचा ? नक्कीचं कमी ओझं ठेवणार्‍याचा प्रवास सुखाने होतो,त्यामुळे किती ओझं वागवायचं आणि स्वतःला किती त्रास करुन घ्यायचा हे आपलं आपणंचं ठरवायचं….

“कोई दाल में खूश हैँ,तो कोई माल में खुश हैं,
खुशनसीब तो वो हैं ,जो हर हाल में खुश हैं””
कल किसनें देखा हैं,

अपना आज तो खुल के जी लेतें हैं, ऊसने हमारा क्या बिगाङा हैं…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!