Skip to content

कोणत्याही विनातक्रार आयुष्य भरभरून जगूया..

कोणत्याही विनातक्रार आयुष्य भरभरून जगूया..


मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


आता भरपूर जगाव म्हणजे काय? तर आपण किती जगणारं हे काही आपण ठरवू शकत नाही, परंतु आपण कसे जगणारं हे ठरवू शकतो .

आता इथपर्यंत संभाषण झालं गोडीगुलाबीन पण खरं सांगा हो, असं होतं का नाही होतं,

कारण की कितीही स्वतःला सावरून वागलो तर एखादी वेळ अशी येते जेथे आपल्याला वाटतं खरंच आपण जगतोय का? येतात असे प्रसंग, घडतात काही घटना-प्रसंग असे जेव्हा सगळे काही सोडून जावस वाटतं, जगणंच नको वाटतं ,संयम सुटतो भावना अनावर होतात ,आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात ,आणि ओढ लागते ती आपल्या माणसांची जिथे हक्काने कांदा ठेवून रडता येईल अशी जागा त्याला पण काही लोक अपवाद असतात.

कोणावर विश्वास ठेवून मनातलं सांगणं आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने आपल्या विश्वासाला पात्र असं लोक म्हणतात हल्ली हे खूप दुर्मिळ झालंय, पण मला वाटतं आपण आपल्यातही हे शोधलं पाहिजे आपण खरंच किती लोकांच्या विश्वासाला पात्र आहोत,
खरं म्हणजे तुमच्या सर्वांना माझा लेख देण्याचा हा उद्देश नाही की मला खूप काही मोठं आहे परंतु आई-वडिलांच्या संस्काराने आणि भगवंताच्या कृपेने जे काही शब्दात मांडण्याची कला अवगत झाले त्यासाठीच हा अट्टाहास.

खरंतर लिखाणाची सुरुवात जगण्यापासून झाले बघितलं तर प्रॉब्लेम कुणाला नसतात ते सर्वांनाच असतात हे ऐव्हाना आयुष्यात प्रॉब्लेम असते तर आपल्या क्षमता कधी बाहेर आल्या नसत्या. “”अगर आराम से बैठकर बीना प्रॉब्लेम की जिंदगी चलती तो सोचो हमारी जिंदगी रंगो सें भरी नहीं, बल्की सुखी बेरंग होती””

प्रत्येक समस्या ही जाण्यासाठीचं आलेली असते, वास्तविक हे दुसर्‍यांना सांगणं खूप सोप असतं, परंतु स्वतःचं दुःख स्वतः पचवणं खूप अवघड असतं,

आतापर्यंत मलासुद्धा छोट्या छोट्या समस्या खूप मोठ्या वाटायच्या, परंतु जेव्हापासून अनुभवांना सुरुवात झाली, तेव्हा वाटायला लागलं, आपलं दुःख काहीचं नाही,यापेक्षाही मोठं मोठी दुःखाची डोंगर लोक सहज पार करत असतात का?

कारण ते कधीचं तक्रार नाही करतं. आता आयुष्यात कुठल्याचं गोष्टींविषयी तक्रार उरली नाही,एक अत्यंत सुरेख विचार हा की, “आपली दुःख ही आपल्यालाचं भोगायची असतात, ती आपल्यालाचं पारं करायची असतात,कुणाला आपलं दुःख सांगून ते जातं नाही,हे आपल्यालाही माहिती असतं.

पण आयुष्यात अशी जागा नक्कीचं कमावली पाहिजे,जेथे आपल्याला निसंकोचपणे दुःख मांडता येईल. आयुष्य आहे म्हटल्यावर चालायच्याचं काही गोष्टी,जसं जेवणातं सर्व चवी महत्वाच्या असतात तसंचं आयुष्यात संकट ,दुःख आणि माणसं वेगवेगळ्या प्रकारची असणं महत्वाचं.

शेवटी आपल्याचं हातात असतं,आपण कसं जगायचं,आणि कुठे कुणाला दुर्लक्षित करायचं कारण आज जरी काही जमत नसेलं ,तरी आपण जमवून घेवू ही विचारधारा अंगीकृत करुन वाटचालं सुरु ठेवावी, प्रत्येक दिवसात आपलं अनमोलं आयुष्य भरभरुन जगलचं पाहिजे, त्यातचं खरं सुख आहे…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!