Skip to content

चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे, केव्हाही उत्तमच!

चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे, केव्हाही उत्तमच!


मोनिया जे.


लहान मुलं किती सुंदर, गोंडस, निरागस असतात नये! आणि जेव्हा ते नुकतेच जन्मलेले असतात तेव्हा तर आई वडील तर आनंदी असतातच, पण बाकी सारं कुटुंबही किती खुश असत! आजूबाजूचे लहान मुलं सुद्धा नवजात बाळाला पाहून अजूनच गोड हसतात, अशावेळी एक वेगळीच अनुभूती सर्वांना अनुभवायला मिळतं असते!

मातेच्या उदरात गर्भरूप धारण केल्या नंतर अखंड नऊ महिने तो गर्भ दिवसेंदिवस, प्रत्येक नव्या महिन्यांत नव्याने आकार धारण करत असतो, हळू हळू इंद्रिये, अवयव, शारीरिक, बौद्धिक क्षमता यात वाढ होत असते, आणि मग नऊ महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आई किंवा बाप यापैकी कोणाचे तरी रूप,गुण घेऊन परिपूर्ण बाळं जन्माला येते!

माणसाच्या आयुष्यात फक्त हीच एक गोष्ट अशी नाहीये , ना?

नातेसंबंध, शिक्षण, करिअर, वैवाहिक जीवन, पालकत्व, वृद्धापकाळ ह्या साऱ्या स्थितीतून जातं असताना आपल्याला आईच्या उदरात वाढत असलेल्या त्या गर्भाप्रमाणेच एक एक दिवस मोजावा लागतो, सुस्थित पोहचू पर्यंत, स्वतः मधलं एक देखणं अस्तित्व उदयास आणू पर्यंत!
गर्भयशयात असतो तसा एकटेपणा ही जाणवेल कधी कधी!

काळोख्या रात्री भयावह वाटत राहतील, पण तरीही आपल्याला गर्भ कवचात सामावून , सांभाळून ठेवत असल्येल्या सृष्टीरुपी मातेकडूनच सकारात्मक तरंग स्वतःकडे आकर्षित करत स्वतःला योग्य तितकी वेळ देत, पिंड जस स्वतःला दिवसेंदिवस घडवत असत ना, तसंच अगदी आपण मनुष्य रुपी जन्माला आलोय हे ध्यानात ठेवून स्वतःला घडवायचं असतं ना मित्रांनो!

बाहेरच्या जगाच्या भलत्याच अपेक्षा असतील ही, जगातले लोकं आपल्या मुळे कधी खुश असतील, कधी नाराज होतील ही, पण आपण स्वतःला कसं घडवतोय हे जास्त महत्वाचं!

आणि घडायचं आहेच तर का सुंदर, शितल, सौज्वल, संस्कारी बनू नये? मी शारीरिक ठेवणीची गोष्ट करतच नाहीये! अंतरंग सुंदर सक्षम असलं पाहिजे, मग आतूनच ह्या अमूल्य गोष्टीचा पुरवठा होत राहिला तर आपोआपच शरीर ही सुंदर दिव्य रूप धारण करतच की! आणि मग जगण्यात, छान जगण्यात एक उत्तम असा आत्मविश्वास येतो! आणि उत्तम , अमूल्य गोष्टी बनायला वेळ तर लागतोच!

स्वतःला उत्तम रित्या घडावा, सारं काही उत्तम असच घडत जाईल, पण त्यासाठी पार करावा लागणारा कालखंड अगदी उमेदीने, संयमाने पार करावा लागणार आहे, हे विसरू नका , बरं का!

कधी कधी थोड्या अडचणी येतील, घेतलेले निर्णय चुकलेत असे वाटेल, काही प्लॅन्स कॅन्सल करावे लागतील, आर्थिक , मानसिक, शारीरिक क्षमता पूरक असा साथ देऊ शकत नाही असेही होईल, नातेसंबंध यामध्ये काही प्रॉब्लेम येऊन ठेपतील, आपल्याला समजून घेणार कदापि कोणी नसेल, याऊलट खूप साऱ्या अपेक्षच ओझं, जबाबदऱ्यांचं ओझं सतत आपल्याला सतावत राहील, प्रेमभंग, विरह, फसवेगिरी, एकटेपणा, नैराश्य, अविश्वास, आजारपण या सर्वांनी कदाचित जीवन त्रस्त होईल ही पण म्हणून वाईट मार्गाचा अवलंब कधीच करू नका !

कारण सुखं मिळवण्यासाठी वाममार्ग, बेकायदेशीर पणा, अमानुषपण हे सर्व सोप्प वाटेलही ,पण हे खरंच खूप हानीकारक आहे, अगदी तसंच जस त्या गर्भातल्या बालकाला, मातेच्या, अवती भोवती असलेल्या लोकांच्या कोणत्याही वाईट गोष्टी, सवयी हानीकारक ठरु शकतात ना तसंच!
एक योग्य , परिपकव व्यक्तिमत्व घडवायला , जसे परिस्थिती बऱ्याचदा हाता बाहेर असणारे पालक ही अतोनात प्रयन्त कष्ट करून, पै पै जमा करून लेकराला घडवतात, अगदी तसच आपल्यालाही आपलं व्यक्तिमत्व जोपासायच आहे!

आज जगाला, समाजाला गरज आहे ती मानवतेची, मायेची , मदतीचा हात देणाऱ्या उदार मनाची ! पण कुठेतरी हे सर्व हरवत चाललय कारण जो तो फक्त आयुष्यात काहीतरी मिळवण्याच्या मागे हात धुवून लागलाय!

कमावण, मिळवणं यात गैर मुळीच काही नाही, पण आपण कोणती पद्धत अवलंबतो , हे महत्त्वाचं, आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, “Good things takes time!” या प्रमाणे योग्य दिशेने आपली पावलं पडू देत, उत्तम व्यक्तिमत्व साध्य करत, उत्तम ते निवडा!

उत्तम गोष्टी अनमोल असतात, त्यासाठी वेळ देणं हे सर्व श्रेष्ठ गिफ्ट असू शकत अस मला वाटत, त्या दरम्यानचा वेळ हा त्या उत्तम गोष्टी साठी स्वतःला तयार करणे, स्वतःला घडवणे यांत व्यतीत केला , स्वतःशी आणि इतरांशीही प्रामाणिक राहत एक माणूस म्हणून गरजेचे असलेले हृदय बाळगत वाट वाट , दिवस- दिवस, काही महिने, वर्ष वर्ष, काहीदा क्षण क्षण संयमाने वेचत राहिलो तर नक्कीच हवे ते यश मिळवण्यासाठी कोणीही आपणांस रोकू शकत नाही! आणि आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी होईल!

याचं नुकतंच घडलेलं एक उदाहरण बघता, ऑलम्पिक मध्ये भारतासाठी, भालाफेक या खेळातून सुवर्ण पदक जिंकून स्वतः बरोबरच , आई वडील, समाज, देशाच ही नाव इतिहासात नोंदवलं!

या सर्वासाठी त्याने काय मेहनत घेतली, किती जिद्द , आत्मविश्वास बाळगला हे तर प्रशंसनिय आहेच! पण त्याने या सर्व गोष्टी साठी भरपूर वेळ घेतली, त्या वेळेचा सद उपयोग करत स्वतःला घडवलं,

कोरोना सारख्या भंयकर साथीरोगाला त्यानेही तोंड दिल!आणि तब्बल तेरा वर्षानंतर त्याने निराशावादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत अनेक हताश होतकरू तारुणांसमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे!

योग्य दिशा, योग्य वाटचाल, संयम, अथक परिश्रम आणि जिवनाबद्दल सकारत्मकत विचारशैली, आणि हार न माननं हे तुम्हाला उत्तम रित्या घवघवीत यश संपादन करण्यास नक्की मदत करेल! त्यासाठी खरच, सर्वप्रथम उत्तम व्यक्ती बना, वाईट मार्ग निश्चितच टाळा!

कधी जिवनात धडपडालच लहान मुलांसारखं! पण त्याच्या कडूनच शिका, की जितक्या जोरात पडालं, जितक्या जोमात पुन्हा सामर्थ्यशिलपणे ऊभे रहाल! जितक्यांदा कोसळालं तितक्यांदा स्वतःल नव्याने निर्माण करालं! हीच कार्यक्षमता सर्व निराशाजनक स्थितीचा लय करून तुम्हाला खऱ्या अर्थी सजिव ठेवेल!

तुम्हीच कर्म! तुम्हीच तुमचे उत्तम कर्ते व्हा! उत्तम क्रिया घडत राहील!

आणि जिंकल्याचा मनसोक्त प्रामाणिक आनंद घेत, हातशलेल्या इतरांना पण हात द्या!
इतिहासाची पाने तुमची वाट बघत आहेत!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे, केव्हाही उत्तमच!”

  1. योगेश सोसे

    खूप सुंदर ,अचूक दिशादर्शक लेख……..
    उत्तम, प्रेमळ वागणाऱ्या परंतु आपले वागणे खरच या आत्ताच्या स्वार्थी जगात योग्य आहे का? असा प्रश्न पडणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी लेख …खरच अचूक वेद घेता तुम्ही मानवी मनाचा आणि उत्तम मानसशास्त्रीय अभ्यास आहे आपला. आपल्या प्रगल्भतेला सलाम…. आणि खूप खूप शुभेच्छा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!