Skip to content

नको त्या गोष्टींना घाबरत बसाल,तर आयुष्याने दिलेली एक एक संधी गमावाल…

नको त्या गोष्टींना घाबरत बसाल,तर आयुष्याने दिलेली एक एक संधी गमावाल…


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्याच्या थाळीत आनंदाची कोथिंबीर भुरभुरायची राहिली…इतकच नाही ओ… या…कोंथिबीरीच्या नादात उरलेल्या भावनांच्या मसाले भाताची चव चाखायची राहिली…!!

आयुष्य खरचं खूप सुंदर आहे. पण चुकून एखाद्या गोष्टीमुळे आपण काही गोष्टी करायच्या विसरतो किंवा बऱ्याचदा त्या गमावतो.आणि मग जगणं कसं निरस वाटायला लागतं.”मला या या गोष्टीची भीती वाटते मी हे नाही करणार.मला ते करायची खूप इच्छा आहे पण नको.मला भीती वाटतेय.मन खूप घाबरतय माझं.नकोनको ते विचार मनात घर करतायेत. नकोच त्यापेक्षा मी हे करतच नाही.

असं आपण कित्येकदा बोलतो किंवा आपल्याला असं अनेकदा वाटतं. आणि यामुळेच आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी सहजच सोडून देतो.सोडून द्यायच्या नसतानाही….!! पण मग गोष्टी करायच्या असतानाही आपण त्या सोडून देतो.तेही अशा एका क्षणात…!का कशासाठी…??भीती वाटते , घाबरता….म्हणून…??

आयुष्यात कित्येक प्रसंग असे येतात ज्याने आपलं आयुष्यच बदलून जातं.असे प्रसंग की , ज्यामुळे आपण अगदी छोट्या छोट्या आणि नकोनको त्या गोष्टींना घाबरायला लागतो. (गोष्टींचा उलगडा करणार नाही कारण आपल्याला माहीत आहे की आपण कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो…)एक प्रकारची भीतीच आपल्या मनात दडून बसते.ती बाहेर यायला तयारच नसते.

आयुष्य जगायची खूप इच्छा असते पण ती एक अनामिक भीती मात्र चालणाऱ्या या पावलांना मागे खेचण्याचा प्रयत्न करते.एखाद्या गोष्टीचा मनात खोलवर घाव होतो.जखमा भरायला वेळ लागतो.पण मग असं घाबरून किती काळ जगायचं…???आयुष्यात गेलेली वेळ परत नाही येत… पण आयुष्य प्रत्येक वेळी एक नवी संधी घेऊन नक्कीच भेटायला येतं…..!!

एक छोटासा प्रसंग सांगते——

मालती नावाची एक मैत्रीण होती.सगळ्यांच्या आयुष्यात दुःखं येतात तशीच तिच्याही आयुष्यात दुःखं यायची- जायची.आमच्या भेटीगाठी तशा कमीच व्हायच्या.पण हळुहळू भेटण अगदी कमीच झालं.अशातच काही दिवसांनी मला अचानक एक निनावी कॉल आला.आणि तो कॉल होता सुलभा काकूंचा…म्हणजेच मालतीची आई…! त्यांनी मला एक दिवस सहजच घरी बोलावल होतं.आणि मी गेले घरी. पण घरी जाऊन बघते तर काय….???

इतके दिवस हरवलेल्या मालतीशी माझी भेट झाली. पण तिला पाहिल्यावर मी निःशब्द झाले होते.कधीही शांत नसणारी मालती अक्षरशः तेव्हा एका निपचित हरणासारखी त्या खोलीत पडली होती. चेहऱ्यावर तेज नव्हतं.अगदी मलुल दिसत होती ती. आयुष्यात हसत हसत दुःखं पचवणारी ती मालती पार खचून गेली होती.अगदी खिडकीतून डोकवायलाही ती नको म्हणायची…..!!

तिच्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्या होत्या ज्यामुळे ती कितीतरी छोट्या गोष्टींना घाबरत होती. पण तिला यातून बाहेर पडायची खूप इच्छा होती हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. खरतरं ती वेळ काही कविता सुचण्याची नव्हतीच मुळी…..पण नकळतपणे तिच्याकडे पाहून काही ओळी मला सुचल्या—— का,कोण जाणे….

आंक्रदले डोळे तिचे
छळत होतं मनही तिला…….
घाबरून राहीली ती
घट्ट बिलगून स्वतःला…..
नजर बोलकी बोलत होती
भीती वाटते सांगत होती….
पण..
आयुष्य जगायचय नव्याने
न डगमगता , न घाबरता
चेहऱ्यावर थोडी अशी आशेची पालवीही
दिसत होती……..!!

काही दिवसांनी हळुहळू ती सगळ्यातून बाहेर पडली. तिला सगळ कळत होतं पण काहीच वळत नव्हतं.घाबरून राहिली होती ती कित्येक दिवस. आणि आयुष्यातील कितीतरी गोष्टींना ती मुकली होती. पण आता काहीही झालं तरी आयुष्याने दिलेली एक एक संधी गमवायची नाही हे तिने मनाशी पक्क केलं होतं. कारण तिला तिच्या या भीतीमुळे बरच काही गमावल्याची जाणीव झाली होती. खरचं , ती मालती पुन्हा गंधाळायला लागली याचा आनंद मात्र सगळ्यांच्या मनात दरवळत होता……!!

गंध नाही गेला………………. पण..,पाकळ्या मात्र विखरून गेल्या…!! असचं काहीसं आपल्या बाबतीत होतं.भीती जात नाही पण आयुष्य जगायचं मात्र राहून जातं…..!! घाबरून घाबरून किती दिवस घाबरणार…??आयुष्य क्षणाक्षणाला नव्याने साद घालत असतं.ते आयुष्य जगायची एक एक संधी नव्याने देत असतं.

पण आपण मात्र घाबरून एका कोपऱ्यात बसतो.गोष्टी भान ठेवून बिंधास्त करायला शिकल पाहिजे. एखादी गोष्ट एकदा चुकीची घडली म्हणजे ती सारखी चुकीचीच घडेल असं नाही नं…??आणि घडलीच चुकीची तर काय हरकत आहे…??आपण माणूस आहोत, चुका तर होणारच…!!आणि पाण्यात उतरल्याशिवाय त्याचा अंदाज कसा घेऊ शकतो आपण…?त्यामुळे पुन्हा एकदा तीच गोष्ट करायला घाबरू नका.यावेळी काहीतरी वेगळं आणि चांगल घडेल असा दृष्टिकोन ठेवा.कारण आपल्याला माहीत नसतच… आयुष्य कोणती संधी केव्हा आणि कुणाला देईल………..!मग आयुष्याने ही दिलेली संधी अशीच घाबरून नाकारायची का…??

तर नाही. बिलकुल नाही.. आयुष्याने दिलेली एक एक संधी खूप महत्वाची असते.कारण आपण आपल्या आयुष्यात एखाद्याला “Sorry” म्हणायचीही संधी लवकर देत नाही…पण आयुष्य पुन्हा एकदा संधी देतं….नवं काहीतरी करण्यासाठी.नवं काहीतरी अनुभवण्यासाठी..!!त्यामुळे आयुष्य जी संधी देईल तिला स्वीकारा.जे करावसं वाटतय ते अगदी बिंधास्त करा.

कारण पुन्हा तिच गोष्ट करता येईल की नाही हे कुणी सांगू शकत नाही. आलेली संधी अशी वाया जाऊ देऊ नका. आयुष्य नव्याने साद घालतय न…..मग घाबरू नका…उठा…दीर्घ श्वास घ्या….मोकळ्या मनाने हवं ते करायला शिका……आणि आयुष्यच पुन्हा पुन्हा संधी देऊ शकत…. त्या संधीला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा.बाकी आयुष्य सुंदरच आहे…ते जगता आलं पाहिजे!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “नको त्या गोष्टींना घाबरत बसाल,तर आयुष्याने दिलेली एक एक संधी गमावाल…”

  1. Gokul anil jaybhaye Jaybhaye

    मला बाईक चालवायला भिती वाटते

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!