Skip to content

हे १६ टिप्स वाचा आणि व्यावहारिक जगताचे एक बलाढ्य सैनिक बना.

व्यवहारी जगतात मेंटली आंधळं न होण्याच्या काही टिप्स.


सोनाली जे


या व्यवहारी जगतात सगळे च असे आहेत की त्यांच्या मनासारखे झाले नाही किंवा तुम्ही त्यांच्या मनासारखे वागला नाहीत की तुम्ही चुकीचे ठरता..तुम्हाला स्वतः चे खरे करायची सवय आहे असा गोड गैर समज किंवा समज लगेच तुमच्या विषयी निर्माण होतो किंवा यापुढे जावून egoistic.. अहंकारी..किंवा अगदी psychic.. किंवा सटकू ही..

बरेचदा या व्यवहारी जगात तुम्ही असेच का केले , असेच का बोललात , हेच का केले , तेच का केले किंवा का केले नाही , का झाले नाही अशा अनेक इतरांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नसल्याने आपण विविध प्रकारचे विचार करून मेंटली आंधळं होत असतो ..म्हणजे नेमके काय होते की आपण असे वागलो तरी लोकांच्या दृष्टीने ते चूक ..

पुढच्यावेळी असे वागलो होतो म्हणून चुकीचे ठरलो म्हणून तसे वागून बघितले तरी ते ही चूक मग आपण नक्की करायचे काय असा प्रश्न पडतो ..दोन्ही प्रकारे वागून बघितले तरी चूकच..किंवा ते कोणाला न पटणारे..अशावेळी नक्की काय करायचे हा प्रश्न किंवा असे प्रश्न पडून आपण मेंटल ब्लॉक किंवा मेंटली आंधळे किंवा mental blindness येतो ..पुढे काहीच दिसेनासे होते…त्या अंधारातून वाट कशी काढणार म्हणून अजून confusion..

म्हणूनच या व्यवहारी जगतात मेंटली आंधळं न होण्याच्या काही टिप्स बघुया :-

१. स्वतः चे ठाम निर्णय. .विचारांचा पक्का निर्धार : –

प्रत्येक जण वेगळा विचार करतो , त्यांचे मत वेगळे असते, त्यांना आलेले अनुभव वेगळे असतात. म्हणून त्याना जसे वाटते, जसे आलेले अनुभव आहेत त्यानुसारच आपणही व्यवहार करावेत म्हणजेच वागावे असे ते अपेक्षा करतात. परंतु तुम्हाला तुमचे विचार ठाम करता आले पाहिजेत..त्याचे फायदे , तोटे, मग अल्पकालीन , दिर्घकालिन असतील किंवा संभाव्य धोके या विचारांची बैठक पक्की हवी.
इतरांची मते , अनुभव , विचार ऐकून घ्या पण स्वतः चे विचार पक्के करा आणि ठाम निर्णय घ्या.

२. सोशल मीडिया च्या‌ आहारी जावू नका किंवा त्याचा परिणाम होवू देवू नका :

एक तर सोशल मीडियावर जास्त काळ असलो तरी लोकांना त्रास असतो..ते तसे बोलून दाखवतात की सतत सोशल मीडिया वर असतो म्हणून..शिवाय यावर असणारे मित्र मैत्रिणी , सल्ला देणारे कमी पण शिकविणारे च जास्ती असतात..ते म्हणजे पाण्या बाहेर राहून हात वारे कसे करायचे आणि पोहायचे कसे याचे काठावरून प्रशिक्षण देणारे.

याउलट आपण काही विचार मांडले किंवा समस्या विचारल्या तर तेव्हा शांत राहणारे आणि चुकले की मात्र टीका करणारे. त्यामुळे शक्यतो सोशल मीडिया एखादा reference घेण्या करिता नक्की वापरा.पण त्याच्या आहारी जावू नका.

३. नाही म्हणायला किंवा नकार द्यायला शिका :

अनेकदा समोरच्या व्यक्तीचा विचार करून इच्छा नसताना ही खूप काम करायला तयार होतो , ती व्यक्ती, रागावेल , चिडेल किंवा त्या व्यक्तीला वाईट वाटेल असे विचार करून स्पष्ट न बोलता आपण कामाला होकार देतो. म्हणूनच तुम्ही जर comfortable नसाल तर एखाद्या कामासाठी स्पष्टपणे नकार द्यायला शिका.

४. व्यक्ती पारखा आणि नकारात्मक व्यक्तिं पासून दूर राहा :

काही लोक खूप नकारात्मक वाटतात.त्यांच्याशी बोलल्यानंतर उगीच बोललो असे वाटते .आत्मविश्वास कमी होतो.अशा लोकांपासून दूर राहा. काही लोक फक्त फायद्याकरिता तुमच्याशी चांगला व्यवहार करत असतील तर ते वेळीच ओळखा आणि अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून वेळीच बाहेर फेका.

ते असे वागले म्हणून तुम्ही तसे वागायचे ..ते असे बोलले म्हणून तुम्ही तसे बोलायचे..त्यांनी हे केले मी असे करणार यात तुमची energy वाया घालवू नका..आणि आत्मविश्वास ही ढळू देवू नका.

५. एकावेळी एकच काम करा :

काही लोक इतरांच्या दडपणाखाली एकावेळी खूप शॉर्ट period मध्ये खूप काम करत असतात , अनेक निर्णय घेत असतात, याशिवाय विचार ही करत असतात, सगळे निर्णय पटापट घेतात, हे काम सगळ्यांना च सहज जमत नाही आणि मग मेंदूला विचार करून करून थकवा येतो.. स्वभाव चिडचिडा होतो, त्यामुळे तुमचे पुढचे काम नीट होत नाही ..फोकस होत नाही..त्यापेक्षा आपली क्षमता लक्षात घेवून एकावेळी एकच काम करा.

६. लिखाण :

मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला आहे. जे विचार आहेत ते किंवा मनातली गोष्ट तुम्ही इतरांपुढे स्पष्टपणे सांगू शकत नाही. अशावेळी सगळे लिहून काढा किंवा ते लेखी पॉइंट्स लिहून समोरच्याला दाखवा ..

ते लिखाण आपल्या जवळच्या व्यक्ती , मित्र मैत्रिणी यांना आधी दाखवा , त्यावर चर्चा करा त्यातून अजून चांगली तयारी होईल अजून चांगले विचार माहिती होतील आणि discuss केल्यामुळे विचार ही पक्के होतील.

७. व्यायाम , ध्यानधारणा , meditation , योगा करा :

यातून तुमचे चंचल मन स्थिर होण्यास मदत होईल.मेंटल आंधळेपण दूर होईल.कॉन्सेप्ट शांतपणे क्लिअर होण्यास मदत होईल.शिवाय उत्साह वाढेल ..ध्यानधारणा योगा यातून विचार योग्य दिशेने केले जातील..मनाची शांतता लाभेल. व्यायाम केल्याने शरीर ही उत्साही राहील आणि ते मन उत्साही ठेवण्यासाठी मदत करेल.आत्मविश्वास वाढेल.

८. विश्रांती..: छोटासा ब्रेक

सध्या तरी corona मुळे pandemic परिस्थिती निर्माण झाली आहे..या परिस्थितीत प्रत्येकाची च मनस्थिती बिघडलेली आहे..त्यामुळे त्यांचे इतरांशी व्यवहार ही विचित्र झाले आहेत..बिघडले आहेत..समोरचा कसा ही वागू दे..पण आपण आपल्या भावना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जमत नसेल तर एक छोटासा ब्रेक घ्यायचा किंवा विश्रांती..

मग त्यात ते काम सोडून आवडीचे काम करा..चहा पिवून या..मित्र मैत्रिणी यांच्या बरोबर गप्पा, किंवा कोडे सोडवा..गाणे ऐकू शकता.नाही तर एक चक्कर मारून या. पण छोटासा ब्रेक घ्या.

९. व्यवस्थित झोप :

रोज कमीत कमी ८ ते ९ तास झोप घ्या..शरीराने फ्रेश राहिलात की मन ही sharp राहील , फ्रेश राहील.

१०. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटत असेल तिचा सकारात्मक वापर करा :

तुम्हाला ज्याची भीती वाटत असेल त्याची आधीच तयारी करून ठेवा..जसे एखादे काम करायचे असेल प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला लागणारी टूल्स किंवा सॉफ्टवेअर , साहित्य आधीच जमा करून ठेवले की कामाची चिंता राहत नाही..भीती वाटत नाही.. किंवा परीक्षे आधी एखाद्या विषयात नापास होण्याची भीती वाटत असेल तर त्या विषयाचा आधीच चांगला अभ्यास करून ठेवला तर paper सोडविताना भीती वाटणार नाही.

११. नोंद ठेवा :

अशा गोष्टींची नोंद ठेवा जे तुमचा कॉन्फिडन्स किंवा कामावर focus करण्या मध्ये अडथळे आणतात.

१२. पोष्टीक आहार :

healthy food तर खा च. पण व्हिटॅमिन B १२ ची कमतरता असेल तरी डिप्रेशन , मेमोरी लॉस वाढू शकते..

१३. Perfection वाढवा..

काम असेल , नाती असतील किंवा विचार असतील सगळ्यात perfection महत्वाचे.
जेवढे self doubt clear होतील तेवढे perfection वाढेल.

१४. चर्चा करा :

एखाद्या वेळी स्वतः ला माहिती नसेल तर जसे outsourcing करतो तसे करा किंवा मित्र senior यांच्या बरोबर ,जे तज्ज्ञ असतील त्यांच्या बरोबर discuss करा त्यांची मते विचारात घ्या.

१५. Emotions वर कंट्रोल :

राग असेल , भीती , चिंता, द्वेष , स्पर्धा , भावना , या सगळ्या emotions वर कंट्रोल ठेवा.

१६. तुमची स्किल devlop करा..

knowledge update ठेवा..जेणेकरून या जगात तुम्हाला कुठे कमीपणा येणार नाही आणि तुम्ही तुमचे निर्णय घ्याल. योग्य विचार कराल. माहितीचा वापर करून घ्याल.reasoning skill develop करा..प्रोब्लेम solving capacity वाढवा..मुख्य cognitive प्रक्रिया यावर जास्त फोकस करा.

नाही तर या व्यावहारिक जगात लोक तुम्हाला क्षणात फसवतील, तुमच्या भावनांचा फायदा घेतील. त्यांना पाहिजे तसे कठपुतली प्रमाणे नाचवतील त्यांच्या हो ला हो करत राहिलात तर नक्कीच स्वतः विचार करण्याची , निर्णय घेण्याची , काही तरी करून दाखविण्याची क्षमता घालवून बसाल आणि खरेच हे या व्यावहारिक जगतात बुध्दी असून मेंटली आंधळं न होता तुमच्या मानसिक बळाचा योग्य वापर करून घेण्याकरिता काही टिप्स या उपयोगी पडतीलच पण प्रत्येक अनुभवातून शिकत जा म्हणजे तुम्ही स्वतः च सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होत जाल..सक्षम व्हाल.

इतरांचे विचार , अनुभव आपल्याला नक्कीच उपयोगी पडतात..पण स्वतः काही तरी नवीन करण्याची , नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती ठेवा..आहेत ते मार्ग सहज उपलब्ध आहेतच नवीन शोधण्याचा प्रयत्न करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “हे १६ टिप्स वाचा आणि व्यावहारिक जगताचे एक बलाढ्य सैनिक बना.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!