बायको चांगली मिळूनही बाहेर जाळं टाकलं जातं…!!
कु. हर्षदा नंदकुमार पिंपळे.
परी म्हणू की सुंदरा……..!!यात गणलेला नवरा…त्याला त्याच हे कोडं सुटता सुटत नाही. आम्हाला बरी पण हवी.परी पण हवी….आम्हाला चांगली बायको हवी.सगळेच नवरे वाईट नसतात आणि सगळ्याच बायकाही वाईट नसतात. असं जरी असलं तरी थोडेफार नमुने असतातच यात शंकाच नाही. प्रत्येक नवऱ्याला वाटतं की त्याला एक चांगली बायको मिळावी.
आपल्यावर प्रेम करणारी , समजून घेणारी ,सतत कटकट न घालणारी एक चांगली-सुंदर बायको मिळावी अशी त्याची अपेक्षा असते.काही अपवाद वगळता कित्येकांना” चांगली बायको” मिळतेही.पण मग चांगली बायको मिळूनही बाहेर जाळं टाकलं जातं…..!! असं कशासाठी होत असेल…??आणि हे करताना आपल्या बायकोला ते याची साधी पुसटशी जाणीवही होऊन देत नाही.तर याच्या मागे काय कारणं असू शकतात याचा थोडा शोध घेऊयात……….. तर कारणं अशीही असू शकतात—–
मनाविरुद्ध झालेल लग्न
दुसऱ्या कुणावर तरी असलेलं प्रेम
वाढत जाणाऱ्या अपेक्षा
शारीरिक सुख
ईमोशनल डिसकनेक्शन
अशाप्रकारची विविध कारणं याला कारणीभूत ठरू शकतात. माणूस हा असा प्राणी आहे की त्याला नेहमी चांगल्याची अपेक्षा असते.जास्तीत जास्त चांगल कशातून होईल?? याचाच विचार माणूस अधिकाधिक करत असतो.आणि अशाच दिवसागणिक माणसाच्या अपेक्षा वाढत जातात. आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर त्याची चिडचिड होते.
आपण असा विचार करणं साहजिकच आहे…एवढी चांगली बायको मिळाली आता सगळं चांगलच असेल. पण असं असूनही , चांगली बायको मिळूनही काही नवरे बाहेर जाळं टाकतात…. !! हो काही नवरे/ पुरुष याला अपवाद आहेतही. पण जे बाहेर जाळं टाकतात त्यांच काय…?? जेव्हा कळतं की कुणाच असं अस चाललयं तर लोकं लगेच नावं ठेवून मोकळी होतात. एवढी चांगली बायको मिळाली पण त्याच काही नाही… बाहेर अशी किती जाळं टाकलीत याने काय माहीत…??एवढच करायच होतं तर लग्नच करायच नाही नं…???वगैरे वगैरे काहीच विचार न करता ही लोकं त्यांना बोलत सुटतात. पण अशावेळी ते “त्या व्यक्तीची मानसिकता” जाणून घ्यायला विसरतात. त्यामागची कारणं समजून घेत नाहीत. आणि ती कारणं समजून घेणे खूप आवश्यक आहे.
तर मनाविरुद्ध झालेल लग्न—-लग्न म्हणजे फक्त खेळ नाही. तर दोन मनामनांची गुंफण तिथे होत असते.दोन मनांच मिलन या लग्नानंतर होत असतं.पण हे लग्नच मनाविरुद्ध झालं असेल तर ?? तिच्या मनाविरुद्ध झालं असेल तर त्याला समजून घेण थोड अवघडच आहे.आणि त्याच्या मनाविरुद्ध झालं असेल तरीही ते अवघडच आहे. कारण अशा मनाविरुद्ध बांधल्या गेलेल्या नात्यात त्यांची घुसमटच जास्त होते.जबरदस्तीच्या या नात्यात कोण सुखी राहू शकेल…??
आणि मुळात लग्न करायची इच्छा नसतानाही जर लग्न झालं असेल तर बाहेर सुखाचा शोध घेणं साहजिकच आहे.
दुसऱ्या कुणावरच प्रेम—-
हल्ली प्रेमविवाह होतात…पण काही अंशी कित्येकांच्या प्रेमविवाहाला मान्यता नसतेच.पण मग तरीही घरचे म्हणतात म्हणून आपण लग्न करतो.पण मग अशा लग्नाला काय अर्थ आहे..??लग्न झालय पण प्रेम अजूनही दुसरीवरच आहे. मी तिच्याशिवाय असं राहू नाही शकत.एकीशी लग्न आणि एकीवर प्रेम….त्यांना हे स्वीकारण फार कठीण असतं.पण प्रेम आंधळं असतं तसच….त्यावेळी फक्त प्रेम आणि आनंद महत्त्वाचा वाटतो.
वाढत जाणाऱ्या अपेक्षा—-
वर उल्लेख केला तसच…माणसाच्या अपेक्षा या वाढतच असतात. त्याला आज चांगल मिळालं तर उद्याही चांगलच मिळावं असं वाटत असतं.अगदी तसच बायको कितीही चांगली असली आणि ती सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असेल…आणि अचानक अस होत असेल की त्याच अपेक्षा तिच्याकडून अनेकदा पूर्ण होत नसतील तर त्याच्या मनात अशा गोष्टी निर्माण होतात. ही नाही पण ती माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकते…असा समज कळत नकळतपणे मनात निर्माण होतो.
शारीरिक सुख/गरज/समाधान——
शारीरिक सुख/गरज/समाधान हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक या गोष्टीला जबाबदार आहे.कितीही नाही म्हंटल तरीही ही गोष्ट खूप परिणाम करते. “Physical Satisfaction” जर मिळत नसेल तर दुसऱ्या स्त्रीमध्ये तो हळुहळू गुंतत जातो. क्वचितच कुणी एखादा अपवाद सोडला तर शारीरिक सुखाच समाधान प्रत्येकाला हवं असतं. पण ते जर मिळत नसेल तर त्याचा effect अशाप्रकारे होऊ शकतो.
वेळ——-लग्न झालं आणि जबाबदाऱ्या वाढल्या नाही अस होणं शक्यच नाही. लग्न झाल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाढत जातात. सगळ्यांच सगळ करण्यात बायकांचा वेळ निघून जातो.पण मग नवऱ्याला मात्र तिचा फारच कमी वेळ मिळतो.मुलं झाल्यावर तर मुलांकडे अजून जास्त लक्ष बायकांना द्यावं लागतं.पण मग यामध्ये नवऱ्याला वेळ द्यायचा राहून जातो.आपल्यालाही कुणीतरी वेळ द्यावं असं नवऱ्याला वाटतं आणि मग यामध्ये तो दुसरीकडे पुन्हा पुन्हा गुंतत जातो.
ईमोशनल डिसकनेक्शन——
वैवाहिक जीवनात वादविवाद तर होतातच. पण मग जेव्हा मर्यादा संपत जातात. चिडचिड, एकटेपणा वाटत जातो…कुणी समजूनच घेत नाही असं होतं. भावनांच समीकरण चुकलय. अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा कुणीतरी हवं यामध्ये समजुन घेणार….. म्हणून बाहेरचा मार्ग अवलंबला जातो.
मी प्रत्येक नवरा असाच आहे किंवा असाच असतो असं म्हणत नाही. कारण इतक्या सगळ्या गोष्टी जाणवताना देखील बायकोबरोबर प्रामाणिक राहणारे नवरे आहेतही. आणि ते चांगलच आहे.पण कितीतरी जणं असे आहेत ज्यांची बायको चांगली असूनही ते बाहेर जाळं टाकतात… त्यांचा पाय बाहेर अडखळतो. पण यामागे विविध कारणं असतात.
ती कारणं प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे. उगाचच तो “लफडी” करतो असं कोणतही कारण समजून न घेता बोलणं चुकीच आहे असं वाटतं.एक माणूस म्हणून त्याच व्यक्तीकडे बघितलं तर त्यामुळे तो वाईट आहे असं होत नाही. अशा गोष्टी होतात त्याने त्याचा पाय सैल होतो…त्याच्याकडून त्या गोष्टी घडत जातात.आणि मग ते म्हणतात तसं……. बायको चांगली मिळूनही बाहेर जाळं टाकलं जातं…..!!
पण मग अशावेळी मोकळा संवाद खरचं गरजेचा असतो…..दोष देत बसण्यापेक्षा ,लफडेबाज आहे असं म्हणण्यापेक्षा आधी मानसिकता लक्षात घ्या आणि नंतरच खरा उलगडा झाल्यावर काय आरोप प्रत्यारोप करायचेत ते करा……एखादी गोष्ट समजून उमजून न घेणं फार चुकीच आहे…..!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



सगळीकडे मातीच्या चुली कदचित आता गॅस असेल
मानवी स्वभावाचे अचूक विश्लेषण
It is very good dictation and useful for matrimonial cases.
chan lihilay ekdam achuk vishleshan…!